उसास ताण व अधिक पाणी तरी लागणीचा ऊस व खोडवा दर्जेदार व अधिक टणेज, डाळींबास दर्जेदार फळे (अरली हस्तासाठी) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर
श्री. रणजित रघुनाथ गायकवाड,
मु.पो. कोऱ्हाळे, ता. बारामती, जि. पुणे.
मो.
९८२२००१३६८
मी नंदन डेअरी बारामती येथे इंजिनिअर असून माझी पत्नी सौ. दिपाली, मो. ९८५००८२९१२ ह्या
(बी. एच. एम. एस.) डॉक्टर आहेत. आम्ही दोघेही बारामती येथे राहत असून दोघांनाही शेतीची
आवड असल्याने आम्ही शेतीदेखील करतो. एकूण ७ एकर जमिन आहे. ४ - ४।। एकर ऊस असतो. १।।
एकरमध्ये डिसेंबर २०१३ ला १३' x १०' वर भगवा डाळींब लावले आहे. गेल्या ६ वर्षापासून
डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे दोघांचे व्यवसाय सांभाळून अर्धवेळामध्ये मजुरांची कमतरता
असतानादेखील यशस्वीरित्या शेती करीत आहोत.
आडसाली ऊस १ जुलै ची जोडओळ पद्धतीने लागण असते. मध्ये ५ - ६ फुटाचा पट्टा असतो. या उसाला कल्पतरू सेंद्रिय खत एकरी बाळ बांधणीला ४ - ५ पोती आणि पक्क्या बांधणीला ७ - ८ पोती देतो. लागवडीच्यावेळी २ डोळ्यांच्या कांड्या जर्मिनेटर १ लि. + बाविस्टिन ५०० ग्रॅम + २०० लि. पाणी या द्रावणात बुडवून ओली लागण करतो. त्याने ८ दिवसात पुर्ण उगवण होते. सप्तामृत सुरुवातीच्या ३ - ४ महिन्यात दर महिन्याला फवारतो. आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल अनुभवले की, उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसला की, इतरांचा ऊस सुकतो, वाळतो. मात्र आम्ही जर्मिनेटर, थ्राईवर, क्रोपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट ३ ते ४ वेळा फवारले आणि १ - १ महिना जरी पाणी नसले तरी ऊस हिरवा राहतो. रान अतिशय हलके, मुरमाड आहे तरी उसाचा ७० ते ७५ टन उतारा मिळतो.
गेल्यावर्षी आडनिड (अवेळी, अती) पाऊस झाला. इतरांचा ऊस पिवळा पडला. वाढ मंदावली. आम्हाला वाटले आता आपल्या उसाचाही उतारा मार खाणार. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या व कल्पतरू खताचा वापर असल्याने उलट ऊस जोमाने वाढला. हा ऊस मार्चला तुटला तरी ७० टनाचा उतारा मिळाला.
आता या खोडव्याला बाळ बांधणीला ६ - ७ पोती आणि डाळिंबाचा पहिला बहार धरण्यासाठी डाळींबाला १५ पोती कल्पतरू खत दिले आहे. उसाला आतापर्यंत सप्तामृताच्या ३ फवारण्या केल्या आहेत. सध्या हा खोडवा ५ फुटाचा आहे. तसेच नवीन १ जुलै २०१५ च्या लागणीचा ऊस जर्मिनेटरच्या बेणेप्रक्रियेमुळे कोंब पिळदार निघून एकसारखी वाढ दिसत आहे. आता सध्या त्याचे हातभर उंचीचे फुटवे दिसत आहेत.
आज (१८ ऑगस्ट २०१५) या उसाला व डाळींबाचा बहार यशस्वी होण्यासाठी सरांचे मार्गदर्शन व सप्तामृत औषधे घेण्यास पुण्याला आलो आहे. एकदम माळरानात हे डाळींब आहे. जैनची ठिबक आहे. प्रत्येक झाडाला २ ड्रीपर आहेत. दररोज २ - ३ तास (तासाला ८ लि. पाणी) ठिबक चालवितो.
सध्या फुट चांगली झाली असून कळी निघण्यास सुरुवात झाली आहे. झाडावर साधारण ५० - ६० फळे धरायची आहेत. तेव्हा सरांनी सांगितले, "तुम्ही डाळींबाला कल्पतरू १५ पोती दिलेले आहेच, आता खोडाला वाळवी किंवा इतर किड लागू नये म्हणून चुना १ किलो, मोरचूद १ किलो, गेरू (काव) १ किलो आणि प्रोटेक्टंट १ किलोचे २० लि. पाण्यात द्रावण तयार करून तागाच्या कुंच्याने त्याची खोडाला पेस्ट लावा. तसेच फुलकळी निघण्यासाठी जर्मिनेटरचे (१ लि. २०० लि. पाण्यातून) ड्रेंचिंग करा आणि जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. म्हणजे फुलकळी जोमाने निघून ती गळणार नाही व हा अर्ली हस्त बहार यशस्वी होण्यासाठी पुढील फवारण्या देखील शिफारशी प्रमाणे (डाळींब पुस्तकात दिल्याप्रमाणे) घ्या. काही समस्या असल्यास फोनवरून मार्गदर्शन घ्या. अशा पद्धतीने आपण प्रत्येक झाडावर ५० - ६० फळे धरून त्यापैकी १० त १२ फळे सुपर साईज व १० ते १५ फळे १ नंबर क्लॉलिटीची तसेच १५ ते २० मध्यम आणि १० - १२ फळे लहान आकाराची अशी मिळतील."
आम्ही गेल्या हंगामात या डाळींबामध्ये हरभरा व गव्हाचे आंतरपीक घेतले होते. ६- ६ इंचावर हा इगल-२५ वाणाचा गहू जर्मिनेटरची प्रक्रिया करून टोकला होता, तर त्याला फुटवे जबरदस्त निघाले. पुढेही सप्तामृताच्या ४ फवारण्या केल्याने गव्हाचा उतारा वाढला. १।। एकर डाळींबात १ एकर गहू व अर्धा एकर हरबरा केला होता. तर एकरात २५ पोती गहू आणि गावरान हरभरा ३ ते ४ पोती झाला. विशेष म्हणजे या गव्हाची चपाती मऊ होते आणि चवीला चांगली लागते, हे आम्ही अनुभवले.
सरांनी सांगितले, "गव्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यानंतर शेतकऱ्यांना अनुभव असा आहे की, या गव्हाचा कोंडा कमी निघतो. त्यामुळे एवरी कोंड्यातून वाया जाणारे जीवनसत्व (बी -१२ ) चपातीत येते. ह्या गव्हाची पोळी करताना तेल कमी लागते. जळण (गॅस) कमी लागते. चपाती लवकर फुगते. ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मऊ राहते. चविष्ट लागते. तसेच हरबऱ्यामध्ये पारंपारिकतेने ९० ते ९५% डहाळे पक्व होतात व ५ ती १० % हरबरा काढणीच्या अवस्थेतही हिरवाच राहतो. त्याचे घाट्यातील हरबारे बारीक व निकृष्ट प्रतीचे मिळतात. अशा वेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १००% हरबऱ्याचे डहाळे पक्व होऊन हरभरा मोठा, वजनदार, हातात घेतल्यावर लोखंडाच्या मण्यासारखे जाणवतात." पुढे सरांनी सांगितले की, "डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधन केद्रावर तूर लावली होती तर ती १४१ किलो निघाली, त्यापासून १२५ किलो डाळ तयार झाली. विद्यापीठ सांगते, ७५% डाळ मिळते. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हे प्रमाण वाढून ८५% तुर डाळ मिळाली."