गरव्या कांद्याचा फोकून केलेला प्रयोग, कांद्यानंतर आले लागवडीचा प्रयोग
श्री. तानाजी नारायण सुर्यवंशी,
मु.पो. बुध, ता. खटाव, जि. सातारा ४१५५०३,
मो. ९९२२९३१४३१
औरंगाबादहून आले बेणे आणून त्याची लागवड १४ मे २०१५ रोजी सव्वा एकरात केली आहे. जमीन
भारी काळी असून पाणी ठिबकने देत आहे. तसेच गरवा कांदा फोकून करण्याचा प्रयोग सव्वा
एकरमध्ये (२० जून २०१५) केला आहे.
आल्याचा प्लॉट सध्या ३ महिन्याचा आहे. मात्र यातील १०% आल्याची वाढ खुंटली आहे. पाने पिवळी पडली आहेत. शेंडा करपत आहे, यासाठी सरांचे मार्गदर्शन व तंत्रज्ञान घेण्यासा आज (२२ ऑगस्ट २०१५) आलो आहे. आमचे मित्र शिवाजी अनपट हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. त्यांनी मला याविषयी माहिती दिली.
आल्याच्या समस्येसंदर्भात सरांनी मला विचारले, आले लागवडीपुर्वी या जमिनीत कोणते पीक होते. तेव्हा सरांना सांगितले कांदा पीक घेतले होते. त्यावर सरांनी सांगितले, "अशी परिस्थिती उद्भवण्याचे हेच मुख्य कारण आहे. कारण आले हे जमिनीत वाढते व कांदादेखील जमिनीतच वाढतो. तेव्हा फेरपालटीमध्ये जमिनीत येणारी एकाच प्रकारची म्हणजे कांदा, बटाटा, रताळी, बीट, लसूण, आले, हळद अशी पिके फेरपालटीत (पाठोपाठ) घेऊ नयेत. कारण पहिल्या पिकावरील कीड, रोगराई त्याच वर्गातील पुढील पिकावर झपाट्याने वाढते. आले हे संवेदनशील पीक आहे. यामध्ये रायझोबीयम स्पॉट म्हणजे आले सडण्याचे अनुवंशिक गुण असतात. तसेच कांदा देखील इतका संवेदनशील आहे की २ तासांचे जरी ढगाळ वातावरण असले तरी कांदा करपा, टाक्या रोगाला बळी पडतो. तेव्हा आल्यावर कांदा किंवा कांद्यावर आले लावू नये."
आम्ही हे बेणे औरंगाबाद वरून आणले होते व ज्यांनी - ज्यांनी तेथून बेणे आणले त्यांच्यादेखील प्लॉटवर असाच कमी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आहे. तेव्हा यावर सरांनी सांगितले, " आल्यातील प्लॉटमध्ये काही ठिकाणी पंजातील काही कुड्यांना पाणी कमी पडले किंवा आले उघडे राहिले किंवा अन्नद्रव्य कमी पडल्यास कुडी अर्धवट सुकलेली, कमकुवत राहते. तेव्हा अशा कुड्या बेणे म्हणून वापरल्या (दिल्या) असल्यास हा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता यावर उपाय म्हणून आल्याला कल्पतरू सेंद्रिय खत ४ ते ५ बॅगा देऊन जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ५०० मिली + कॉपरऑक्सीक्लोराईड १ किलोचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग (आळवणी) करा. जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १।। लि. + प्रोटेक्टंट १ किलो + प्रिझम १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. म्हणजे प्लॉट दुरुस्त होईल. तसेच १५ दिवसांनी पुन्हा प्लॉटमध्ये वेगवेगळ्या ३ - ४ ठिकाणचे दक्षिणेकडील आले उपटून दाखविण्यास आणणे म्हणजे पुढील मार्गदर्शन करता येईल. माती परिक्षण केले असल्यास त्याचा अहवाल घेऊन येणे. "
सर, मी गरवा कांदा फोकून करण्याचा प्रयोग सव्वा एकरमध्ये केला हे. हा कांदा १० जून २०१५ ला फोकला आहे. यावेळी आमच्या भागात हळवा कांदा फोकून करतात मात्र मी गरवा कांदा फोकून करत आहे हे पाहून लोक वेड्यात काढत होते. मात्र हा माझा प्रयोग असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले.
