दिवाळीस हळव्याची लागवड तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कांदा अधिक व लवकर, बाजारभाव व नफाही अधिक

श्री. संगमेश्वर प्रल्हाद साखरे,
मु.पो. काटगाव, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद.
मोबा. ९८९०८२८३४६



मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर गेल्या २ - ३ वर्षापासून कांदा पिकावर करत आहे. मी मागील वर्षी दीपावलीच्या सुमारास हळवा पंचगंगा सुपर या जातीच्या कांद्याची पाऊस एकर क्षेत्रात लागवड भारी काळ्या जमिनीत केली होती. पाऊण एकर क्षेत्रास डी.ए.पी. ३ बॅगा व कल्पतरू खत २ बॅग मिसळले होते.

बियाण्यावर जर्मिनेटर ची बिजप्रक्रिया केली होती. त्यामुळे कांद्याच्या बियाण्याची उगवण १००% झाली होती व रोपे हिरवीगार दिसत होती. माझ्याआधी शेजारच्यांनी लागवड केलेला कांदा पिवळा दिसत होता. मी वाफ्यावर लागवड करताना रोपे जर्मिनेटर मध्ये बुडवून लावली होती. लागवडीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटरची आळवणी व जर्मिनेट, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली १५ लि. च्या पंपाला घेऊन दाट फवारणी केली. नंतर दुसरी फवारणी सप्तामृताची १५ - २० दिवसांच्या अतराने घेतली. दुसऱ्या फवारणीला प्रति पंपाला ६० मिली सप्तामृताचे प्रमाण घेतले होते. फवारणी नंतर कांदा तजेलदार दिसत होता. वाढही चांगली होऊन पात हिरवीगार दिसत होती. शेवटच्या टप्प्यात सप्तामृताच्या २ फवारण्या घेतल्या, त्यामुळे कांद्याची साईज मोठी झाली. एक कांदा १५० ते २०० ग्रॅमचा भरत होता. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून पाऊण एकर क्षेत्रातून १०० बॅगा कांदा प्रथमच काढला. कांदा वजनदार असल्याने ५५ ते ६० किलो पिशवीचे वजन भरत होते. मला पहिल्यांदाच कमी खर्चात उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळाले.

हैद्राबाद मार्केटमध्ये कांद्याचे ५० हजार

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपला कांदा बाजारात इतरांच्या कांद्यापेक्षा उठून दिसत होता. त्यामुळे इतरांना १००० रू. क्विंटल भाव असताना आम्हाला ११०० ते ११५० रू. /क्विंटल भाव म्हणजे १०० ते १५० रू. भाव आपल्या कांद्याला हैद्राबाद मार्केटमध्ये जास्तच मिळत होता. मला पाऊण एकर क्षेत्रातून खर्च वजा करता ५० हजार रू. उत्पन्न मिळाले. कांदा या पिकास संपूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने रोप लागवडीपासून अवध्या ७५ ते ८० दिवसात कांदा काढणीस आला.

प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवगा पुस्तक नेले होते. त्याचा अभ्यास करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ऑफिसला भेट देऊन 'सिद्धीविनायक' शेवगा बियाची ८ पाकिटे आणि जर्मिनेटर बीजप्रक्रियेस घेतले. त्याची फेब्रुवारी २०१४ मध्ये ८' x ७' वर मध्यम मुरमाड प्रतिच्या जमिनीत लागवड केली. ६ - ७ महिन्यात झाडे ७ - ८ फूट उंच झाली आहेत. याला शेणखत २ ट्रॉली, लेंडीखत १ ट्रॉली आणि डी.ए.पी. ५० किलो दिले आहे. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करण्यास उशीर झाला.

सध्या फुले लागली आहेत. त्याची गळ होत आहे व पाने पिवळी पडली आहेत. लागलेल्या शेंगा खालून वाळत आहेत व झाडाचे शेंडे करपत आहेत. यासंदर्भात सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. संपुर्ण महाराष्ट्रात सरांचे शेवग्यावरील काम मोठे आहे. शेवग्याला सोलापूर मार्केटमध्ये किरकोळ विक्रीस जास्त मागणी असते.