हळवा व गरवा कांदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी !

श्री. मनोहर सुखदेव बोचरे,
मु. पो. देवगाव, ता. निफाड, जि. नाशिक
मोबा. ८८०६१४७१०२



गोट कांदे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावतो, तर बियाचे तुरे जास्त निघतात. त्यामुळे उत्पादन वाढते. रोग पडत नाही. पारंपारिक पद्धतीने १ पायली उत्पादन होत असेल तर जर्मिनेटरमुळे १।। पायली मिळते.

बियाचे तुऱ्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्या करतो. त्यामध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट घेतो. चारापिकावर (ज्वारी) जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली तर उगवण १०० % तर होतेच शिवाय उंचीदेखील ८ - ९ फूट होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ही शेतकऱ्यांना जीवनदाईनीच आहे.

खरीपात १ एकर कांदा असतो. त्याला १५ दिवसाला पहिली फवारणी घेतो. नंतर १ महिन्यांनी दुसरी आणि त्यानंतर ५५ ते ६० दिवसांनी ३ री फवारणी करतो. यामुळे तुऱ्याचे प्रमाण कमी होते. टाक्या, करपा पडत नाही. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते. एकरी १३० ते १४० क्विंटल उत्पादन मिळते. गेल्यावर्षी भाव कमी ५०० रू./क्विंटल मिळाला.

रब्बीतील कांदा १॥ एकर असतो. रोपे सप्टेंबरमध्ये टाकतो. १ ते १५ नोव्हेंबरमध्ये रोपांची पुनर्लागवड करतो. याला देखील वरीलप्रमाणे तंत्रज्ञान वापरतो. तर मार्चमध्ये कांदा काढणीस येतो. पारंपारीकतेपेक्षा १५ दिवस अगोदर कांदा काढायला येतो. उत्कृष्ट दर्जाचे उत्पन्न मिळते. १५० ते १६० क्विंटल उत्पादन गरव्या कांद्याचे मिळते.