उसातील आंतरपीक झेंडू सुधारून, सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लागवडीची प्रेरणा
श्री. सतीश रघुनाथ येडे, मु.पो. पाटस स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे.
मोबा. ९६७३७३०६५१
आम्ही २४ मार्च २०१३ कृष्णा कोईमतूर उसाची लागवड पट्टा (४।। फुटाचा) पद्धतीने दोन डोळा
कांड्यांची लागण केली. जमीन पोयट्याची आहे. पाणी भिमा नदीवरून लिफ्ट केले आहे. ८ -१०
दिवसाला पाणी देतो. ऊस लागवडीपुर्वी या जमिनीत गरव्या कांद्याचा बेवड असल्यामुळे उसाला
कोणतीही खते न वापरता ३ महिन्यात ३ - ३।। फुट उंचीच ऊस झाला आहे. फुटवेदेखील भरपूर
आहेत. या उसामध्ये कलकत्ता ऑरेंज झेंडूची २५०० रोपे उसाबरोबरच लावली होती. त्यातील सिंगल पाकळीची
झाडे काढली, तर काही मेली, तरी सध्या २००० झाडे आहेत. त्याचे मागच्या आठवड्यापर्यंत
४ तोडे झाले होते. चौथ्या तोड्याला ५० किलो माल निघाला. यापुर्वी ५० ते ५४ किलोपर्यंत
फुले मिळाली. मात्र मागच्या आठवड्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची येथे माहिती घेतल्यावर
या झेंडूसाठी सप्तामृतातील थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर पहिल्यांदाच घेऊन पहिली फवारणी
केली. तर आज ५ व्या तोड्याची फुले ६० किलो मिळाली. त्याला ६७ रू./किलो भाव मिळाला.
या अनुभवावरून आज 'सिद्धीविनायक' शेवगा एक एकर लागवडीसाठी आठ पाकिटे बी घेऊन जात आहे
उसाला व झेंडूला कल्पतरू खत आणि सप्तामृताच्या फवारण्या घेणार आहे. शेवग्याचे पुर्ण
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन घेणार आहे.