२ गुंठे गवार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खर्च २५०० रु., नफा १८ हजार म्हणून भात, सोयाबीन, मिरची, भुईमूग, तंबाखू पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर

श्री. प्रकाश रावसाहेब बोंगार्डे,
मु.पो. अर्जुनी, ता. कागल, जि. कोल्हापूर - ४१६२१८,
मो. ९६८९७४५००२


मी साई सर्व्हिस (मारुती सुझुकी) उद्यमनगर, कोल्हापूर येथे (इलेक्ट्रीशन) म्हणून गेली ५ वर्षे कार्यरत आहे. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द होती. शेती ६ एकर पण कोरडवाहू आहे. म्हणून २०१६ मध्ये विहीर खोदून पाण्याची सोय केली. पण एप्रिल - मे दरम्यान पाणी कमी पडत असल्यामुळे मी एप्रिलमध्ये फक्त २ गुंठेच गवार लावली.

वाचनाशी आवड असल्याने नवीन मासिके व अंक घेत असताना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा 'कृषी विज्ञान' अंक माझ्या वाचण्यात आला व तो मला आवडला. त्यानंतर तो मी नियमित घेण्यास सुरुवात केली. त्यातील माहिती व शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर खुपच प्रभावित झालो. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथून गवारीचे ३ पाकिटे बी आणले. यावेळी त्याला लागणाऱ्या औषधाच्या फवारणीसाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली घेवून गेलो.

एप्रिल २०१७ मध्ये गवारीचे बी सरीवरती टोकून पाट पद्धतीने १० दिवसांनी पाणी सोडले व दर १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली १५ लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी केली.

गवारीची शेंग लहान (अरूंद) व लांब, चवीला चांगली असल्यामुळे गावामध्येच चांगली मागणी होती. तसेच निपाणी बाजारपेठ जवळ असल्याने तेथे गवार स्वतः विकली. इतर गवारीस ३५ रु. किलो ते ४५ रु. किलो दर असताना आम्ही मात्र मात्र ५० ते ६० रु. किलो दराने गवार विकली जात असे. गवारीचे पीक प्रत्येक तिसऱ्या दिवशी तोडायला येत होते. २० ते २५ किलो शेंग मिळत असल्याने चांगला फायदा झाला. यासाठी खर्च २५०० रु. आला व नफा १८,००० रू. झाला. त्यामुळे आता मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची सर्व औषधे भात, सोयाबीन, मिरची, भुईमूग व तंबाखु या पिकांवर वापरात आहे.