रासायनिक खतांपेक्षा कल्पतरू उत्तम

श्री. संदीप विलास दुराके,
मु. पो. कुसुर, ता. जुन्नर, जि. पुणे,
मोबा. ९७३० ८६२०५५


मी एप्रिल ११ मध्ये १ एकर क्षेत्रामध्ये अविष्कार आणि आयुष्यमान टोमॅटो या वाणांची लागवड केली. लागवडीला रासायनिक खतांचा वापर न करता मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू या सेंद्रिय खताचा डोस दिला. यामुळे टोमॅटोच्या रोपांची वाढ झपाट्याने झाली व पांढऱ्या मुळ्यांची वाढ सुद्धा भरपूर प्रमाणात झाली. यामुळे मला रासायनिक खतांचा वापर करण्याची आवश्यकता भासली नाही. कारण कल्पतरूच्या एकरी ३ बॅग या प्रमाणात मी डोस लावला. त्यामुळे मला भरपूर गळीत सुद्धा मिळाले आणि मालाची प्रत सुद्धा चांगली असल्यामुळे मंदीमध्येही चांगला बाजारभाव मिळाला आणि रासायनिक खतांशिवाय सेंद्रिय खातांचा वापर करून भरपूर उत्पन्न मिळते, हे लक्षात आले म्हणून मी यानंतर विविध पिकांसाठी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करणार आहे. त्यामुळे माझ्या जमिनीचा पोतही सुधारला आहे आणि रासायनिक खतांचा खर्च सुद्धा कमी झाला.