गारपिटीत नुकसान, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या मदतीने परत यशस्वी फळबाग

श्री.शांताराम शिवराम पोमण,
मु.पो. पिंपळे (पोमणनगर), ता. पुरंदर, जि. पुणे,
मोबा. ९८२२८३०३९२


माझ्याकडे ललीत अलाहाबादी लाल पेरूची १२० झाडे आहेत. सिताफळ ७५ झाडे, भगवा ७५ झाडे आहेत. डाळींबाची डिसेंबरमध्ये छाटणी करून कल्पतरू सेंद्रिय खत दिले होते. त्यानंतर फुलकळीसाठी सप्तामृताची १ फवारणी केली होती. फळांचे सेटिंग चांगले झाले होते, मात्र लिंबाच्या आकाराची फळे असताना १७ एप्रिल २०१४ ला गारपिटीने डाळींब, सिताफळ, पेरूची फळे फुटली, तडकली. साल खराब होऊन नुकसान झाले. तेव्हा तो सर्व फळे तोडून टाकून डाळींबाची पुन्हा छाटणी करून मृग बहार धरला. त्याला सप्तामृताची एक फवारणी केली. कल्पतरू फेब्रुवारी मध्येच दिलेले होते. त्यामुळे पुन्हा ते दिले नाही.

सप्तामृतामुळे नवीन फूट व्यवस्थित होऊन फुलकळी भरपूर लागली होती. सध्या फळांचे सेटिंग झाले आहे. ती फळे पोसण्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेतले. सरांनी सांगितले "यासाठी थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १ लि., राईपनर ५०० मिली, न्युट्राटोन १ लि., हार्मोनी ३०० मिली २०० लि. पाण्यातून फवारा व जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाण्यातून सोडा. त्यानंतर १० ऑगस्टपर्यंत तिसरी व २० ते २५ ऑगस्टपर्यंत चौथी फवारणी करा. म्हणजे ही फळे नवरात्रात चालू होतील. गारपीट झाली नसती तर माल आताच चालू झाला असला." सरांनी सांगितल्याप्रमाणे फवारण्या झालेल्या आहेत. झाडे दिड वर्षाची लहान असून सद्या (१० सप्टेंबर २०१४) प्रत्येक झाडावर १० ते १५ फळे धरलेली आहेत. ती २०० ते ३०० ग्रॅमची आहेत. हा पहिलाच बहार आम्ही ट्रायल म्हणून घेतला आहे. झाडे लहान असल्याने उत्पादनाची फारशी अपेक्षा नसतानाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बहार चांगला लागला आहे.

माझ्याकडे याखेरीज बहाडोली जांभूळ, नारळ, आंबा, चिकूची प्रत्येकी २५ - ३० फळझाडे आहेत. तसेच २०० - ३०० 'सिद्धीविनायक' शेवगादेखील लावायचा आहे. आज (१७ जुलै २०१४) सरांच्या मार्गदर्शनानुसार फळांच्या फुगवणीसाठी सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.