प्रोटेक्टंट

प्रोटेक्टंटचे फायदे

'प्रोटेक्टंट' एक नैसर्गिक वनस्पतीजन्य आयुर्वेदिक प्रभावी औषध

अति रासायनिक खतांच्या वापराने जमिनी नापिक झाल्या. तसेच विषारी किटक व बुरशीनाशके पिकांवर सतत वापरल्याने कीड व रोग कमी झाले नाहीच. परंतु त्याचे अंश पर्यायाने माणसांचे शरीरात चोर पावलांनी जाऊन मानवाला न बरे होणारे फॅन्सर, हार्ट अॅटॅक, भुक मंदावणे, मेंदु व पोटाचे विकार जडले. पर्यावरणाचा समतोल बिघडला. या गोष्टी परदेशातील तज्ज्ञांच्या लक्षात आल्यावर अशा अनेक संहारक औषधांचे उत्पादन थांबविले. मात्र भारतात अजुनही या औषधांचे उत्पादन चालूच आहे. भोपाळची दुर्घटना ताजी आहे.

या गंभीर धोक्यांचा विचार करून, निरनिराळ्या उपयुक्त आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून " प्रोटेक्टं" नावाचे प्रभावी औषध ज्येष्ठ शेतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. वि.सु. बावसकर यांनी निर्माण केले आहे. या औषधांचा वापर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम व न्युट्राटोन (सप्तामृत) हर्मोनीबरोबर केल्यामुळे अनेक प्रकारचा प्रादुर्भाव कमी होतो, हे सिध्द झाले.

हे औषध पावडर स्वरूपात असून वापरण्यास अत्यंत सुटसुटीत आहे. त्याची मात्रा कमी लागते. पिकांवर, उत्पादनावर, जमिनीवर, जनावरांवर, पर्यावरणावर तसेच मानवी शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम न होता असंख्य शेतकरी मित्रांन 'प्रोटेक्टंट' वरदानच ठरले आहे. 'प्रोटेक्टंट' हे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम व न्युट्राटोन, हर्मोनीबरोबर फवारल्यानंतर नुसतेच पिकांवर प्रतिबंधक न ठरता प्रभावी उपाय ठरतो. हे आयुर्वेदिक वनस्पतीजन्य किटक व बुरशीनाशक असल्याने बारीक आळी, मावा, तुडतुडे नियंत्रणात येतात, तसेच फलधारणेसाठी फुलांवर अधिक प्रमाणात मधमाशा व फुलपाखरे आकर्षित होतात. परागीकारणाचे कार्य प्रभावी होते. हा एक मोठा फायदा (बोनसच) होय. त्यामुळे पिकांचे उत्पादन अधिक व दर्जेदार होते.

'प्रोटेक्टंट' कसे वापरावे ?

एक महिन्याचे पीक असेल तर एक एकराला २५० ग्रॅम 'प्रोटेक्टंट' २ लिटर पाण्यात दोन तास भिजवून तयार केलेल्या कापडी सुती वस्त्रातून गाळून निवळीचा फवारणीसाठी १०० लिटर पाण्यातून उपयोग करावा. ही मात्रा दोन महिन्याच्या पिकांना १०० लिटरला ५०० ग्रॅम आणि ३ महिन्याच्या पिकांना १०० लिटरला १ किलो या प्रमाणात वापरावी. या फवारणीमुळे प्राथमिक अवस्थेतील मावा, तुडतुडे फवारणीनंतर लगेचच नाहिसे होतात. १० ग्रॅम म्हणजेच एका पंपाला एक काडीपेटीचे टोपण निवळी सर्व फुलझाडे, फळझाडे, पालेभाज्या, फळभाज्यांवर फवारण्यास पुरेशी ठरते. पेट्रोल पंपास निवळी करण्याची गरज नाही. प्रमाण 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' चे कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांकडून समजून घेणे.