सिताफळातील डांगर (काशीफळ) अधिक रासायनिक औषधाने खराब झालेला प्लॉट दुरुस्त

श्री. त्र्यंबक रामभाऊ गारवे,
मु. पो. पान्हेरा (खेडी), ता. मोताळा , जि. बुलढाणा - ४४३१०४.
मोबा. ९४२२९८४२२५


तांबडा भोपळा (काशिफळ) ३ एकरमध्ये ११ जून २०११ रोजी ड्रीपवर १६' x १६' वर (सिताफळ ७५० झाडे लावलेली आहेत. त्याच ड्रीपवर हे काशिफळ) दोन्ही बाजूस १५०० वेल आहेत. बी घरचेच होते. लागवडीच्यावेळी कल्पतरू ३ एकराला ६ बॅगा (सिताफळ + डांगरला) दिले. जर्मिनेटर ची बीजप्रक्रिया करून काशिफळचे बी टोकले, तर उगवण ४ थ्या दिवशी १००% झाली. सर्वसाधारण १० -१२ दिवसाला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या ३ फवारण्या केल्या होत्या तर ३५ ते ३८ दिवसात वेलाची लांबी १२ -१५ फूट होऊन नारळाच्या आकाराची ४ - ५ फळे लागली होती. फुले चालूच होती. या कालावधीत भुरी येऊ नये म्हणून कॅलॅक्झीन आणि मोनोक्रोटोफॉसची फवारणी केली, परंतु १३ -१४ लि. च्या पंपाला चुकून कॅलॅक्झीन ३० मिली वापरले गेले. ते प्रमाण अधिक झाल्याने त्याचा दुष्परिणाम वेलीवर झाला. वेलीचा पाने पिवळी पडून वाळू लागली. वेळ पुर्णत: सुकून गेले. वेलीवर फक्त मोठी फळे राहिली. लहान फळे पूर्णत: गळाली. त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली ड्रीपवाटे दिले आणि फवारणीतूनही याचा औषधांसोबत प्रोटेक्टंट घेऊन फवारणी केली. त्यामुळे वेलीत सुधारणा होऊ लागून ८ ते १० दिवसात पुर्ण प्लॉट पुर्ववत झाला.

आता ४०% माल पक्व अवस्थेत आहे. जमीन हलकी मुरमाड असूनही सरसरी १२ ते १५ किलोची फळे आहेत. सर्व फळे १५ दिवसात तयार होतील.

सिताफळातील कांदा पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्कृष्ट बघून शेतकारी आश्चर्यचकित !

बाळानगर सिताफळाचा प्लॉट ५ वर्षाचा आहे. माल २ वर्षापुर्वी चालू झाला. सिताफळाला चालू वर्षीच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास सुरुवात केली आहे. सिताफळाच्या झाडावर १०० पेक्षा अधिक फळे आहेत. फळे सध्या लिंबाहून मोठी आहेत.

याच सिताफळात डांगरच्या अगोदर फांद्याचे आंतरपीक घेतले होते. २६ -२७ जानेवारी २०११ ला १ किलो बी (महाबीजचे ए एफ - एल आर) रोप तयार करून लावले होते. बियाला जर्मिनेटर वापरले होते. रोपावर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या २ - ३ फवारण्या केल्या. ४५ दिवसात रोप तयार झाले. रोपे एकदम सशक्त होती. याची लागवड सिताफळातील १२ -१५ गुंठ्यात केली. तेवढ्याच क्षेत्राला कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५० किलोच्या २ गोण्या दिल्या. सुरूवातीस जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या ३ फवारण्या केल्या. त्यामुळे प्लॉट सुरूवातीपासून निरोगी राहिला. पती हिरव्यागार राहून माना जाड बनल्या. प्लॉट शेवटपर्यंत अतिशय जोमत होता. कायम कांदा लावणारे म्हणत होते की , असा कांदा आम्हालाही कधी नाही जमला.

कांदा जागेवर १२०० रू. ने मागतात.

हा कांदा ५५- ६० दिवसाचा असताना राईपनर ५०० मिली, प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे कांद्याचे पोषण चांगले झाले. कांद्याचे वजनही वाढले. पत्तीला कलर आकर्षक, चमकदार आला. २६ जानेवारीच्या लागवडीचा कांदा १० मे २०११ ला काढला. ६० क्विंटलहून अधिक उत्पादन मिळाले. आतापर्यंत हा कांदा साठवून ठेवला होता. सध्या त्याची विक्री करणार आहे. आज रोजी (३० ऑगस्ट २०११) १२०० रू. क्विंटल दराने जागेवरून मागतात. सुरूवातीस कांदा काढल्या - काढल्या ७०० रू. ने मागत होते. नंतर महिन्याने ९०० रू. ने मागत.

सध्या ए एफ - डी आर महाबीजचा कांदा बी ४ किलो दीड महिन्यापुर्वी टाकलेला लागवडीस आला आहे. रोपे पुर्णपणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तयार केली, त्यामुळे जोमदार आहेत.

मिरचीचे उत्कृष्ट उत्पादन दरही अधिक

१५ -१६ गुंठ्यात मिरची २२- २३ जून २०११ ला लावलेली आहे.

तिला देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. दोन जातींची मिरची आहे. एक व्ही एन आर -२ ७७ आणि न्युनेम्सचा नंदीता हा वाण आहे. या दोन्ही जातीच्या हिरव्या आणि लाल मिरच्या विक्रीस चालतात. यामध्ये नंदीताला दीड पट भाव मिळतो. मलकापूर मार्केटला ही मिरची चांगली चालते. नंदीताची मिरची लहान असते. तर व्ही. एन. आर. २७७ ची मिरची मोठी असते. दोन्ही चे मिळून आठवड्याला ३० किलोचे १२ ते १५ कट्टे (४०० किलो) निघतात. आतापर्यंत ३ तोडे झाले आहे.

नंदीताची मिरची लहान असल्याने दिवसात एक बाई ५० किलो तोडते. तर व्ही. एन. आर. - २७७ ची मिरची मोठी असल्याने १२० ते १५० किलो तोडते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दोन्ही मिरचीच्या मालात वाढ होते. तसेच मिरच्या सतेज टवटवीत असल्याने मलकापूर मार्केटला सरासरी भावापेक्षा १० - २० % जादा भाव मिळतो.