भारतातील गाई व म्हशींच्या विविध जाती
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
गाईच्या दुभत्या जाती :
१) सहिवाल : स्थानिक नावे: लोला, मोटंगोमेरी, उगमस्थान : ही जात पंजाब आणि पाकिस्तानातील मोटंगोमेरी या जिल्ह्यांमध्ये आढळते. ह्या जातीचे शरीर मोठे, त्वचा सैल, पाय लहान, शिंगे अखुड, असतात. ही गाय एका वेताला २१५० कि.ग्रॅ एवढे दूध देते.
२) लालसिंधी : स्थानिक नावे - लाल कराची, उगमस्थान - ही जात कराची व हैद्राबाद (सिंध, पाकिस्तान) येथे आढळते. ही जात आकाराने मध्यम असते. शरीरबांधा चांगल असतो. शिंगे जाडजुड असतात, रंग गडद लाल असतो. ही खूप नम्र जात आहे. ही गाय एका वेताला १४७ ४ कि.ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देते.
३) गीर : स्थानिक नावे : काठीयावाडी सुरती, डेक्कन, उगमस्थान : गीर जंगल, गुजरात. ही जाते आकाराने मोठी, शरीर लयबद्ध कान आकाराने मोठे, चेहरा लांब, रंग हा लाल ते काळसर या वाणात असतो. या गायी १७४६ कि.ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देतात.
४) थार पारकर : स्थानिक नावे :थारी, पांढरी सिंधी, उगमस्थान: थार पारकर ही जात आकाराने मध्यम, मजबूत बांधा, आखूड मजबूत पाय, लयबद्ध शरीर व शिंगे मध्यम आकाराची असतात. ही गाय एका वेताला १४७४ कि.ग्रॅ. एवढे दूध देते.
५ ) देवनी : स्थानिक नाव :डोंगरपट्टी उगमस्थान : देवगी, ता. उदगीर, जि. लातूर, वैशिष्ट्ये: या जातीच्या गायी दिसायला गीर जातीच्या गायीसारख्या दिसतात. शरीरबांधा मजबूत, चेहरा लहान असतो व रंग पांढरा व काळपट किंवा लालसर आणि त्यावर पांढरे चट्टे असतात. दूध उत्पादन १९०० कि.ग्रॅ. प्रती वेत देतात. ह्या जातीची बैले मुख्यत्वे जडकामासाठी उपयुक्त ठरतात.
गाईच्या दुभत्या व जड कामाच्या जाती :
१) हरियाना : उगमस्थान : पूर्व पंजाब, रोहतकू, हिसार, करणाल व दिल्ली येथे आढळतात. वैशिष्ट्ये: शरीरबांधा लयबद्ध, मान उंच, आखूड शिंगे, लांबट चेहरा, लहान कान, कास मोठी, लांब व मजबूत पाय, शेपटी लहान व काळ्या रंगाचा गोंडा आणि गायीचा रंग पांढरा असतो. दूध उत्पदान १४०० कि.ग्रॅ. प्रती वेत.
२) ओंगल : स्थानिक नाव : नेल्लोर उगमस्थान : ओंगल खारे (आंध्र प्रदेश), वैशिष्ट्ये : जनावर आकाराने खूप मोठे, बळकट शरीर, काळपट मोठे, जाड व आखूडशिंगे, रंग पांढरा असतो. जनावरे चपळ असतात. दूध उत्पदान १२५५ कि.ग्रॅ. प्रती वेत देतात. ह्या जातीचे बैल मुख्यत्वे जडकामासाठी उपयुक्त ठरतात.
३) कांक्रेज : स्थानिक नाव: बन्नई, वढेर, नगीर, उगमस्थान: उत्तर गुजरात, कच्छ, वैशिष्ट्ये : या जातीच्या गायी वजनाने जास्त, कपाळ मोठे मजबूत बांधा व सरळ पाठ आणि रंग राखेरी काळपट, मध्यम लांबीची शेपटी आणि चालीने संथ असतात. दूध उत्पादन १३३३ कि.ग्रॅ. प्रती वेत. ही बैले मुख्यत्वे जडकामासाठी उपयुक्त ठरतात.
