जर्मिनेटमुळे सोयाबीनची १०० % उगवण पाण्याचा ताण सहन करूनही सोयाबीन फुलोऱ्यात

श्री. विश्वास कृष्णा करंडे,
मु. पो. सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर.
मोबा. ९८९०६६३१२१


मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती कृषी जीवन अॅग्रो, वैराग ता. बार्शी, जि. सोलापूर यांचेकडून मिळाली. त्यांच्या सल्ल्यानुसार सोयाबीनला बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर वापरण्याचे ठरविले.

१५ जुलै २०११ रोजी महाबीजचे जे. एच ३३५ वाणाचे २० किलो सोयाबीन बियाला जर्मिनेटर २५० मिली + १ लि. पाणी याप्रमाणातील द्रावण चोळून पेरणी केली. तर तिसऱ्या दिवशी १०० % उगवण झाल्याचा अनुभव आला. यापुर्वी असा अनुभव कधीच आला नाही. जमीन हलक्या प्रतीची आहे. अजून पाण्याची एकही पाळी दिली नाही. पावसावरच त्याची वाढ झालेली असून सध्या प्लॉट दीड महिन्यात फुलोऱ्यात आहे.

आता शेंगा पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर वापरणार आहे.