पपईचा पहिलाच अनुभव तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ एकरातून सव्वादोन लाख

श्री. बालाजी रघुनाथ जाधव,
मु. पो. म्हातारगाव, ता. वसमत, जि. हिंगोली,
मोबा. ९९२२६९५४५९


आम्ही काळ्या सुपिक २ एकर जमिनीत ५ ऑक्टोबर २०१० रोजी ७ x ७ फुटावर तैवान पपईची लागवड केली होती. पपईची झाडे २ महिन्याची असताना कृषी प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. 'कृषीविज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरून मासिक सुरू केले. नंतर १ लि. सप्तामृत आणून पपईवर सप्तामृताचे स्प्रे केले. असे ३ वेळा औषध आणून एकूण ६ फवारण्या फळ पक्व होईपर्यंत (काढणीपर्यंत) या पपईवर केल्या. पपईचे पीक पहिल्यांदाच घेतले होते. अनुभव नसतानाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई रोगमुक्त राहून चांगले उत्पादन मिळाले. २ एकरात १२०० झाडे होती. प्रत्येक झाडावरून ६० ते ७० किलो माल निघाला. वसमत मार्केटला फळांची विक्री केली, तेथे ६०० पासून ११५० रू./ क्विंटल भाव मिळाला. २ एकरातील पपईस ३५ ते ४० हजार रू. एकूण खर्च झाला आणि त्यापासून २ लाख २५ हजार रू. उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीने पिके घेऊ शकलो नाही. यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे आमच्या गावात १५ ते २० एकर पपई लागवड होईल. यामध्ये आम्हीदेखील २ एकर पपई लागवड करणार आहे. सध्या कापूस ६ एकर, ऊस १ इकर, हळद ३ एकर, सोयाबीन ३ एकर ही पिके आहेत. आज पपईच्या बियाची खरेदी करण्यासाठी पुणे येथे आलो असता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला भेट देऊन चालू पिकाला तंत्रज्ञानासंदर्भात माहिती घेतली. या वर्षीदेखील पपईला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत वापरणार आहे.