गाडी चालवता चालवता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने रोपवाटिका करून जीवनाची गाडी धावू लागली
श्री. भरत रसाळ,
मु. पो. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली. मोबा.९९७०६८५८६७
माझी स्वत: ची जमीन खूप कमी आहे. ड्रायव्हींगची आवड असल्याने इतरांच्या गाड्यावर
जायचो. माझे ११ वि पर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरीपेक्षाही धंद्याची आवड असल्याने गेल्यावर्षी
मी छोटा हत्ती (टाटा एस) खरेदी केली. पहिल्यापासून ड्रायव्हींग करत असल्याने ह्या
लोकलच्या जीवावर भाडीही चांगली मिळू लागली. तरीही अनेक वेळा भाड्यासाठी वाट पाहण्यात
वेळ जात असे. या मोकळ्या वेळेत काहीतरी जोड धंदा करायचा विचार खूप दिवसापासून डोक्यात घोळत होता. मोठा
धंदा करायचा तर म्हंटल तर तेवढ भांडवलही जवळ नव्हत. म्हणून कमी गुंतवणूकीत व आपल्या
गाडीलाही भाडं मिळावं असा विचार करून नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. जुलै, ऑगस्ट
महिन्यात भाडीही कमी असतात. पण याच काळात मागच्या वर्षी मी बऱ्याच लोकांना इतर गावच्या
नर्सरीतून उसाची रोपे आणून देत होतो.
सहज चौकशी करताना लोक बेण्यासाठी ऊस कसला घेतात, कुठल्या औषधात बुडवतात, डोळे वर करून कसा लावतात हे कितीतरी वेळा मी बघत होतो. सध्याच्या मंदीच्या काळात काय करावं हा विचार करताना अचानक एक दिवस नर्सरीचा विचार डोक्यात आला पण कुणाला बोलाव समाजात नव्हतं. तेव्हा एका मित्राने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. उमेश कापसेंना विचारण्याचा सल्ला दिला. त्यांची भेट घेतली. त्यांनी पण चांगला सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कमी भांडवलात सुरवातीला कमीच रोपे करायचे ठरले. कारण मागच्या वर्षी मी या पिरेडमध्ये खूपच रोपे बाहेरून आणून गावाच्या लोकांना दिली होती. त्या दृष्टीने नियोजन सुरू केले.
२०,००० रुपये जवळ होते. ट्रे व कोकोपीट त्यातूनच घेतले. उसाचे बेणे ३,५०० रुपये टनाने मिळाले. त्या एका टनानेच सुरुवात करायचे ठरवले. सविस्तर चर्चा कापसे यांच्या बरोबर केली. त्यांनी रोपे तयार करायचे वेळी स्वत: हजर राहण्याचे कबुल केले. ट्रेच्या मापाचे डोळे २ मजूर लावून काढून घेतले. जर्मिनेटर १ लिटर आणून १०० लिटरच्या ड्रमात त्या कांड्या १० ते १५ मिनिटे बुडवल्या. त्याच बरोबर प्रोटेक्टंट पावडर अर्धा किलो + बाविस्टीन २०० ग्रॅम घालून कांड्या बुडवल्या. बियाण्यावर प्रक्रिया केल्याने उगवणीबद्दल आत्माविश्वास होताच. तरीपण सुरुवात आहे, काही चुका झाल्याने ४२ च्या ट्रेपैकी ३२ ते ३५ कांड्या उगवल्या. साधारण ८०% उगवण झाली. ही नर्सरी मित्राच्या रानात केली होती. नर्सरी अतिशय उत्तम आहे. सध्या १ महिना रोपांना झाला असून दर आठवड्याला एकदा याप्रमाणे जर्मिनेटरच्या ४ आळवण्या घेतल्या आहेत. एक वेळ प्रिझमची फवारणी घेतली आहे. इतरांच्या नर्सरीपेक्षा माझ्या रोपांची क्वालिटी सर्वात चांगली आहे. आतापर्यंत १०५० रोपे ३ रुपये दराप्रमाणे विकली आहेत. सोयाबीन निघाल्यावर अजून चांगली मागणी राहणार आहे. त्यामुळे आणखी रूपे तयार करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता जर्मिनेटर आणून ठेवले आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा मी ऋणी आहे.