डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ लाख डाळींबच्या गुट्या व दर्जेदार डाळींबही !
श्री. बबन निवृत्ती शिंदे,
मु.पो. देशमुखवाडी (राशीन), ता. कर्जत, जि. अहमदनगर,
मोबा. ९८९०४०७१२१
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर २००३ सालापासून डाळींब भगवा गुटी कलमासाठी वापरत
आहे. एकूण ७ एकर डाळींब बाग आहे. जमीन हलकी मुरमाड आहे. लागवड १२' x १०' वर आहे. यापैकी
१।। एकर क्षेत्रामध्ये गुटी कलम करतो. वर्षाला १ लाख रोपे तयार करतो. जून जुलैमध्ये
गुट्या बांधताना मॉस (शेवाळ) १०० लि. पाण्यात जर्मिनेटर १ लि. आणि प्रोटेक्टंट ५००
ग्रॅम घेऊन या द्रावणात बुडवून बांधतो. १। लाख गुट्या बांधल्या तर १ लाख रोपे मिळतात.
गुटी बांधल्यानंतर २१ दिवसात तांबडी मुळी झाल्यानंतर (परिपक्वता आल्यावर) गुटी उतरवतो.
त्यानंतर ५ x ६ इंचाच्या पिशवीत जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये गुटी भिजवून लावतो व ३
- ४ दिवसांनी लगेच ड्रेंचिंग करतो. त्यामुळे मर होत नाही. पांढऱ्या मुळ्या वाढतात.
वाढ लवकर होते. गुटी लागवडीनंतर १० दिवसाच्यापुढे विक्री चालू होते. २५ रू./रोपप्रमाणे
विक्री होते.
उर्वरीत ५ - ५।। एकर बागेचा बहार धरतो. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये बागेला ताण देतो. जानेवारीला छाटणी करून खते भरतो. शेणखत ४० किलो, १०:२६:२६ १ किलो, सुक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम, दुय्यम अन्नद्रव्ये ५० ग्रॅम, निंबोळी पेंड १ किलो असे प्रत्येक झाडास देऊन पाणी सोडतो.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर २० हजार खर्च १० टन डाळींब एकरी ४।। ते ५ लाख
पाणी सोडल्यानंतर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करतो. तसेच जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझमची फवारणी करतो. त्यामुळे बाग चांगली फुटते. पाणी दिल्यानंतर २१ दिवसांनी चौकी (बारीक फुलकळी) दिसायला लागते. नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनरसोबत प्रोटेक्टंटची फवारणी करतो. त्यामुळे मधमाशा, फुलपाखरांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगले होते व नर मादी कळीचा समतोल राहतो. त्यामुळे सेटींग चांगले होते.
सेटिंग झाल्यावर सुपारी आकाराची फळे झाल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची फवारणी करतो. त्यामुळे फुगवण सुरू होते. आळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्लोरो पायरी फॉस तसेच बुरशीनाशक म्हणून बाविस्टीन वापरतो.
बहार धरल्यापासून औषधांवरील एकूण खर्च ४० हजार रू. होतो. त्यापैकी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवरील खर्च २० हजार रू. होतो. खतावरील व मशागतीचा खर्च ४० हजार होतो. असा एकूण १ लाख रू. /एकरी खर्च होतो.
एकरी १० टनापर्यंत उत्पन्न मिळते. सोलापूर, राहाता, नाशिक मार्केटला विक्री करतो. ७० ते १०० रू. किलो भाव मिळतो. एकरी ४।। ते ५ लाख रू. होतात.
४५० ते ५०० ग्रॅम ची फळे नाशिकला पाठवितो. त्यापेक्षा मोठी साईज असल्यास मालेगावचे व्यापारी जागेवरून माल घेऊन ते दिल्लीला पाठवितात. लहान ३०० ते ४०० ग्रॅम किंवा त्याहून लहान माल असल्यास सोलापूर मार्केटला पाठवितो, तेथे अशा मालाची विक्री होते.
सध्या झाडावर १०० ते १२५ फळे आहेत. आकार ३०० ते ३५० ग्रॅमचा आहे. आता (२५ जुलै २०१४) फुगवण व कलर येण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी २ लि. आणि ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर ५ लि. घेऊन जात आहे.