डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने २।। एकरातून ७२ क्विंटल वाळलेली हळद, शिवाय २।। एकर बेणे लागवडीस शिल्लक

श्री. आनंदराव उत्तमराव सुरोशे (पाटील), मु.पो. शिंदगी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
मो. ९६८९१५९७५१


मी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हळद लागवड केली आहे. मी गेल्यावर्षी हळद लागवडीस १० क्विंटल बेणे कमी पडल्यामुळे ब्राम्हणगाव येथील शे. रफीकभाई यांच्याकडून बेणे खरेदी केले होते. त्यावेळेस त्यांनी हळद लागवडीसाठी जर्मिनेटर, हार्मोनी व क्विनॉलफॉसची बेणे प्रक्रिया केली आहे असे सांगितले. मी माझ्याकडील बेणे लागवडीवेळी मजूर मिळत नसल्याने बेणे प्रक्रिया केली नव्हती. तर माझ्याजवळील बेण्याची उगवण कमी झाली आणि रफीकभाई यांच्याकडील आणलेले प्रक्रिया केलेले बेणे १००% उगवले होते.

या अनुभवातून मी यावर्षी हळद लागवडीसाठी जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ३०० मिली + क्विनॉलफॉस ५०० मिली ची बेणे प्रक्रिया करून २।। एकरमध्ये ७ जून २०१७ लागवड केली. तर या बेण्याची १००% उगवण झाली. उगवणीनंतर जुलै महिना पुर्णपणे कोरडा गेला तरी माझ्या शेतातील हळद तग धरून होती. या २।। एकर हळदीला कल्पतरू खताच्या ६ बॅगा उगवणीच्या वेळेस दिले होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून जारवा वाढून गारवा तयार झाला होता.

जर्मिनेटरच्या आळवणीने पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली. तसेच मर रोग आटोक्यात राहिला. या हळदीला सप्तामृताच्या आतापर्यंत ४ फवारण्या केल्या आहेत. पानांच्या आकारात वाढ होऊन पानांवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव न झल्याने पाने हिरवीगार आहेत. पानांच्या रूंदीमुळे हळदीचे पण केळीच्या पानासारखे दिसत आहे.

आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश दवणे (मो. ९४२३६६२६५१) हे मला हळद पिकाची प्रत्यक्ष पहाणी करून वेळोवेळी मार्गदर्शन करतात. मी गेल्या ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत असून मला या तंत्रज्ञानाने गेल्या वर्षी २।। एकरमध्ये ७२ क्विंटल वाळलेली हळद मिळाली. शिवाय २।। एकर लागवडीसाठी लागणारे बेणे शिल्लक ठेवले होते. यावर्षी अधिक उत्पादन होईल अशी सध्या पीक परिस्थिती आहे.