लिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लिंबूवर्गीय फळझाडांवर फुले येण्याची प्रक्रिया, फळधारणा व झाडावर फळे टिकून राहण्याची क्षमता ही वेगवेगळ्या नैसर्गिक व सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, व्यापारी तत्वावर उत्पादने घेणाऱ्या फळबागेतील बहुतांश फळझाडांवर ८० हजार ते १ - १।। लाखापर्यंत फुले लागतात. त्यापैकी ९७ ते ९८% फुले व फळे ही वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये गळून जाऊन फक्त २ ते ३% च पुर्णत: परिपक्व फळांमध्ये रूपांतर होते. गळ होण्यामध्ये प्रामुख्याने ७० ते ८०% फळे ही वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे ८ ते १७ % फळे कीटकांमुळे आणि ८ ते १०% फळे रोगांमुळे गळून पडतात.

आंबिया बहारात खालील ३ अवस्थांमध्ये प्रामुख्याने फळगळ होते. पहिल्या अवस्थेत फळधारणे नंतर लगेच मोठ्या प्रमाणात फळगळ होते व ही फळगळ नौसर्गिकरित्या जास्त फुले येण्यामुळे होत असते आणि झाडाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फळगळ ही प्रामुख्याने उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे होते. उन्हाळी फळगळ म्हणतात. विशेषत: उष्ण व कोरड्या हवामानात ही फळगळ अधिक होते.

तिसऱ्या अवस्थेतील फळगळ ही पुर्ण वाढ झालेल्या परंतु अपरिपक्व फळांची असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अतिशय नुकसानकारक ठरते. त्याला फळ तोडणीपुर्वी फळगळ असे म्हणतात.

फळगळीच्या प्रामुख्याने तीन कारणे आहेत. ती म्हणजे वनस्पतीशास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ रोगांमुळे होणारी फळगळ आणि कीटकांमुळे होणारी फळगळ.

१) वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ: फळधारणेनंतर होणारी बरीचशी फळगळ ही प्रामुख्याने वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होत असली तरी ती मे व जून महिन्यात होत असल्याने जूनची फळगळ म्हणून ओळखले जाते. ही फळगळ साधारणत: ०.५ ते २.० सेंटीमीटर व्यासाची असताना होते. वनस्पती शास्त्रीय फळगळ ही वाढणाऱ्या फळातील पाणी, कर्बोदके व संजीवके प्राप्त करण्यासाठीच्या स्पर्धेमुळे होते. या काळात पाण्याचा ताण व उच्च तापमान यामुळे लहान फळे जास्त काळ तग धरून राहू शकत नाहीत. त्यामुळे सुरूवातीच्या काळात जर तापमान ३५ ते ४० डी. से. च्या वर असेल व पाणी व्यवस्थत्त्पन योग्य नसेल तर वनस्पती शास्त्रीय फळगळ हा चिंतेचा विषय ठरते.

उच्च तापमान व पाण्याचा ताण यामुळे झाडाच्या पानाखालील स्टोमॅटांचे तोंड बंद होते व प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिमाणी वाढत्या फळांना कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो व फळांच्या देठातील पेशीक्षय झपाट्याने वाढतो व अशी फळे लवकर गळून पडतात. ही फळगळ कमी करण्याठी बगीच्यात स्प्रिंक्लर्स बसविल्यास फायदा होतो. कर्बोदकांच्या व संजीवकांच्या असंतुलनामुळे सुद्धा फळगळ मोठ्या प्रमाणवर होते.

फळगळ होण्याआधी फळाच्या देठामध्ये गुंतागुंतीच्या वनस्पतीशास्त्रीय प्रक्रिया होत असतात. ज्याला पेशीक्षय असे म्हणतात. साधारणत: वनस्पतीच्या अवयवाची निरोगी स्थिती, फळातील भ्रुणाचा योग्य विकास ऑक्सिजन संजीवकांचा तसेच पाण्याचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा यामुळे फळे झाडांवर पूर्ण वाढ व परिपक्व होईपर्यंत टिकण्यास मदत होते. याउलट रोग किंवा यांत्रिक जखम, कार्बन - नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अति आर्द्रता किंवा जमिनीत असणारा अतिशय जास्त ओलावा या कारणांमुळे फळगळ वाढते.

वरील कारणांविषयी आपण पाहूया -

झाडांची सुदृढता : फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे अत्यावश्यक आहे. जी फळे बहाराच्या सुरूवातीलाच पानेविरहीत फांद्यावर पोसली जातात. त्यांची वाढ मंद गतीने होते व ती कमकुवत राहतात. तर जी फळे नवतीसोबतच्या फुलांपासून तयार होतात. त्यांची वाढ जोमदार होते.

