'कृषी विज्ञान' माझी प्रेरणा, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने डाळींब

श्री. अमर विठ्ठल वीर,
मु.पो.ता. भूम (वीरगल्ली), जि . उस्मानाबाद -४१३५०४,
मोबा. ९९२१६३४९५४


आमच्या रविंद्रनाथ टागोर नगरपालिका सार्व, वाचनालयात 'कृषी विज्ञान' मासिक मी गेली ७ - ८ वर्षापासून वाचत आहे. दर महिन्याला मासिक येण्याची वाट पाहत असतो. 'कृषी विज्ञान' मासिका अतिशय प्रेरणादायक ठरत आहे.

आज पंचवार्षिक वर्गणी स्वत:च्या नावाने भरून अंक चालू केला आहे. तसेच डाळींब, शेवगा, आलेहळद, केळी, पपई, कापूस आणि कृषी मार्गदर्शिका घेतली आहे. आमच्याकडे पंढरपुरी म्हशी २० आहेत. १४ -१५ लि. दूध देतात. डोंगर उताराची मध्यम प्रतिची एकूण २० एकर शेती आहे. त्यातील ५ एकराला गाळ भरला आहे. त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगवा डाळींब लावणार आहे. मी. बी. ए. पर्यंत शिक्षण अंबेजोगाई येथून पुर्ण केले. आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आधुनिक शेती करणार आहे.