फोकून केलेला कांदा उत्तम, २ एकरात १८ टन, २ लाख रू. निव्वळ नफा

श्री. सुरेश मल्हारी लोणकर,
मु. माळवाडी, पो. काऱ्हाटी, ता. बारामती, जि. पुणे,
मोबा. ९९२३८६८९५३



माझ्याकडे माळवाडी येथे १६ एकर काळी कसदार जमीन आहे. त्यामध्ये २ एकरमध्ये मागील वर्षी खरीप हंगामात जून २०१० मध्ये ६ किलो कांदा बी फोकून वाफा पद्धतीने केला होता. बियाणे घरचेच होते. ते २०० मिली जर्मिनेटर + १० लिटर पाणी याप्रमाणातील द्रावणात ६ किलो बियाणे सुती कापडामध्ये लूज बांधून १२ तास भिजत ठेवले. बियाणे तरंगू नये म्हणून त्यावर वजन ठेवले. त्यानंतर सावलीत सुकवून वाफ्यावर फेकले. त्यापुर्वी वाफ्यामध्ये एकरी २ बॅगा याप्रमाणे २ एकरसाठी कल्पतरू सेंद्रिय खताच्या ४ बॅगा दिल्या होत्या. बियाणे साऱ्यामध्ये फोकल्यानंतर पाणी दिल्यावर ८ दिवसामध्ये १०० % उगवले. इतरांचे १२ दिवसाने उगवले तसेच त्यांच्या प्लॉटमध्ये नांगे पडलेले दिसत होते. आपल्या प्लॉटमध्ये नांगे अजिबात पडले नाही. नंतर रोपाचे अवस्थेत असताना जर्मिनेटर ६० मिली, थ्राईवर ४० मिली, क्रॉंपशाईनर ४० मिली, प्रोटेक्टंट ३० ग्रॅम १५ लिटर पाण्यासाठी घेऊन फवारले. त्यामुळे रोपांची वाढ निरोगी आणि जोमदार झाली. कांदा २ महिन्याचा झाल्यानंतर दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच औषधे घेऊन त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस ३० मिली घेऊन फवारले. त्यानंतर २।। महिन्याचा कांदा असताना तिसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली + राईपनर ४० मिली आणि क्विनॉलफॉस ३० मिलीप्रमाणे फवारणी केली. या दरम्यान आमच्या बागातील ९० % शेतकऱ्यांचे कांद्याचे प्लॉट करपा आणि मुळकूज रोगामुळे खराब झाले. माझा कांदा अशा परिस्थितीत ९० % चांगल्या प्रकारचा निघून २ एकरमध्ये १८ टन निघाला. इतर शेतकऱ्यांचे रोगामुळे प्रचंड नुकसान झाल्याने पंचायत समिती बारामतीचे कृषी अधिकारी व तलाठी यांनी नुकसानीबद्दल पंचनामे केले. माझा मात्र कांदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्तम प्रतीचा मिळाल्याने गुलटेकडी पुणे मार्केटमध्ये व्यंकटेश्वर यांच्या गाळ्यात १७०० ते २००० रू./क्विंटल दराने २ टप्प्यात विकला. आडत, हमाली, वाहतूक वगैरे सर्व खर्च वजा जाता या दोन एकर कांद्यापासून २ लाख रू. निव्वळ नफा मिळाला. या अनुभवावरून सर्वच प्रकारच्या फळभाज्यांना, पालेभाज्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या शिफारसीनुसार फवारण्या घेतो. रब्बी कांद्यालाही हे तंत्रज्ञान वापरणार आहे. सर्व औषधे संभाजीराव निंबाळकर, फलटण यांचे येथून घेतो. आज (१८/०९/२०११ ) पुणे मार्केट आलो असता जर्मिनेटर १ लि. थ्राईवर - क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली, बॅक्टोकिल २५ ग्रॅमची दोन पाकिटे कांद्यासाठी घेऊन जात आहे.