४ एकरात १६० पोते भुईमूग शेंग

श्री. ज्ञानेश्वर पंढरी नागलकर,
मु. पो. सावरगाव, ता. पातूर, जि. अकोला.
मोबा. ९३२६९३८१५७



डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा.लि. यांनी दिलेली प्रॉडक्ट उत्कृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे मी श्री. ज्ञानेश्वर पं. नागलकर आपला आभारी आहे. मी जर्मिनेटरचा गव्हाच्या बीजप्रक्रियेकरिता वापर केला, त्यामुळे चांगल्या प्रकारची उगवणशक्ती झाली. गव्हामध्ये हिरवेगारपणा जास्त जाणवत होता. श्री. गवई यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.

मी गवई यांच्या मार्गदर्शनानुसार भुईमुगाची लागवड केली. सुरवातीला (१ जाने २०१३) बियाणास जर्मिनेटर लावले व पेरणी केली. उगवण चांगली झाली व वाढपण चांगली झाली. पहिला स्प्रे जर्मिनेटर + थरांईवर + प्रिझम + प्रोटेक्टंट या औषधांचा केला. पीक निरोगी होते. पेरणीपासून रासायनिक खते व कल्पतरूचा वापर केला. मी सर्व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली. त्याचा मला खूप फायदा झाला. ४ एकरामध्ये १६० पोते शेंगा मिळाल्या. एका पोत्याने वजन ४० ते ४५ किलो भरत होते.

मी खूप आनंदी आहे. मी फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे इतके उत्पन्न काढू शकलो व एक गोष्ट मी सांगू इच्छितो की, इतर कास्तकारांनी (शेतकऱ्यांनी) ही औषधे वापरावी. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला विनंती करतो की, अशीच चांगल्या दर्जाची औषधे आमच्या सेवेत द्या. म्हणजे आम्हला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.