४) निमारी : उगमस्थान : नर्मदा नदीच्या खोऱ्यात मध्यप्रदेश, या जातीच्या गायींचे शरीर हे लांब व पाइ सरळ असते. लांब व कपाळ चपटे असते. शिंगे खूप लांब व विशिष्ट पद्धतीने वाढलेली असतात. रंग लालसर असून त्यावर पांढरे चट्टे असतात. जनावरे खूप चपळ व कामासाठी उपयुक्त असतात. दूध उत्पदान ४५० ते ५०० कि.ग्रॅ. प्रती वेत.
गाईच्या जड कामाच्या जाती:
१) खिल्लार : उगमस्थान : सोलापूर आणि सातारा हे महाराष्ट्रातील जिल्हे, वैशिष्ट्ये : ही जनावरे घट्ट बांध्याची दंडगोलाकार असतात, शरीराचा रंग करडा पांढरा, चेहरा लांब अरुंद, कपाळ किंचीत बाह्य गोल आकार असा फुगीर असून, दोन डोळ्यांजवळ खाच असते. डोळेबारीक पण रागीट असतात. शिंगे गोलाकार, लांब असून टोकाकडे निमुळती होत जातात. या गायी ९०० ते १००० कि.ग्रॅ. प्रती वेत एवढे दूध देतात.
२) लाल कंधारी : उगमस्थान : नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, बिलोली, देगलूर या तालुक्यात आढळते. वैशिष्ट्ये : ही गुरे लहान ते मध्यम आकारमानाची असून बांधेसूद असतात. शरीराचा रंग फिकट ते गडद लाल रंगाचा असतो. कपाळ रुंद पण फुगीर असते, शिंगे मध्यम आकाराची असून प्रथम बाहेरील बाजूस व नंतर आत वळलेली असतात. कान मध्यम लांबीचे व दोन्ही बाजूस खाली झुकलेले असतात. शरीर लांब व दंडाकृती असते.
३) डांगी : स्थानिक नावे: कलखेरी, सोनखेरी, उगमस्थान : अहमदनगर, नाशिक (महाराष्ट्रा) , ही जात मध्यम आकाराची, त्वचा तेलकट, लहान डोके, आखूड शिंगे, लहान कान व रंग काळा आणि पांढरा असतो. ही जात मुख्यत्वे साळीच्या शेतात व उपयुक्त ठरते.
४) हलीकर : उगमस्थान : कर्नाटक (हसन, तुमकुर), वैशिष्ट्ये : ही जनावरे मध्यम व घट्ट बांध्याची असतात. शिंगे आणि डोके वैशिष्ट्यपुर्ण आहेत. टोकदार वळलेली वर जाणारी शिंगे, लहान कान असलेल्या या जातीचे बैल शेती व वाहतुकीच्या कामासाठी चांगले असतात.
५) अमरीतमहल: उगमस्थान : कर्नाटक, वैशिष्ट्ये: लयबद्ध शरीर, मजबूत बांधा, निमुळता चेहरा, लांब शिंगे, मध्यम लांबीची शेपटी व रंग करडा भुरा व डोके, मान आणि बांधा काळा. ही जनावरे खूप चपळ आणि कामासाठी उपयुक्त म्हणून भारतात प्रसिद्ध आहेत.
६) मालवी : उगमस्थान : माळवा प्रांत : मध्यप्रदेश, वैशिष्ट्ये : भक्कम मजबूत बांधा, रंग करडा, या जातीचे बैल कामासाठी उत्तम आहेत. या गायी ४५० ते ५०० किलो ग्रॅम प्रती वेत एवढे दूध देतात.
७) कृष्णा व्हेली : उगमस्थान : कृष्णा खोरे (कर्नाटक), वैशिष्ट्ये : ही जात गीर, ओंगल व स्थानिक म्हैसूर जातीच्या जनावरांचे गुणधर्म असलेली, रंग भुरा, लांब व मजबूत शरीरयष्टी, मजबूत व चपटे कपाळ, कान लांब व लोंबकळते. ही बैले खूप मजबूत व जडकामासाठी उपयुक्त असतात.
