राईपनर

राईपनरचे फायदे

 • राईपनरची योग्यवेळी फवारणी केल्यास फळे हंगामी व आडहंगामी मोसमात लवकर मोठी (पक्व) होतात. अधिक येऊन फळे व पिके निरोगी राहतात.
 • राईपनरच्या फवारणी फळांचा मुळचा रंग अधिक स्पष्ट दिसतो, त्यामुळे मालाला उठाव चांगला राहतो. मालाचा दर्जा अधिक चांगला मिळतो.
 • वजन व दर्जा सुधारल्याने मालाला भाव अप्रतिम मिळतो.
 • फळांचा मोसम नसताना उदा. द्राक्षे, आंबा यांच्या अगोदर जर मार्केटला डाळींब आणले जाऊ लागले तर डाळींबाल अधिक चांगला भाव मिळतो.
 • तिच गोष्ट फुलांचे बाबतीत आहे. उन्हाळ्यात फुले चांगली व अधिक येतात. जास्त दिवस ताजी व टवटवीत राहतात तसेच दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, नातळ व लग्नसराई या मोसमांत फुलांना बाजार हमखास मिळतात.
 • राईपनर वापरण्याचे प्रमाण: नेहमीप्रमाणे लागणीनंतर ४ ते ६ आठवड्याने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी बरोबर राईपनर केव्हा वापरावे?
 • सर्व फळभाज्या व फळे: फुलांच्यामागे देठांना गुंडी (गाठी) लहान फळे लागल्यानंतर दर आठ दिवसांनी थ्राईवर ७५० मिली + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर २५० मिली + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + २०० लि. पाणी.
 • पालेभाज्या: पालेभाज्या काढणीचे आठ दिवस अगोदर फक्त १ ते २ वेळा. थ्राईवर ५०० मि. + क्रॉंपशाईनर ५०० मि. + राईपनर २५० मि. + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट १०० लि. पाण्यातून फवारावे.
 • सर्व प्रकारची फुलझाडे (फुलशेती) : बारीक कळ्या लागल्यानंतर दर आठवड्यास थ्राईवर ५०० मि. + क्रॉंपशाईनर ५०० मि. + राईपनर ३०० मि. + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १५० ते २०० लि.पाणी
 • फळे: द्राक्षे, डाळींब, पपई, संत्री, मोसंबी, चिकू, लिंबू, आंबा, बोर, नारळ, कलिंगड, खरबूज, पेरू, अंजीर, केळी, लिची, स्ट्रॉबेरी, सिताफळ यासाठी.
राईपनर वापरण्याचे प्रमाण

 1. फळे मोहरीच्या आकाराची झाल्यानंतर थ्राईवर १ लि. + ७५० मि. राईपनर + ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट + १५० लि. पाणी
 2. फळे ज्वारीच्या आकारापासून ते वाटाण्याच्या आकाराची असताना थ्राईवर दिड लि. + १ लि + १ लि.क्रॉंपशाईनर + १ लि.राईपनर + ५०० ते ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट २०० ते २५० लि.पाणी
 3. फळे सुपारीच्या आकारापासून ते आवळ्याच्या आकाराएवढी झाल्यानंतर थ्राईवर १।। लि. + १।। लि. क्रॉंपशाईनर + १ लि.राईपनर + १।।लि. न्युट्राटोन + १ किलो प्रोटेक्टंट+ ३०० लि.पाणी.


जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर व प्रोटेक्टंट पावडर वापरून शेतकर्‍यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कृषी क्रांती होऊन तिसर्‍या जगातील शेतकर्‍यांना ती वरदान ठरणारी आहेत.