१२ गुंठ्यातून टोमॅटोचे १ लाख अजून तेवढेच होतील

श्री. मधुसुदन गणपतराव देशमुख,
(बी. एस्सी. अॅग्री) मु. पो. हानेगाव, ता. देगलूर, जि. नांदेड - ४३१७४१.
मोबा. ७३८५८४४२८०


आम्ही १ जून २०१२ रोजी १२ गुंठे मध्यमप्रतीच्या जमिनीत ४' x १॥' वर टोमॅटोची लागवड केली. डॉ. बावसकर तंत्रज्ञान २००१ साली पपईला वापरले होते. तेव्हा वडील शेती करीत होते. तेव्हा २ एकरात पपईपासून चांगले उत्पादन मिळाले होते. त्या अनुभवावरून मी चालूवर्षी या टोमॅटो पिकासाठी सुरूवातीपासून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले.

प्रथम लक्ष्मी ५००५ वाणाच्या टोमॅटो बियाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली. त्यामुळे उगवण लवकर व १०० % झाली. नंतर पुनर्लागवडीच्यावेळी रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यामुळे रोपोंची मर झाली नाही. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून रोपे वाढू लागली. पुढे कृषी विज्ञान मासिकात दिल्याप्रमाणे डॉ. बावसकर तंत्रज्ञानाच्या सर्व फवारण्या घेतल्या. तर रोगराई कमी आली. पुढील फवारणी नियमित होत असल्याने ती देखील रोगराई पुर्णता नाहीशी झाली, शिवाय तार काठीच्या आधारावर झाडांची उंची ४ ॥ ते ५ फुट झाली. फुलकळी माल भरपूर लागला. उत्पादन चांगले मिळाले. माल मोठा झाला. मालाला शायनिंग आली. टोमॅटोचे ३ ऱ्या दिवशी तोडे करत असून तोडे २ महिन्यापासून चालू आहेत. तोड्याला ४० ते ५० क्रेट माल निघतो. क्रेटला भाव १५० ते २०० रू. देगलूर, औराद (कर्नाटक) मार्केटला मिळाला. आतापर्यंत ३०० क्रेट माल निघाला आहे. त्यापासून १ लाख रू. उत्पन्न मिळाले असून अजून २ महिने तोडे चालतील, अजून ३०० क्रेट माल सहज निघेल. एवढा फुटवा फुलकळी व लहान - मोठा माल आहे. प्लॉटदेखील पुर्णता निरोगी आहे. एरवी २ महिन्यातच प्लॉट संपतात. मात्र डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने ४ महिने उत्पादन चालेल. या अनुभवावरूनच आता 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचा आहे. त्यासाठी बियाणे व सरांचा सल्ला घेण्यासाठी आज पुणे ऑफिसला आलो आहे.