डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्लॉट इतर शेतकऱ्यांना सांगतो डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरा आपल्या पिकाला

एक शेतकरी


मी गेल्या दोन वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये करीत आहे. जानेवारी २०१६ मध्ये लावलेल्या वांगी या पिकाची लागवड यशस्वी होऊन उत्पादनही चांगले मिळाले. त्यानंतर आता टोमॅटो पीक डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ने घेतले आहे. टोमॅटोची लागवड १।। एकरमध्ये १५ एप्रिल २०१६ रोजी केली. १०५७ जातीचा टोमॅटो १।।' x ३' फुटावर मध्यम काळ्या जमिनीत ठिबकवर लावला आहे. लागवड करताना जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लावल्यामुळे पांढरी मुळी वाढून आठवड्याभरातच फुट चालू झाली. नंतर लगेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली/पंप (१५ लि. पाणी) याप्रमाणे फवारणी केली आणि जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. ची आळवणी (ड्रेंचिंग) केली. त्यामुळे महिन्याच्या आत प्लॉट १ ते १।। फुट उंचीचा झाला होता. त्याच वेळी प्रत्येक शेतकरी विचारीत होते की, प्लॉटवर कशाचा वापर केला आहे. नंतर १५ दिवसाला वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे इतरांच्या प्लॉटपेक्षा आमचा प्लॉट सरस होता. टोमॅटोवर कोणतीही रोग - कीड नव्हती. माझा प्लॉट पाहिल्यानंतर इतर शेतकरीही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरू लागले. फुलकळी लागताना मी सप्तामृताच्या २ फवारण्या १५ - १५ दिवसाच्या अंतराने घेतल्या. त्यामुळे पाने रुंद, जाड, तजेलदार, लवयुक्त दिसत होती. तसेच फुलकळीची गळ न झाल्याने फळांचे सेटींग चांगले झाले. फळांचे पोषण होण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर व न्युट्राटोन फवारत असल्याने फळे मोठी, वजनदार, आकर्षक दिसत होती.

१।। एकर टोमॅटो ५५ टन, २ लाख २५ हजार

पहिल्या तोड्यास ५ टन उत्पादन मिळाले. असे ४ - ५ दिवसाला तोडे करत होतो. १।। एकरातून एकूण ५५ टन टोमॅटो उत्पादन मिळाले. बाजारभाव फारच कमी होते. तरी सरासरी ५ ते १० रु. भाव मिळाला. पुढे भाव ५ रुपयाहूनही कमी झल्याने झाडांवर माल भरपूर असतानाच प्लॉट सोडून दिला. तरी खर्च वजा जाता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे २ लाख २५ हजार रु. उत्पन्न मिळाले. आता टोमॅटो काढून त्याच प्लॉटमध्ये काकडी टोकली आहे. तिला देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत आहे. हे उत्पादन घेत असताना आम्हला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कंपनी प्रतिनिधी दिपक खळदे (मो. ७३५०८६६८७३) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.