८) गौळाऊ : उगमस्थान : विदर्भातील वर्धा, नागपूर व मध्यप्रदेशात आढळतात. वैशिष्ट्ये : ही जात ओंगल या जातीसारखी दिसते. ही गुरे रंगाने पांढरीशुभ्र असतात. ही जनावरे हलक्या बांध्याची आणि मध्यम उंचीची असतात. कपाळ फुगीर पण बाह्यगोल भिंगासारखे असते. ही जनावरे जडकामासाठी उपयुक्त असतात. या गायी १००० कि.ग्रॅ. प्रती वेत एवढे दूध देतात.
९) खेरीगर : उगमस्थान : उत्तर प्रदेश, वैशिष्ट्ये : मध्यम आकार, लहान डोके, शेपटी मध्यम लांबीची आणि मजबूत व लांब शिंगे, रंग राखेरी असून बैल खूप चपळ व शेती कामासाठी उपयुक्त ठरतात.
संकरित (विदेशी) गायीच्या जाती :
जर्सी : या गायीचे मुळस्थान इंग्लिश खाडीतील जर्सी बेट आहे. जर्सी गाई दुधासाठी चांगल्या असून बैल जड कामासाठी उपयुक्त आहेत. विदर्भात या गायींचे संगोपनासाठी शिफारस केली जाते. एका वेताचे दुग्ध उत्पदान ४ हजार किलो असून दुधाची फॅट ४.५ % असते.
होलेस्टीयन फिजीयन : या जातीचे मुळ स्थान हॉलंड असून दुग्ध उत्पादनासाठी ही जात सर्वोत्तम समजली जाते. शरीर मोठे असून त्यावर काळे, पांढरे मोठे ठिपके असतात. एका वेताला ६ हजार किलो दुध देतात.
म्हशीच्या जाती
भारतातील गायींची संख्या १८५ दशलक्ष असून म्हशींची संख्या फक्त ९७ दशलक्ष आहे, तरी सुद्धा म्हशींचे एकूण दूध उत्पादन गायींच्या दूध उत्पादनाच्या तुलनेने ५०% पेक्षा जास्त आहे. तसेच जगातील एकूण म्हशींच्या संख्येच्या ५७% म्हशी या भारतात आढळतात. म्हशीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षा घट्ट असून त्यामध्ये स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. तसेच बाजारात म्हशीच्या दुधाला चांगला दर व मागणी आहे. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठीसुद्धा म्हशीचे दूध जास्त उपयुक्त आहे. यावरून म्हशीच्या दुधाचे महत्त्व लक्षात येते. म्हणून भारतातील म्हशींच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये समजावून घेणे गरजेचे आहे.
मुऱ्हा : या म्हशीला दिल्ली म्हैस म्हणून ओळखले जाते. ही म्हैस दिल्ली व हरियाणा राज्यातील रोहटक व कर्नाल या जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळते.
वैशिष्ट्ये : या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आखूड व एकदम गोलाकार वळलेली शिंगे. या म्हशीचा रंग गडद काळा असून केस विरळ असतात व आंचळ हे चांगले विकसित झालेले असते. ही म्हैस एका वेताला जवळजवळ ३०० दिवसांत २२०० कि.ग्रॅ. एवढे दूध देते. रेड्याचे वजन ५५० कि.ग्रॅ. व म्हशीचे वजन ४५० कि.ग्रॅ. असते. दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण ७ % असते. ही जात भारतातच नव्हे, तर जगातही उत्तम दुग्धोत्पादनासाठी पसिद्ध आहे.
सुरती : ही जात गुजरातमधील आनंद, नाडीया व बडोदा या जिल्ह्यांमध्ये आढळते. त्वचेचा रंग काळा किंवा तपकिरी असून केसाचा रंग हा तपकिरी ते करडा असतो. शिंगे विळ्याच्या आकाराची असून ती चपटी असतात. शेपटी लांब असून शेपटीचा गोंडा पांढऱ्या रंगाचा असतो. एका वेतातील सरासरी दूध उत्पादन १६०० कि.ग्रॅ. असून त्यामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण ७.५ % असते.
