८० क्रेट वांगी ५२ हजार मिळाले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने !

श्री. संजय मुक्ताजी पगार,
मु. पो. जोपुळ, ता. निफाड, जि. नाशिक.
मोबा. ९७६३८०९५४०


मी २३/१२/२०१२ रोजी निर्मल कंपनीच्या संजय ६२७ या वाणाची वांगी लागवड २० गुंठे क्षेत्रात केली. सुरवातीच्या काळात थंडी असल्याने वांग्याची वाढ झाली नाही. भरपूर उपाय केले पण वांगी जशीच्या तशीच. काय करावे कळेना. नंतर मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे यांच्याशी संपर्क साधला. कारण मी दोन वर्षापासून द्राक्ष बागेला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करतो. प्रतिनिधींशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी माझ्या वांगी प्लॉटची पहाणी केली व त्यांनी जर्मिनेटर ५०० मिली १०० लि. पाण्यातून ड्रिपद्वारे देण्यास सांगितले आणि जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रिझम + न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली + २०० मिली हार्मोनी + १०० लि. पाणी याप्रमाणे घेऊन २ स्प्रे ८ ते १० दिवसाच्या अंतराने करण्यास सांगितले. त्याप्रमाणे स्प्रे केल्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये विलक्षण बदल झाला. वाढ चांगली झाली. फुलकळी भरपूर निघाली. पत्ती गोळा झालेली सुधारून प्लॉटला काळोखी भरपूर आली. आजपर्यंत ८० कॅरेट माल निघाला असून ८० कॅरेटचे मला ५२,०००/- रू. झाले व इथू नपुढे १० ते १२ दिवसांनी हेच स्प्रे घेत जाणार असून अधिक उत्पन्न घेणार आहे. मी एवढेच सांगू इच्छितो की, ही सर्व किमया केवळ डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे शक्य झाली.