सर्वांचे टोमॅटो प्लॉट पत्ती गेल्याने वाया गेले माझे नुसतेच निरोगी नव्हे तर आश्चर्यकारक दर्जेदार अधिक उत्पादन !

श्री. नानासाहेब एकनाथ ठाकरे,
मु. पो. साळसाणे , ता. चांदवड, जि. नाशिक.
मोबा. ९५५२१३९९२३


मी टोमॅटोच्या १३८९ वाणाची ३ फुट अंतरावर १ एकरवर लागवड व १५ गुंठे २५३५ ची लागवड केली. माझा चालू वर्षींच्या टोमॅटोचा अनुभव विलक्षणीय आहे. तो वेगळा असण्यामागे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यामुळे व तो वापरण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे व संतोष अॅग्रो एजन्सीज् चांदवडचे श्री. बाबाजी पिंपरकर, चालू वर्षी मी ८ जून २०१३ रोजी १ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. पण मनामध्ये भिती होती. दरवर्षीप्रमाणे आपला प्लॉट जास्त दिवस टिकेल का, कारण दर वर्षी पत्ती टिकट नव्हती. अपेक्षेप्रमाणे फळधारणा होत नव्हती. पाण्याची कमतरता होती. त्यामुळे प्लॉट लवकर निकामी होत असे. यावर काय उपाय करावा याचा मनावर ताण होता. योगायोगाने प्रतिनिधी शिंदेची भेट झाली. त्यांनी प्लॉटवर येऊन पाहणी केली व जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली १०० लि. पाण्यासाठी घेऊन फवारणी करण्यास सांगितले व जर्मिनेटर १ लि. ड्रिपद्वारे सोडण्यास सांगितले. परिणामी फुटवे, वाढ फुलधारणा भरपूर होऊन, पत्ती जाड, रुंद काळोखी येऊन प्लॉट विलक्षण बदलून गेला व प्रतिनिधी शिंदेन फोन करून बोलावून घेतले. नंतर कल्पतरू ४ बॅगा टाकून मातीआड केले. परिणामी पावसाने इतरांच्या प्लॉटची पत्ती खराब होऊन प्लॉट वाया गेले पण माझा प्लॉट आजही पत्ती व काळोखी जबरदस्त आहे. मुळी चांगल्याप्रमाणे चालते हे कल्पतरू खताने शक्य झाले. नंतर हार्मोनी स्ट्रेप्टोसायक्लिनचा स्प्रे घेतला, परिणामी प्रतिकूल वातावरणात करपा आलाच नाही. वाढ होण्यासाठी व व्हायरससाठी प्रिझम व न्युट्राट्रोन चा स्प्रे घेतला. चमत्कार असा झाला की, जबरदस्त फुटवे, फुलकळी मिळाली व बोकड्या आलाच नाही, मला डॉ. बावसकर सरांचे सर्व तंत्रज्ञान खुपच आवडले व ते मी कधीही विसरणार नाही. फुगावणीसाठी थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर + न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली १०० लि. साठी घेऊन दर ८ दिवसांनी फवारणी करतो. परिणामी फुगवण होऊन मालाला चमक येते. व माल टणक राहतो. फुलकळी अधिक प्रमाणात निघते. ऑगस्ट अखेर मार्केटला २०० रू./कॅरेट टोमॅटो गेला. सरासरी ३१५ रू./कॅरेट भाव मिळाला. इतरांपेक्षा माझ्या प्लॉटची पत्ती अजूनही चांगली आहे व इतरांचे प्लॉट पुर्णपणे खराब झाले. माझ्या अंदाजाप्रमाणे अजून १५०० ते १८०० कॅरेट टोमॅटो निघेल. आताशी माल विक्रीस सुरुवात केली आहे. दर ८ दिवसांनी मी थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर + न्युट्राटोनचा स्प्रे घेतो. त्यामुळे मला भरपूर उत्पन्न मिळणार याची खात्री आहे.