कांद्यासाठी प्रथम साधारण ३ फुट रुंदीचे सारे पाडून त्यामध्ये बी कोकले जाते. बी फोकण्यामध्ये आमच्या भागातील काही माणसे अतिशय प्राविण्य आहेत. ते त्यांच्या कुशलतेने अगदी रोपे लावल्याप्रमाणे सर्वत्र एकसमान बी फोकतात. बी फोकताना त्यामध्ये १:१ प्रमाणात युरीया मिसळतात व युरीयामुळे साऱ्यामध्ये मागे मागे सरत हे बी फोक्ल्यावर प्रमाणशील सारखे पडले आहे हे समजते. हे काम वारा नसताना केले जाते. सरांनी सांगितले, "हे बी फोकण्याचे काम एक तर सकाळी किंवा ४.०० वाजल्यानंतर करावे आणि बी फोकल्या - फोकल्या त्याच दिवशी पाणी द्यावे लागते, नाहीतर एका रात्रीत मुंग्या हे बी गोळा करतात मुंग्यांना हे काळे बी हलके व उचलायला सोपे जाते."
१ एकर कांदा फोकण्यासाठी ७०० रू. दिले जातात. हा कांदा अतिशय अप्रतिम आला आहे. अगदी पुनर्लागणीच्या कांद्यासारखी एकसारखी, समान अंतरावर रोपे दिसत आहेत. हा कांदा २ महिन्याचा असून गाठी धरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता तो करपत आहे. तेव्हा सरांनी सांगितले, "सध्या (ऑगस्ट) हवामानातील बदलाने पाऊस नसल्याने, हवेत थोडी आर्द्रता व दिवसातील तापमानातील विषमता यामुळे शेंडा पिवळा पडत आहे. अशा परिस्थितीत शेंडा करपतो. त्यात बारीक होल पडण्याची शक्यता आहे. तेव्हा कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तर करपा जाऊन एरवी बी टाकून रोपे लागवडीच्या कांद्याला जो ४ ते ४।। महिन्याचा काळ लागतो. त्यामध्ये १ ते १।। महिन्याचा काळ कमी होऊन हा २ महिन्याचा गारवा कांदा अजून २ महिन्यांत म्हणजे एकूण ४ महिन्यात काढणीस येईल. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरलेला कांदा डबल, टिबल पत्तीचा, गिर्रेबाज, गोल्टी, वजनदार मिळतो. ४० किलोच्या पिशवीत ५० किलो मावतो. साठवणीत काजळी येत नाही. कोंब फुटत नाही. असा दर्जेदार टिकाऊ कांदा मिळतो. त्यामुळे असा कांदा इतरांच्या पेक्षा अधिक (१ नंबर) भावाने विकला जातो. "
"आपल्या कांद्यासाठी आता पाण्याचा ताण सहन करून करपा रोग, आटोक्यात येऊन त्याचे पोषण होण्यासाठी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १।। लि. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० मिली + मावा किंवा वफा पडू नये म्हणून स्प्लेंडर ४०० मिली २०० लि. पाण्यातून फवारा. त्यानंतर १५ - १५ दिवसांनी पुन्हा दुसरी व तिसरी फवारणी थ्राईवर १ लि. क्रॉपशाईनर १।। लि. राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारण्या घ्या. म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे मध्यम आकाराचे पण वजनदार कांद्याचे उत्पादन मिळेल. अशा ८० ते १५० ग्रॅम वजनाच्या कांद्याला संसारी कांदे संबोधतात. बाजारात अशा कांद्याला जादा मागणी असते." असे सरांनी सांगितले.
अशा प्रकारचा फोक कांदा, मोरगाव, सुपे, पारनेर या भागात करतात. मात्र हा हळवा कांदा असतो. हळव्या कांद्याला ज्या शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली त्यांचा हळवा कांदा डबल पत्तीचा, आकर्षक चमक असलेला, वजनदार मिळाल्याने असा कांदा गाळ्यावर विक्रीस आणला असता दलालाने याला गरवा कांदा समजून गरव्या कांद्याचा भाव दिला. एवढा दर्जेदार कांदा तयार होतो.