सर्वसाधारण एका फळाची पुर्णवाढ होण्यासाठी ४० पाने असावी लागतात. झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यांवरील सुप्तावस्थेतील रोगाणू निघून जाण्यासाठी छाटणी केली जाते. त्यामुळे त्याचा पुढील पिकांवर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी होतो. या छाटणीमुळे सुप्तावस्थेतील कळ्यांपासून पालवी फुटण्यास मदत होते. सर्वसाधारण एका फळाची पुर्णवाढ होण्यासाठी ४० पाने असावी लागतात. झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यांवरील सुप्तावस्थेतील रोगाणू निघून जाण्यासाठी छाटणी केली जाते. त्यामुळे त्याचा पुढील पिकांवर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी होतो. या छाटणीमुळे सुप्तावस्थेतील कळ्यांपासून पालवी फुटण्यास मदत होते.

नत्र : फळांच्या पोषणासाठी कार्बन - नत्राचे संतुलनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नत्राच्या कमतरतेमुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते. ऑक्सिजन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. नवीन संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, पानातील एकूण नत्रापैकी अमोनिआ - अमोनिअम (NH3 - NH4+) या समुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी महत्त्वाची आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरित्या नत्रयुक्त (यरिया) खताची फवारणी करून वाढविता येते.

कर्बोदके : कर्बोदकांच्या कमतरतेमुळे पाने, फुले व फळे यांच्या पेशीक्षय २ प्रकारे टाळू शकतात. प्रथमत: कर्बोदकांच्या मुबलक उपलब्धतेमुळे पेशी भित्ती सशक्त होतात. तर दुसरे म्हणजे बीजांडाचे आवरण सशक्त होते त्यामुळे भ्रुणाच्या वाढीला मदत होते व वाढणाऱ्या भ्रुणातून ऑक्सिजन संजीवकाचा स्त्राव सुरू होतो व पेशीक्षय टाळण्यास मदत होते.

जमिनीतील आर्दता : बागेस प्रमाणापेक्षा जास्त व प्रमाणापेक्षा कमी पाण्याची परिस्थिती टाळावी पावसाळ्यात सततच्या पावसाने दलदल होऊन जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायू कमी मिळतो. त्याचप्रमाणे पाण्याच्या अतिशय कमी उपलब्धतेमुळे फळांच्या सुरूवातीच्या वाढीवर वाईट परिणाम होतो आन अशा फळांमध्ये पेशीक्षय होतो.

तापमान : फळगळीचे प्रमाण हे कमी तापमानात कमी असते. मात्र उच्च तापमानात ते जास्त असते. प्रदीर्घ काळाच्या उच्च (४० डी. से. पेक्षा जास्त) तापमानामध्ये पाने, फुले व फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये होणारी फळगळही अतिशय उच्च तापमानमुळे व कोरड्या हवेमुळे होते. यासोबत जर यांत्रिक इजा, अन्नद्रव्याची उपलब्धता किंवा इतर प्रकारचा ताण यामुळेही पेशीक्षय लवकर होतो.

२) रोगामुळे होणारी फळगळ :लिंबूवर्गीय झाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने बोट्रिओ डिप्लोडिआ थिओब्रोमी (Botryodiplodia theobromor ) कोलेटोट्रीकम ग्लोइओस्पो रिऑइडस (colletotrichum glocosporioides) व काही अंशी ऑलटरनेरिय सिट्री (Alternaria Citri) या बुरशींमुळे होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर या बुरशीचे जीवाणू मोठ्या प्रमाणात पसरतात. तसेच काही किटकांच्या प्रादुर्भावामुळे उदा. काळी माशी, मावा, तुडतुडे यांच्या शर्करायुक्त तरल पदार्थावर वाढलेल्या बुरशीमुळे पेशीक्षय लवकर होतो व परिणामी फळगळ होते. या प्रकारची फळगळ १०% वाळलेल्या फांद्या असलेल्या झाडावर २० ते २२% होते.

३) किटकांमुळे होणारी फुलगळ : लिंबूवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या किटकांपैकी प्रामुख्याने सिट्रस सिल्ला, सिट्रस बड, माईटस (अष्टपदी) या किडींमुळे फुले व लहानफळे गळून जातात. याशिवाय देशाच्या पुर्वोत्तर भागात आढळणारी फळमाशी (Dacus Dorsalis), रस शोषण करणारे पतंग हे दोन मुख्य किटक आढळतात. यापैकी रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या सर्व जीवन अवस्था ह्या इतर वनस्पतींवर होत असत. त्यामुळे या पतंगाचा बंदोबस्त करणे अतिशय जिकीरीचे काम आहे. हे पतंग संध्याकाळच्या वेळी परिपक्व फळांतील रस शोषण करतात व अशी फळे एक - दोन दिवसांत गळून पडतात. या प्रकारची फळगळ सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात होते. कधी - कधी तोडणीपूर्व फळगळीपैकी ४०% फळगळ या पतंगामुळे होते.