मेहसाना : ही जात गुजरातमध्ये आढळते. मुऱ्हा व सुरती या दोन जातींच्या संकरातून विकसित केली आहे. त्वचेचा रंग काळा असून चेहरा, पाय व शेपटीच्या गोंड्यावर पांढरा रंग आढळून येतो. या जातीतील म्हशीची शिंगे मुऱ्हा किंवा सुरतीच्या शिंगासारखी असतात. शरीर मुऱ्हापेक्षा लांब असते. आंचळ चांगले विकसित झालेले असून सडांमध्ये समान अंतर असते. एका वेतातील दूध उत्पादन १८०० कि.ग्रॅ. आहे.
जाफराबादी : या म्हशीचे मूळस्थान हे गुजरातमधील गीर जंगल व काथीयार या परिसरात आहे.
वैशिष्ट्ये : या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रुंद कपाळ आणि जाड शिंगे मानेच्या दोन्ही बाजूस मागे आलेली व टोकाला थोडी वर वाढलेली असतात. शरीर लांब असून आंचळ चांगले विकसित झालेले असते व रंग काळा असतो. नराचे (रेड्याचे) वजन ६०० कि.ग्रॅ. असते व म्हशीचे सरासरी वजन ४५० कि.ग्रॅ. असते. या जातीच्या म्हशी एका वेतात सरासरी १८०० व २००० कि. ग्रॅ. दूध देतात. दुधात स्निग्धांशाचे प्रमाण ९ - १०% असते.
पंढरपुरी : मूळस्थान पंढरपूर - सोलापूर व कोल्हापूर येथे प्रामुख्याने आढळते. तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत आढळते. त्यामुळे हिला 'धारवाडी' असे सुद्धा संबोधले जाते. शरीराचा आकार मध्यम असून चेहरा निमुळता असतो व शिंगे लांब, सपाट व पिवळसर असतात. या जातीचे रेडे ओढकामासाठी व शेतीच्या कामासाठी वापरले जातात. म्हशीचे एका वेतातील सरासरी दूध उत्पादन १५०० किलो असते.
नागपूरी : या जातीच्या म्हशीला बेरारी, इचलपुरी, मराठवाडा, गौळणी वराड अशा अनेक नावांनी ओळखले जाते. ही जात प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोळा, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत आढळते.
वैशिष्ट्ये : रंग काळा असून तोंड, पाय व शेपटीचा गोंडा पांढरा असतो, इतर म्हशींच्या तुलनेने वजनास हलकी असते. चेहरा लांब, निमुळता व सरळ असतो. मान लांब असून पुढील दोन पायांमधील ब्रिस्केट (फुगवटा) चांगली विकसित झालेली असतो. शिंगे लांब, चपटी तलवारीसारखी असतात. रेड्याने सरासरी वजन ५२५ किलो असून म्हशीचे वजन ४२५ किलो असते. या म्हशीचे दूध उत्पादन कमी म्हणजेच १००० ते ११०० किलो प्रति वेत असले, तरी ही जात काटक असते.
भादवरी : ही म्हैस प्रामुख्याने उत्तम प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात आढळते. ही म्हैस आकाराने मध्यम असून डोळे लहान व शिंगाकडील बाजूस फुगीर असते. केस विरळ असतात व रंग तांबूस असतो. मागील पायाचे खूर हे पुढील पायाच्या खुरापेक्षा जास्त काळसर असतात. कपाळ जास्त रुंद असते. आंचळ जास्त विकसित झालेले नसते, परंतु दुग्धशीर फुगीर असते. एका वेतातील सरासरी दूध उत्पादन हे १८०० ते २००० कि.ग्रॅ. असते. दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण १३ % असते.
निली रावी : मूळस्थान माँटगोमेरी आणि फिरोजपूर, जिल्हा पाकिस्तान. रंग काळा असून कपाळावर पांढरा ठिपका असतो. डोळे फुगीर असून दोन्ही डोळ्यांमध्ये खोलगट भाग असतो. शिंगे आखूड व थोडीशी वळलेली असतात. सरासरी दूध उत्पादन १८५५ कि.ग्रॅ. प्रति वेत. वरील, उल्लेख केलेल्या जातींबरोबरच कुंडी गोदावरी, तराई , सबळपूर, तोडा इ. जातीसुद्धा भारतात आढळातात, परंतु त्या दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या नाहीत.