कर्मवीरांच्या प्रेरणेने ग्रामीण शिक्षण संस्था व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या साथीने ७८ व्या वर्षी आदर्श शेती
श्री. भिमराव निवृत्ती शेंडगे (वय ७८),
मु.पो. काजळ, ता. उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद.
मोबा. ९६२३६६७७७५
१९५९ साली रयत शिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी सायन्स कॉलेज सातारा येथे ११ वीला अॅडमिशन
घेतले. कर्मवीर आण्णांना हुशार पण गरीबीमुळे शिकू शकत नाहीत अशा मुलांबद्दल फार कळवळ
होती. त्यांनी अतिशय गरीब कुटुंबातील मात्र खूप हुशार असल्याने बॅरीस्टर पी.जी. पाटील
यांना लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठविले होते. त्याकाळी मुरारजी देसाई यांनी रयत शिक्षण
संस्थेची ग्रँड घेतली नाही, तरी आण्णांनी प्रसंगी लोकवर्गणीतून ५०० प्राथमिक शाळा
चालविल्या होत्या. त्यांच्यावर बोर्डींगच्या वस्तीगृहाची व्यवस्था करण्यासाठी पत्नीचे
दागिने विकण्याची वेळ आली होती.
अशा त्यागी माणसाच्या संस्थेत शिकण्याचा योग आला. तेथून मी इंटरसायन्स (एस. वाय. बी. एस्सी.) झालो. सायन्सचा शिक्षणाचा खर्च घरून भागत नसल्याने इंटर सायन्सपर्यंतच शिक्षण घेऊ शकलो व त्यांच्याच संस्थेत नोकरी करण्याची संधी मिळाली. रयत शिक्षण संस्थेत ३ वर्षे नोकरी केल्यानंतर पब्लिक हेल्थमध्ये १ वर्षे नोकरी केली. त्यानंतर तेथील राजीनामा देऊन आण्णांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात शिक्षणाची सोय होण्यासाठी १९६३ साली गावी हायस्कूल चालू केले. नंतर ३ वर्षे फूल प्लेजड झाल्यानंतर स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूरला हे हायस्कूल जोडून १९६६ साली पुर्णवेळ शेतीत उतरलो.
तो काळ हरितक्रांतीचा हायब्रीड सिडसचा होता. तेव्हा गावात बिजोत्पादन कार्यक्रम राबवला होता. त्यामध्ये मी सक्रीय सहभाग घेतला. मोठमोठ्या कंपन्यांना (महाबीज, महिको अशा कंपन्यांना) सांघिक अॅग्रीमेंट करून भाजीपाला, कपाशी, ज्वारी, बाजरी, मका यांचे बियाणे पुरवत होतो. त्याकाळी ६० -६० लेबर माझ्याकडे असायचे. तेव्हा माझ्याकडे घरची १३ एकर जमीन आणि जवळपास १५० एकर शेतजमीन खंडाने (भाड्याने) करत होतो. तेव्हा वर्षाचे सर्व उत्पदान २ लाख रू. असायचे. आताचे ते २ कोटीहून अधिक होईल. तेव्हा मजुराला १ ते १।। रू. दिवसाची मजुरी असायची.
तेव्हापासून आजतागायत वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील शेतीत अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवत आहे. शेतामध्ये सह्याद्री अॅग्रो डेअरी शीतकरण आणि कलेक्शन प्लेंट चालवत आहे. पोस्टमनकडून दुसऱ्याने अंक नेल्याने उशीरा मिळतो.
अभ्यासाची आणि अभ्यासातून नवीन तंत्रज्ञानाबद्दलची ओढ पुर्वीपासूनच होती. त्यामुळे विविध प्रदर्शने पाहण्यास जात असे. २ वर्षापुर्वी असेच अॅग्रोवन प्रदर्शन पहाताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलला भेट दिल्यानंतर 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरली. तेव्हापासून 'कृषी विज्ञान' चा वाचक आहे. दर महिन्याला विविध भागातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि आरोग्याच्या टिप्स मी आवर्जुन वाचतो. गावात पोस्टमन मासिक कोणाकडेही देतो. तर पोस्टमनकडून कोणाकडे अंक गेला की तो आगोदर स्वत:च तिकडे वाचत बसतो व वाचून झाल्यावर अंक उशीरा माझ्याकडे येतो. 'कृषी विज्ञान' ची गोडी एवढी लागली आहे की, अंक मिळण्यास उशीरा झाला की बेचैनी/अस्वस्थ वाटू लागते.
या मासिकातून मला सरांच्या तंत्रज्ञानाची संपुर्ण माहिती झाली. तेव्हापासून फळझाडे, सोयाबीन, कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची या सध्याच्या एकूण १८ एकर क्षेत्रावर तसेच गाईच्या चाऱ्यासाठी (यशवंत ग्रासाला) ही औषधे वापरत आहे.
माझ्याकडे ६० लाख लि. क्षमतेचे पाऊण एकर क्षेत्रात शेततळे आहे. यामध्ये २ बोअरचे पाणी टाकतो व वाघोली मध्य प्रकल्पातून ६ हजार फूट अंतरावरून ३ इंची पाईपलाईनने पाणी आणून सोडले आहे. तसेच लोकल नदीवरून केटीवेअर कोल्हापूर बंधाऱ्यातून ७।। एच.पी.मोटरने शेततळ्यात पाणी सोडतो.
