१।। एकर काकडी, खर्च ६० हजार, उत्पन्न २।। लाख

श्री. गणेशराव बुंडे,
मु.पो. कान्होराबारा, ता. हिंगणा, जि. नागपूर.
मो. ९०७५६०४२१३


आम्ही २५ जून २०१६ रोजी १।। एकर मध्यम प्रतीच्या जमिनीत रासी (शाईनी) जातीच्या काकडीची लागवड २' x २।।' वर केली. काकडीला ठिबक केले आहे. काकडी ४ पानावर आल्यावर १०:२६:२६ व वसुंधरा हे खत दिले आणि नागअळी येऊ नये म्हणून फवारणी केली. त्यामुळे नागअळीचा प्रादुर्भाव झाला नाही. काकडीचा प्लॉट चांगला होता. नंतर २० दिवसांचा प्लॉट असताना काकडीचा प्लॉट निस्तेज दिसून वेलांची वाढ थांबली होती. मग मी पार्थ अग्रो येथे गेलो असता तेथे माझी भेट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. कुकडे (मो. ७७१९०६४६४१/७५०७५०३११७) यांच्याशी झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना आमचा काकडी प्लॉट पाहण्यास नेले. त्यांनी प्लॉटची बारकाईने पाहणी केल्यानंतर सांगितले की, या काकडीवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच काही ठिकाणी नागअळी देखील दिसत आहे. मग त्यांनी मला त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती दिली आणि थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + हार्मोनी ३० मिली + प्रिझम ५० मिली (+ ल्यूट) ही औषधे प्रति पंपास (१५ लि. पाण्यास) घेऊन फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे औषधे नेऊन लगेच त्याचदिवशी फवारणी केली. तर ४ दिवसातच ७०% फरक जाणवला. डावणी रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन वेलाची वाढ सुरू झाली. शिवाय पुढे १५ दिवस कोणतीही औषधे फवारण्याची वेळ आली नाही. त्यानंतर फुलकळी लागून लहान - लहान फळे लागल्यावर श्री. कुकडे यांना फोन करून बोलविले. त्यांनी पुन्हा प्लॉटची पाहणी करून फुलगळ होऊ नये व फळधारणा जास्त होऊन काकडीचे पोषण व दर्जा चांगला मिळण्यासाठी तसेच पांढरी माशीचा काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव कमी होण्यासाठी राईपनर ४० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + स्प्लेंडर २५ मिली + ०:५२:३४ हे १०० ग्रॅम + १५ लि. पाणी याप्रमाणात फवारणी करण्यास सांगितले, त्याप्रमाणे केली असता स्प्लेंडरमुळे पांढरी माशी पुर्णपणे कमी होऊन फळांचे पोषण चांगल्याप्रकारे झाल्याने पहिल्याच तोड्याला ३० कट्टे काकडी निघाली. तिला ६०० रु./क्विंटल भाव मिळाला. मग पुढेही कुकडे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार फवारण्या घेत गेलो. त्यामुळे ३ - ४ दिवसाला तोडे करून उत्पादन चांगल्याप्रकारे मिळाले. १।। एकरातून एकूण २।। लाख रु. झाले. यासाठी उत्पादन खर्च ६० हजार रु. आला. म्हणजे खर्च वजा जाता ७० - ७५ दिवसात १ लाख ९० हजार रु. नफा १।। एकरातून मिळाला.

काकडीवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा चांगल्याप्रक्रारे रिझल्ट मिळत होता. त्यामुळे काकडीप्रमाणे कापाशीला देखील हे तंत्रज्ञान वापरले. कपाशीवर २ फवारण्या केल्या. पहिली फवारणी १।। महिन्याची कपाशी असताना कॉटनथ्राईवर आणि प्रिझम प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. त्यामुळे कपाशीची निरोगी वाढ होऊन फुटवा व फुलपात्या वाढल्या. त्यानंतर बोंडे लागल्यावर ती पोसण्यासाठी राईपनरची फवारणी केली. तर बोंडांचे पोषण चांगल्याप्रकारे होऊन दसऱ्यानंतर वेचणी चालू होईल.