उन्हाळी टोमॅटोची पावसाळ्यात चुकून लागवड, सर्वांचे प्लॉट रोगराईने उद्ध्वस्त आमचा मात्र १ नंबर

श्री. बजरंग सोपान काळे,
मु. पो. सोनोरी, ता. पुरंदर, जि. पुणे,
मोबा. ८९७५४७०३७२


१५ गुंठे टोमॅटोचा १ महिन्याचा प्लॉट असताना मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. मलाही सेंद्रिय उत्पादनाचा एकदा अनुभव घ्यायचा होताच. म्हणून या अवस्थेत जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर ५०० मिली घेऊन गेलो. त्याची एक फवारणी केली. त्याने झाडे हिरवीगार व टवटवीत दिसू लागली. पाने मोठी व नागअळी अजिबात आली नाही. त्यानंतर २० -२२ दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. नेले. त्याची दुसरी फवारणी केल्यामुळे फुटावा वाढला. फुलकळी लागली. गळ थांबली रोगाचा प्रादुर्भाव जाणवलाच नाही. नंतर तिसऱ्या फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन १ - १ लि. घेतले. मल्चिंग पेपर असल्याने खोडाला याच अवस्थेत बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने ७ - ८ झाडे गेल्यामुळे खोडाला सोडण्यासाठी जर्मिनेटर आणि हार्मोनी घेतले. तिसरी फवारणी करून लगेच आळवणी (ड्रेंचिंग) केले. एवढ्यावर फळे चालू झाली.

६५ दिवसात तोडा चालू झाला. पहिल्या तोड्याला अर्धे क्रेट निघाले. नंतर तिसऱ्या दिवशी १ क्रेट, नंतर २ क्रेट, त्यानंतर ४,८,१२,१५,१८ असे क्रेट प्रत्येक तिसऱ्या दिवशी निघाले. माल १ नंबर १०० ते १२५ ग्रॅमचे १ फळ भरते. हडपसर मार्केटला पहिल्यापासून एकच व्यापारी माल घेत आहे. २२ ते ४२ रू. किलो भाव मिळाला आहे. ४ क्रेटचे ४ हजार ८० रू. मिळाले होते. आज १८ क्रेट माल २२ रू./किलोने गेला. आतापर्यंत ६० - ६५ क्रेट (१६०० किलो) माल निघाला आहे. ३५ ते ४० हजार रू. झाले आहेत. याला मल्चिंग ५ हजार, ठिबक १२ हजार रू. शेणखत ८ हजार, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे ५ हजार, इतर औषधे ३ हजार, तारकाठी सुतळी मजुरी १२ हजार असा एकूण ४५ ते ५० हजार रू. खर्च झाला आहे.

एका झाडावर १३० ते १४० फळे

आमच्या भागातील ६० - ७० % टोमॅटो प्लॉट खराब वातावरणाने रोगराईस लवकर बळी पडून खल्लास झाले. आपला प्लॉट अजून २-२।। महिने सहज चालेल. अभिजय ही जात उन्हाळी हंगामात येणारी आहे. मात्र चुकून दुकानदाराने दिल्याने पावसाळी हंगामात लावली. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगला प्लॉट निरोगी राहून उत्पादन दर्जेदार मिळत आहे. त्यामुळे मार्केटमधील भावापेक्षा ४ -५ रू. /किलोस जादा मिळत आहेत. काल (२७ जुलै २०१३) तोडणी करताना अचानक पाऊस आल्यावर झाडाच्या आडोशाला बसलो तेव्हा सहज झाडावरील फळे मोजली असता. एका झाडावर १३० - १४० फळे होती. अशी ६० - ७० % झाडे आहेत. अजून २ महिने सहजच प्लॉटपासून उत्पन्न चालू राहील, अशी पीक परिस्थिती आहे.