सोयाबीनचा उतारा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ ते ३ क्विंटल वाढला
सध्या वडीलोपार्जित १३ एकर व नवीन खरेदीची ५ एकर अशी एकूण १८ जमीन आहे. सोयाबीन १० एकर क्षेत्रामध्ये २ वर्षापुर्वी लावले होते. तर कल्पतरू एकरी १ पोते, डीएपी १ पोते हे खत बियाण्याबरोबर पेरले होते. नंतर सप्तामृताचे ३ - ४ फवारे घेतले होते. याला फक्त एकदा पाणी स्प्रिंक्लरने दिले होते. तर या कोरडवाहू सोयाबीनचे ११ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले. पुर्वी ८ ते ९ क्विंटलचा उतारा मिळत असे, तेथे एकरी २- ३ क्विंटल उत्पादन वाढले. ह्या सोयाबीनची ४००० रू./क्विंटल प्रमाणे विक्री झाली. पहिला एकरी सर्व खर्च १० हजार रू. येत होता. आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे १२ हजार रू. झला आहे. २ हजार रू. खर्च वाढून २ - ३ क्विंटल म्हणजे ८ ते १२ हजार रू. उत्पन्न वाढले.
'सिद्धीविनायक' शेवगा १० गुंठे मार्च २०१४ लावला आहे. २०० झाडे आहेत. ९' x ९' वर लागवड, जमीन मध्यम प्रकारची आहे. प्लॉट रोडलगत आहे. ४ महिन्यात शेंगाची विक्री चालू झाली. गावातील व परगावचे लोक येउन भेट देतात. २०० झाडांपैकी तुटाळ होऊन ११० झाडे आहेत. त्यापैकी ५ महिन्याच्या काळात ६० झाडांच्या शेंगा विक्रीयोग्य मिळत आहेत. बाकी झाडे फुलकळी अवस्थेत आहेत. चालू झाडावर २०० - २५० शेंगा आहेत. ४० रू. किलोने गावातच विक्री होत आहे.
रामफळ, सिताफळ, पेरू, चिकू, लिंबू, मोसंबी, अॅप्पलबोर, आंबा सर्व जातीचा, आवळा, नारळ जांभूळ या प्रत्येकाची ३ - ४ रोपे शारदा प्रतिष्ठान, बारामती येथून ७ वर्षापुर्वी नेऊन लावली आहेत. आता ती चालू झाली आहेत.
ढोबळी १ महिन्यात फुलावर
ढोबळी मिरची (इंडो अमेरिकन बेंगलोरची) १ एकर व संकरीत मिरची बिजो शितल -३७८ अर्धा एकर या पिकांची शेडनेटमध्ये रोपे तयार करून मल्चिंग पेपरवर ११ जुलै २०१४ ला लागवड केली आहे. बेड टॉंपची रुंदी २ फूट व २ बेडमध्ये ६ फूट अंतर आहे. प्रत्येक बेडवर २ ओळी असून १' x १' वर एकरी १६ हजार रोपे लावली आहेत. याला रासायनिक १०:२६:२६ ची २ पोती, सेंद्रिय खत ६ पोती, निंबोळीपेंड ६ पोती, पोल्ट्रीखत २० बॅगा, कंपोस्ट खत ३ ट्रेलर (८ टन) आणि थायमेट ५ किलो एवढे बेड करताना वापरले. सर्व रोपे जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटच्या मिश्रणा मध्ये बुडवून लागण केली आहे व दर आठवड्याला सप्तामृताची फवारणी करीत आहे. सध्या मिरची १ महिन्याची असून ५०% झाडे फुलावर आहेत. अजून १ ते १। महिन्यात माल विक्रीस येईल. फुटवा उत्तम आहे. मध्यंतरी माव्याचा प्रादुर्भाव झाला होता तर दशपर्णी अर्क १ लि. + रोगर २० मिली सप्तामृतासोबत प्रतिपंपास वापरले, तर मावा आटोक्यात आला.
हळद सेलम १० जुलै २०१४ ला लावली आहे. लागवडीस १ महिना उशीर झला. मात्र बेणे प्रक्रियेला जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंट वापरल्याने सर्व वापली/उगवली. हळदीला आतापर्यंत २ फवारण्या झाल्या आहेत. १ ते १।। फूट उंचीची हळद आहे.
आज सप्तामृत २ - २ लि. आणि स्प्लेंडर, हार्मोनी १ - १ लि. अशी १०,५०० रू. ची औषधे ढोबळी व संकरीत साधी मिरची, हळद, शेवगा पिकासाठी घेऊन जात आहे.
मोठा मुलगा (वय ४५) हे दत्तकला एज्युकेशन सोसायटीचे भिगवण कॉलेजवर प्रिंसीपॉल आहे. सुनबाई जिल्हा परिषदला बारामतीत शिक्षक आहे. या दोधांचे उत्पन्न १ लाखाच्यावर आहे. दुसरा मुलगा पशुवैद्यक डॉक्टर होता दुदैंवाने वयाच्या ४२ व्या वर्षी तो अपघातात वारला. त्यांची २ मुले आहेत. एक ७ वि त व दुसरा तिसरीत शिकत आहे.
मी ७८ व्या वर्षीदेखील स्वत: लक्ष देवून आधुनिक पद्धतीने यशस्वीरित्या शेती मजुरांच्या मदतीने करित आहे. फळझाडांना देखील नियमित सप्तामृताचे फवारे घेत आहे. यामुळे फळगळ थांबते. फळे मोठी होतात, चव वाढते, गोडी वाढते, आकर्षक दिसतात.