आमच्या 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीच्या यशातून पाहुण्यांना या शेवगा लागवडीची प्रेरणा

श्री. वाव्हाळ सोनबापू गेणभाऊ (निवृत्त मंडल अधिकारी),
मु. पो. मलठण , ता. शिरूर, जि . पुणे.
मो.९९७५८४४८४२



आम्ही एक एकरमध्ये गेल्यावर्षी जून महिन्यात 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड केली आहे. जमीन मध्यम मुरमाड प्रतीचा आहे. प्रथम १५' x १०' वर खड्डे खोदून त्यामध्ये शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून खड्डे भरून घेतले. जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे बियांची १०० % उगवण झाली होती. त्यामुळे सर्व रोपे जीमदार मिळाली. त्या रोपांची वरीलप्रमाणे तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये लागवड केली. नंतर गौरव कृषी सेवा केंद्र, शिरूर, जि. पुणे यांचेकडून सप्तामृत औषधे आणून फवारण्या करत असे. तर ७ व्या महिन्यात शेंगांचे तोडे चालू झाले. प्रत्येक झाडावरून १ ते १॥ फुटाच्या ३५० ते ४५० शेंगा मिळाल्या. पुणे मार्केटमध्ये कामठे (गाळा नं. ५४०) यांच्याकडे शेंगा विकल्या. सरासरी ३० ते ३२ रू./ किलो भाव मिळाला. पहिल्याच बहारापासून ३० - ३५ हजार रू. खर्च वजा जात सहा महिन्याच्या हंगामामध्ये १ लाख रू. निव्वळ नफा १ एकर शेवग्यापासून मिळाला. या अनुभवातून आमचे पाहुणे श्री. शेखर गायकवाड उपजिल्हाधिकारी आहेत ते देखील 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीस उद्युक्त झाले आहेत. त्यांच्यासाठी आज (१८/०९/२०१२) शेवगा बियाण्याच्या चौकशी व खरेदीसाठी आलो आहे.