दुष्काळी बीड जिल्ह्यात उन्हाळी ३ एकर टोमॅटो, ५ हजार क्रेट, तेजी दर १२०० ते १६०० रु./ क्रेट उत्पन्न ६० लाख रु. अजून १५०० क्रेट निघून सरासरी ५०० रु./ क्रेट ने ७।। लाख होतील

श्री. उद्धव सोमीनाथ बावणे,
मु.पो. लिंबागणेश, ता. बीड, जि. बीड - ४३११२६.
मो. ८३०८३९९१०१


माझ्याकडे एकूण २५ एकर जमीन आहे. त्यामध्ये खरबुज, शिमला मिरची टोमॅटो, कांदा अशी व्यापारी पिके घेण्याचा मला छंद आहे. मार्केटला दररोज भाजीपाला नेण्यासाठी माझी पिकअप गाडी आहे. त्यामुळे मला पुणे मार्केट करता आले.

चालू वर्षी १ एप्रिल २०१७ ला ३ एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली. यासाठी सिंजेंटा कंपनीची वैशाली - १०५७ ही जात निवडली. जमीन मध्यम प्रतिची असून लागवड ६' x १।' फुटावर मल्चिंग पेपरवर आहे. ही लागवड ऐन उन्हाळ्यातील असल्याने आणि मल्चिंग पेपर वारपल्याने रोपाभोवती उष्णता निर्माण झाल्याने रोपाच्या खोडाला करकोचा (Collor Rot) पडून रोपे मरू लागली.

मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा २०१२ पासून चांगला अनुभव आहे. त्यामुळे मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधींशी (श्री. सतिश बुरंगे, मो. ८३०८८५१३८८) लगेच संपर्क साधून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या टोमॅटो लागवड पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रतिनिधीच्या मार्गदर्शनानुसार जर्मिनेटर एकरी १।। लिटरचे ड्रेंचिंग केले. त्याचा मला समाधानकारक रिझल्ट आला. करकोचा कमी होऊन टोमॅटोला नविन फुट निघू लागली. त्यामुळे टोमॅटोची निरोगी व जोमदार वाढ होऊ लागली. फुट वाढली. फुलकळी अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची फवारणी अतिशय फायदेशीर ठरली. त्यामुळे फुलगळ न होता फळधारणा खुप झाली.

लागवड केल्यापासून ६५ व्या दिवशी म्हणजे ५ जून २०१७ पासून माझा माल मार्केटमध्ये येऊ लागला. दररोज जवळपास ३ एकरातून १०० ते २५० पर्यंत क्रेट टोमॅटो निघत होता. या काळात टोमॅटोला भाव देखील चांगला होता आणि आपला माल मार्केटमध्ये एक नंबर असल्याने भाव देखील १२०० रु. पासून १६०० रु./ क्रेट मिळाले. २२ ऑगस्ट २०१७ पर्यंत जवळपास ५ हजार क्रेट माल निघाला असून त्याचे ६० लाख रू. उत्पन्न मिळाले आहे. अजून तोडे चालू आहेत. जवळपास सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत माल चालू राहील. दिवसाआड किमान १०० ते १५० क्रेट उत्पादन मिळून एकूण अजून १५०० क्रेट माल निश्चितच मिळेल. त्याला कमीतकमी ५०० रु./क्रेट जरी भाव मिळाला तरी अजून ७।। लाख रु. उत्पन्न अपेक्षित आहे. असे एकूण मला ३ एकरामध्ये ६७ लाख ५० हजार चे उत्पन्न निघेल.

या टोमॅटोचे उत्पादन घेत असताना आतापर्यंत एकूण ३० फवारण्या केल्या असून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी सोबत आवश्यकतेनुसार किटकनाशके बुरशीनाशके फवारली. तसेच विद्राव्य खताचा ठिबकवाटे वापर केला. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मालाच्या क्वॉलिटीत वाढ झाल्याने मार्केटमध्ये इतर शेतकऱ्यांच्या मालाच्या तुलनेत १० ते २०% भाव जास्त मिळत होता.

आता खरबूज, कांदा या पिकावर देखील ही औषधे वापरून उत्पादन व त्याच्या दर्जात निश्चितच वाढ करण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी यानंतरही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधींकडून सहकार्याची अपेक्षा करतो व धन्यवाद देतो.