रोगट पपईचा प्लॉट पुर्ण दुरुस्त १४ गुंठ्यात ६५ हजार रू.
श्री. मारुती बबन चोपदार, रा. दक्षिण तांबवे, ता. कराड, जि. सातारा,
मोबा. ९९७०
३६७१९३
माझ्याकडे फक्त ३५ गुंठे क्षेत्र आहे. त्यातील १४ गुंठे क्षेत्रात मी पपई दि. २० ऑगस्ट
२०१० रोजी लावली होती. परंतु ४ महिन्यांचा प्लॉट असतना पाने पिवळी पडून आकसली होती.
लालकोळीचे ही प्रमाण खूपच होते. मी तर बाग काढायची का ? या विचारात होतो. परंतु आधीच
इतका खर्च केल्याने मन धजवत नव्हते. इतर कृषी सेवा केंद्रातील वेगवेगळ्या औषधांचे फवारणी
केली पण काहीच उपयोग होत नव्हता. त्याचा दरम्यान आमचे तालुक्यात कराड येथे कृषी प्रदर्शन
पाहण्यास गेलो असता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा स्टॉंल पाहिला. तेथे श्री. कापसे साहेब
(मोबा. ९८९०६६९०८३) व माने साहेब भेटले. त्यांना माझी समस्या संगितल्यानंतर प्रदर्शन
संपल्यानंतर ते प्रत्यक्ष प्लॉटवर आले. बागेवर ७० % व्हायरस होता. त्यांनी सांगितल्यानुसार
पंपाला थ्राईवर ७० मिली + क्रॉंपशाईनर ८० मिली + प्रिझम ७० मिली + न्युट्राटोन ८० मिली
+ हार्मोनी १५ मिली + प्रोटेक्टंट पावडर ४० ग्रॅम इ. औषधांच्या आठवड्याच्या अंतराने
सलग दोन फवारण्या घेतल्या. पंधरा दिवसानंतर परत ते बाग पाहायला आले. मलाही बागेत फरक
जाणावायला लागला होताच. बागेची स्टेज पाहून त्यांनी फवारणी लिहून दिली. पहिल्या दोन
फवारणीतच आधीचा लालकोळीही संपूर्ण गेला. पानांना चकाकी व बागेला तेज आले. त्यामुळे
आणखी एका प्लॉटला मी फवारणी घेतली. रिझल्ट साफ दिसत होता. ही औषधे मी संजय कृषी सेवा
केंद्र, दत्त चौक, कराड यांचेकडून घेतली. अजुनही दर आठवडा ते पंधरवड्यात श्री. कापसे
व माने यांची बागेला व्हिजीट असते. जी बाग पुर्ण पिवळी पडली होती. तीच बाग आता पुर्णपणे
हिरवीगार दिसत असून मला आजपर्यंत या बागेच १७ तोडे झाले असून त्यापासून ६५,००० रू.
झाले आहेत. केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच मी आज पुर्णपणे समाधानी असून बागेचा दुसरा
बहारही धरला आहे. म्हणजेच दुसऱ्या वर्षीही मी या बागेतून उत्पादन घेणार आहे. कारण आज
रोजी बागेत भरपूर माल आहे व बागेला काळोखीही खूप चांगली आहे.
४ गुंठे झेंडूपासून १७,५०० रू. उत्पन्न
हा रिझल्ट पाहूनच मी झेंडू पंधरा मी रोजी लावला. श्रावण महिन्याच्या पंधरा दिवस अगोदर प्लॉट चालू झाला. ४ गुंठे क्षेत्रात खर्च जाऊन १७,५०० रू. उत्पन्न मिळाले. मी रासायनिक खते व औषधे अजिबात वापरली नाही. ७०० किलो माल निघाला ३० रू./ किलो असा दर मिळाला. कारण फुलांची क्वालिटीच इतकी चांगली होती. त्यामुळे आज इतर फुल उत्पादन सुद्धा माझ्याकडे मी काय काय बागेला वापरले, हे विचारायला येत आहेत.
४ गुंठे झेंडूपासून १७,५०० रू. उत्पन्न
हा रिझल्ट पाहूनच मी झेंडू पंधरा मी रोजी लावला. श्रावण महिन्याच्या पंधरा दिवस अगोदर प्लॉट चालू झाला. ४ गुंठे क्षेत्रात खर्च जाऊन १७,५०० रू. उत्पन्न मिळाले. मी रासायनिक खते व औषधे अजिबात वापरली नाही. ७०० किलो माल निघाला ३० रू./ किलो असा दर मिळाला. कारण फुलांची क्वालिटीच इतकी चांगली होती. त्यामुळे आज इतर फुल उत्पादन सुद्धा माझ्याकडे मी काय काय बागेला वापरले, हे विचारायला येत आहेत.