डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या २ एकरातील डाळींबाच्या ७०० झाडांपा २४ टन मालाचे १२ लाख रु.
श्री. ज्ञानदेव निकम,
मु.पो. पाथरे, ता. सिन्नर, जि. नाशिक.
मो. ९९६०३९६१६८
भगवा डाळींबाची लागवड आम्ही ४ वर्षांपूर्वी ४ एकरमध्ये १२ x ८ फुटावरती केली आहे. जवळपास
एकूण १५०० झाडे आहेत. या बागेची जानेवारी २०१७ मध्ये पानगळ केली आणि छाटणी करून खते
दिली. नंतर पाणी सोडले. यावेळी वातावरण अनकूल नुसती केन / हत्तीसोट (Water Shoot) निघत
होते. कळी अजिबात निघत नव्हती. बऱ्याच कृषी सल्लागारांचा सल्ला घेतला, मात्र कळी निघण्याची
समस्या कायम होती. याकरीता माहिती घेत असताना नाशिक मार्केटमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची
माहिती मिळाली.
त्यानंतर नाशिक येथील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ऑफिसला भेट दिली. तेथील प्रतिनिधी शिवाजी
आमले (मो. ९८६००७२५४३) यांच्याशी या समस्येविषयी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचीच्या औषधांची
माहिती देऊन कळी निघण्याची खात्री दिली. तरी मी प्रयोगादाखल या तंत्रज्ञानाचा ४ एकर
पैकी २ एकरवरच वापर करण्याचे ठरविले.
नाशिक प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे कळी निघण्यासाठी प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केली आणि जर्मिनेटरचे एकरी १ लि. याप्रमाणे आळवणी केली. आश्चर्य म्हणजे एवढ्यावर बाकी २ एकरापेक्षा या बागेत सर्व झाडांवर एकसारखी मोठ्या प्रमाणात मादी कळी निघाली. त्यानंतर मात्र नाशिक प्रतिनिधीच्या वेळोवेळी संपर्कात राहून पुढील तंत्रज्ञानाचा वापर चालू ठेवला. विशेष म्हणजे फळांचे सेटींग होण्यासाठी थ्राईवर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. सोबत प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केल्यामुळे बागेमध्ये मधमाश्यांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगल्याप्रकारे झाल्यामुळे फळांचे सेटींग उत्तमरित्या झाले. झाडावर १२० ते १८० पर्यंत फळे लागली. मग पुढे फळे पोषणासाठी १५ - १५ सिवसांच्या अंतराने न्युट्राटोन आणि क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे २ वेळा फवारणी केली. त्यामुळे फुगवण चांगली होऊ लागली. या बागेस जर्मिनेटरची दर महिन्याला ड्रेंचिंग केली. त्यामुळे पांढरी मुळी सतत कार्यक्षम राहिली. फळे १५० ते २०० ग्रॅमची झाल्यावर क्रॉपशाईनर व राईपनर प्रत्येकी १ - १ लि. ची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केली. त्यामुळे फळांचा आकार वाढून ३०० ते ५०० ग्रॅमची फळे तयार झाली. फळांना आकर्षक गडद रंग व चकाकी आली.
डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरलेला प्लॉट
प्रत्येक झाडावर जवळपास १२० ते १५० फळे होती. या फळांची सप्टेंबर २०१७ मध्ये काढणी केली. तर जवळपास प्रत्येक झाडावरून २ क्रेट माल निघाला. यावेळी डाळींबाला बाजारभाव कमी होते तरी नाशिक मार्केटमध्ये या मालास ४० ते ६० - ७० रु. किलो भाव मिळाला. आम्हाला या ७०० झाडांपासून २४ टन माल निघाला. सरासरी ५० रु. किलो प्रमाणे या २ एकरातून १२ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
डॉ.बावसकर तंत्रज्ञान न वापरलेला प्लॉट
दुसऱ्या २ एकरमध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले नाही. तर त्या बागेमधील झाडांवर ६० ते ७० फळे होती. फळांवर खरडा व झान्थोमोनासचे डाग होते आणि कलर कमी होता. त्यामुळे हे डाळींब नाशिक मार्केटमध्ये ३० ते ३५ रु. किलोने विकले गेले.
या अनुभवातून पुढील बहार घेताना पुर्ण १५०० झाडांवर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वारपणार आहे.