उच्च शिक्षीत शास्त्रज्ञ आधुनिक शेतीकडे !

डॉ. शिरीष फडके, (M.Sc.Ph.D.) H.O.D.,
instrumentation, Pune University. (Rd.)
१०११, मित्रनगर, पुणे -४११०१६.
मो. ९८८१२३८४८६


आमची शेती कोळवण (मुळशी) जि. पुणे येथे आहे. त्यामध्ये केशर आंब्याची ४ वर्षाची झाडे आहेत. तर त्यांना फळे द्राक्षाच्या घोसासारखी भरपूर येतात. याची कोय अतिशय पातळ पुठ्ठ्यासारखी आहे. १ किलोत ५ आंबे बसतात. गोडी व चव अतिशय चांगली आहे. ज्यांना ज्यांना ही फळे खायला दिली ते लोक म्हणतात. "आंबा कोठून आणला?" तेव्हा त्यांना सांगावे लागते, हा आमच्याच शेतातील आंबा आहे. प्रत्येक झाडावरून ५० - ६० फळे मिळतात. झाडाचा घेर लहानच असून बुंधा १० ते १२ इंच जाडीचा आहे. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी गेल्या ४ वर्षापासून वापरतो. कल्पतरू सेंद्रिय खतदेखील वापरतो. त्यामुळे दर्जा चांगला मिळत आहे.

मात्र आंब्यामध्ये मुख्य समस्या अशी आहे की, ह्या आंब्याला उशीरा जुनमध्ये पाड लागतो. त्यामुळे फळ दर्जेदार असूनदेखील हा आंबा पाऊस पडल्यानंतर येत असल्याने तोपर्यंत लोक आंब्याला कंटाळलेले असतात, कोणी खात नाहीत. मग फळांना भाव मिळत नाही. फळे वाया जातात.

यावर सरांना आज (८ सप्टेंबर २०१३) याचे कारण व सल्ला विचारला असता सरांनी सांगितले मुळशी भागात थंडी एकसारखी पडत नाही आणि थंडी पडली तरी ती उशिरा पडते. त्यामुळे मोहोर उशीरा लागतो. परिणामी आंब्याला पाडदेखील उशीरा जूनमध्ये लागतो.

याकरिता आपण चालूवर्षी सप्टेंबरपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून मोहोर लवकर आणू. म्हणजे पाड लवकर लागून मार्केटमध्ये लवकर आंबा येईल.

आमच्यापासून १ किलो अंतरावर सत्य साईबाबांचे ट्रस्टचे मंदिर आहे. तेथे ६०० एकर जमीन आहे. त्यातील आंब्यांना रासायनिक औषध (कल्टार) खतामुळे की काय ? पण फळे लवकर येतात. यावर सरांनी सांगितले रासायनिक प्रक्रियेमुळे झाडांपासून तात्पुरते उत्पदान मिळते. मात्र कालांतराने झाडे निकामी होतात. असा कोकणातील बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कोकणात भाडे तत्वावर घेतलेल्या आंबा बागांना व्यापारी कल्टार वापरून झाडापासून उत्पादन घेतात. मात्र पुढे झाडांना ५ - ५, १० - १० वर्षे फळे लागत नसल्याने शेतकऱ्यांवर बाग सोडून देण्याची वेळ आती. तेव्हा आंब्याला बहर लागण्यासाठी कल्टारचा वापर कधीच करू नये.

नरेंद्र - ७ आवळ्याची २५ झाडे असून फळे मोठे आहे. आंब्याप्रमाणे आवळ्याच्या बाबतीतही समस्या आहे, ती अशी की आवळा हा लवकर पावसाळ्यात येत आहे आणि मुळशी भागात पाऊस भरपूर असतो. यामध्ये अती पावसात फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच पावसाळ्यात आलेल्या मालाला भाव मिळत नाही. ५ रू. किलो भावाने आवळा विकायची वेळी माझ्यावर आली. तोच आवळा इतरवेळी १५ रू. पावने बाजारातून घ्यावा. लागतो.

तेव्हा आवळ्याबद्दलही जेणेकरून फळे पावसाळ्यानंतर उशीरा येतील असे मार्गदर्शन करा. यावर सरांनी सांगितले. आपण सप्तामृत फवारताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम व प्रोटेक्टंटवर जादा भर देऊन राईपनर व न्युट्राटोन उशीरा व कमी प्रमाणात फवारा म्हणजे फळे उशीरा मिळतील.

मुलाखती दरम्यान या नरेंद्र आवळ्याचे जनक यांचे विषयी सरांनी एक आठवण सांगितली डॉ. नरेंद्र पाठकांनी नरेंद्र - ७ हा आवळा विकसीत केला तो काळ (पर्व) आवळा लागवड व प्रक्रिया उद्योगाचे होते. तेव्हा देशभरचे शेतकरी त्यांना नैनीतालला भेटायला येत, तेव्हा ते शेतकऱ्यांना विचारत, "आपण आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी कोठे जाता, कोणाचा सल्ला घेता ?" तेव्हा बऱ्याचा शेतकऱ्यांनी सांगितले, आम्ही डॉ. बावसकर सरांना भेटून त्यांचे तंत्रज्ञान वापरतो. इस्राईलच्या प्रदर्शनात १९९६ साली डॉ. नरेंद्र पाठक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले मला तुम्हाला भेटायला यायचे होते. पण योगयोग बघा आपली इस्राईलमध्ये भेट झाली. तेव्हा त्यांनी वरील आठवण मुद्दाम सांगितली.

माझ्याकडे चिंच प्रतिष्ठानची १० झाडे ६ वर्षाची आहेत. ६ इंच लांबीच्या विळ्याच्या आकाराच्या भरपूर चिंचा लागतात. लाल पेरू देखील अतिशय चांगला आहे. यासर्व फळबागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. आज यासाठीच कल्पतरू ५० किलोच्या ३ बॅगा व सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी प्रयोग कराणार आहे.

सरांनी विचारले आपण भातशेती करता का ? यावर मी सांगितले मी फळबाग सोडून काहीच करीत नाही. कारण अलीकडे मजूर मिळत नाही. आज मजुरांना २५० रू. हजेरी तर बाईला १५० ते २०० रू. हजेरी झाली आहे. शिवाय ते १० वाजता शेतावर येऊन मध्ये १ तास जेवणास सुट्टी व ६ वाजता घरी जातात. यामध्ये समाधानकारक काम होत नाही. तेव्हा फक्त फळबागेवर लक्ष केंद्रीत केले आहे.