उगवण कमी, नैराश्य, जर्मिनेटरने मिश्रपिकातील मूग ३ एकरात १७ पोती

श्री. भिकाजी साहेबराव शिंदे,
मु. पो. खळेगाव, ता. लोणार, जि. बुलढाणा,
मोबा. ९७६३०३६६६३



मी श्री. भिकाजी साहेबराव शिंदे रा. खळेगाव येथील रहिवाशी आहे. माझ्या शेतामध्ये मी सोयाबीन, मूग, उडीद तसेच कपाशी ही पिके घेत असतो. याही वर्षी मी ही पिके घेत आहे.

मूग आणि तुरीचे मिश्र पीक घेतले होते. मूग १० फुटाचा पट्टा झाल्यानंतर २ फूट रुंदीमध्ये तुरीच्या ३ ओळी आहेत. मूग व तुरीची पेरणी १७ जून २०१२ ला केली होती. एकूण ४ एकर क्षेत्र होते आणि मूग साधारण ३ एकर आणि तूर १ एकर असे क्षेत्र आहे. त्याची उगवण योग्य प्रकारे झाली नाही. इतर शेतकऱ्यांच्या मानाने माझ्या शेतातील मूग अगदी पातळ (तुटक) उगला होता. त्यामुळे मी हताश होऊन गेलो. मला इतर शेतकरी म्हणत होते की तू हा मूग मोडून टाक व बाजरी घे. त्यांचा सल्लाही मला पटला. परंतु असे असतानाचा अचानक एक दिवस सुलतानपुरला गेलो. धनश्री ट्रेडर्सवर मला तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. खरात भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाने व धनश्री ट्रेडर्सच्या मालकांनी मला 'जर्मिनेटर' या औषधाची फवारणी घेण्याचे सांगितले. मला तर गॅरंटीच नव्हती, परंतु श्री. खरात यांच्या आग्रहाने मी फवारणी केली, तर मला ६ - ७ दिवसात फरक जाणवला. त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा एक स्प्रे घेतला, तेव्हा माझा मूग एकदम चांगला इतरांच्या मुगापेक्षाही जास्त चांगला दिसू लागला. तेव्हा मी पुन्हा तिसरा स्प्रे घेतला, त्याने मुगाला लाग चांगला लागला व शेंगाही भरपूर लागल्या (संदर्भासाठी कव्हरवर फोटो दिला आहे.) इतर शेतकरी मला विचारू लागले तेव्हा मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची माहिती त्यांना दिली.

सव्वा दोन महिन्यात म्हणजे ३० ऑगस्टला मूग काढला, तर ३ एकरात पाण्याची अत्यंत कमतरता आणि उगवण कमी यामुळे काढून टाकायाच्या अवस्थेतील मुगापासून १७ पोती उत्पन्न मिळाले. दरवर्षी एकरी ३॥ पोतीच (क्विंटल) उतारा मिळत असे. या टेक्नॉंलॉजीमुळे आम्हाला चांगला फायदा झाला आहे व यापुढे आम्ही या टेक्नॉंलॉजीचाच वापर करणार आहोत.