२५० डाळींब पहिल्या वर्षी ५।। टन उत्पादन, ३ लाख

श्री. चंद्रकांत निवृत्ती खेतमाळीस,
मु.पो. पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मो. ७८७५६२६३२६


माझ्याकडे एकूण ४ एकर जमीन आहे. त्यामधील सव्वा एकरमध्ये द्राक्ष, सव्वा एकरमध्ये डाळींब, अर्धा एकरमध्ये लिंबू आणि १ एकरमध्ये इतर पिके असतात.

भगवा डाळींबाची लागवड हलक्या जमिनीत १३' x ८' वर ४ वर्षापूर्वी केलेली आहे. याला ठिबकने पाणी देतो. आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी माहिती डिसेंबर २०१४ मध्ये प्रदर्शनातून मिळाली. त्यावेळी आम्हाला या भगवा डाळींबाच्या सव्वा एकरमधील ४२० झाडांपैकी २५० झाडांचा दुसरा बहार धरायचा होता. त्यामुळे या तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेऊन वापर करण्याचे ठरविले. डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यान बागेस ताण दिला होता. जानेवारी अखेरीस बागेची छाटणी करून खते देऊन पहिले पाणी सोडले. तेव्हा जर्मिनेटर १ लि. १०० लि. पाण्यातून २५० झाडांना ड्रीपद्वारे सोडले आणि आठवड्यानंतर जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी ५०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारले.

ड्रेंचिंगमुळे पांढऱ्या मुळ्यांची प्रमाण वाढले, तसेच फवारणी व ड्रेंचिंगमुळे फुटवा जोमाने होऊन पाने हिरवीगार रुंद व टवटवीत निघाल्याने बाग सतेज दिसत होती. त्यानंतर साधारण १ महिन्यानी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची फवारणी केली असता फुलकळी निघण्यास सुरुवात झाली. १५ - २० दिवसात फुळकळीचे प्रमाण वाढून गळ झाली नाही. प्रोटेक्टंटमुळे मधमाश्यांचे प्रमाण वाढून फुलकळीचे सेटिंग चांगले झाले. त्यामुळे झाडांवर ८० ते १०० फळे धरता आली. त्यानंतर दर १५ - २० दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन फवारात होतो. यामुळे माझ्या डाळींब बागेवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. फळांचे पोषण ३०० पासून ५०० ते ६०० ग्रॅम पर्यंत झाले. फळांना (आतील दाणे व सालीस) आकर्षक, लालभडक कलर आला. सालीला चमक होती, त्यामुळे व्यापारी जागेवर बाग पाहण्यास येत होते. उत्कृष्ट प्रतीचा माल असल्याने व्यापाऱ्यांनी जागेवरून ४८ रु./किलो दराने डाळींब खरेदी केले. २५० झाडांपासून ५।। टन उत्पादन मिळाले. अशा प्रकारे ३ लाख रु. चे उत्पन्न २५ ते ३० गुंठ्यातून मिळाले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर ३० हजार रु. खर्च करून पहिल्याच वेळी हा अतिशय जबरदस्त अनुभव मिळाल्याने चालूवर्षी सध्या (सप्टेंबर २०१६) पाऊस असल्याने ऑक्टॉबरमध्ये बहार धरायचा आहे. त्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे.