'कृषी विज्ञान' चा १६ वा वर्धापन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने लोकांना सुखद अनुभव दिलेला आहे. अल्प भूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना
तासगांव -सांगली ते वेल्हे - पुरंदरच्या छोट्या शेतकऱ्यापासून मोठे शेतकरी हे डॉ.बावसकर
तंत्रज्ञानाने सधन उन्नत शेती करत आहेत. द्राक्ष पीक घेऊन बेदाणा करत आहेत.
द्राक्ष पीक घेऊन बेदाणा करत आहेत. यामध्ये
अॅनॅटो असो, रेशीम शेती असो, कोथिंबीर असो, देशभरातील सोयाबीन असो व डाळींब असो, हे
सर्व प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाला साथ देऊन यशस्वी करून त्यांना त्याचा
फायदा झाला आहे. त्यामुळे गेल्या २५ - ६० वर्षात शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाने नुसती
साथ दिली नाही तर इतरांने प्रेरणा देऊन यशस्वी केले आहे. विकास अधिकारी, ग्रामीण विकासाशी
निगडीत असणारे यांना दिशा देण्यासाठी आम्ही वृत्तपत्रातून ८ -१० वर्ष (१९८८ - ९८) लेखन
केले. त्यातील प्रतिसादातून सप्टेंबर १९९८ मध्ये 'कृषीविज्ञान' मासिकाचा जन्म झला.
जे तरून शेतकरी आहेत. नोकरदार आहेत, निवृत्त आहेत, स्वेच्छा निवृत्तीचे किंवा निवृत्तीच्या
उंबरठ्यावरील शेतकरी आहेत, मिलीटरीतून व्ही. आर. एस. घेतलेल्यांना त्यांच्या गावात
आदर्श शेती करून पथदर्शक प्रकल्प राबवायचे आहेत त्यांच्यासाठी अनेक दिग्गज शेतकऱ्यांच्या
यशोगाथा आणि नाविण्यपुर्ण विविध विषयांचे लेख हे सातत्याने प्रकाशित करून देशभरातील
शेतकऱ्यांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला. आधुनिक कृषी तंत्रज्ञान (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी)
हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आणि त्याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना देशभर होत आहे.
आमचे विचार, आमच्या कामाची दिशा, प्रयत्न हे देशाचे नियोजन कर्त्यापासून शास्त्रज्ञ
असो वा विकास अधिकारी असो व सेवाभावी संस्था असो या सर्वांनी देशाच्या विकासासाठी
त्याचा वापर केला आहे. यातच या 'कृषी विज्ञान' मासिकाचे यश समाविष्ट आहे.
हे मासिक तळागाळापासून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शक ठरले आहे. आता या आधुनिक तंत्रज्ञानाची देशाला गरज आहे. शेवग्यासारखे दुर्लक्षित
पीक आज 'कृषी विज्ञान' मधून देशाच्या अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे 'कल्पवृक्ष' म्हणून सिद्धी
करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या 'कृषी विज्ञान' मधून प्रसारित झालेल्या मुलाखतींचा सहभाग
आहे. त्या फारच बोलक्या प्रेरणादायक आहेत व हजारो शेतकऱ्यांनी आज 'सिद्धीविनायक' शेवगा
देशभर लावला आहे. यातूनच केळी, डाळींब, पपई, द्राक्ष, आले - हळद, कापूस, कृषी मार्गदर्शिका
या विशेषांकातून मार्गदर्शन केले जात आहे. अचूक मार्गदर्शक व कृती आणि काय केल्याने
काय घडते हे सांगणारे 'कृषी विज्ञान' हे देशातील एकमेव मासिक आहे. जगभरच्या शास्त्रज्ञांनी
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी शेती करणाऱ्या भारतातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी
दिल्या त्यावेळी त्यांनी गौरवोद्गार काढले. जरी तंत्रज्ञानाचा त्यांनी उल्लेख केला
असता तरी त्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे अवलंब केला असल्याने हे शक्य
झाले आहे. म्हणून त्याचे श्रेय त्या शेतकऱ्यांना जाते. आधुनिक तंत्रज्ञान देशाच्या
काना - कोपऱ्यांना पोहचविण्याचे
कार्यासाठी 'कृषी विज्ञान' हे मध्यम आहे. या विज्ञानने शेतकऱ्यांना लळा लावला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कळविले की, आम्ही या मासिकाची चातकासारखी वाट पाहतो. यामध्ये सर्व
शेतकरी बांधव, कृषी विज्ञान केंद्रातील प्रतिनिधी, देशभरातील विविध खात्यातील अधिकारी,
संचालक, विशेष करून कृषी खात्यातील अधिकारी यांचे योगदान मोलाचे आहे.
'कृषी विज्ञान' चा १६ व्या वर्धापनाचा अंक आपल्या हाती देताना आनंद होतो की, डॉ. स्वामी नाथन सरांसारख्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञापासून देश व परदेशातील अनेक मान्यवरांनी 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' व 'कृषी विज्ञान' च्या कार्यास नुसत्या सदिच्छा न देता या उपक्रमाचे ते दूत ठरले आहेत. यामध्ये आम्हाला अनेक शेतकऱ्यांनी साथ दिली, त्याबद्दल आभारी आहोत. हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यात असेच सहकार्य सर्वांनी करावे हीच आशा !
'कृषी विज्ञान' चा १६ व्या वर्धापनाचा अंक आपल्या हाती देताना आनंद होतो की, डॉ. स्वामी नाथन सरांसारख्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञापासून देश व परदेशातील अनेक मान्यवरांनी 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' व 'कृषी विज्ञान' च्या कार्यास नुसत्या सदिच्छा न देता या उपक्रमाचे ते दूत ठरले आहेत. यामध्ये आम्हाला अनेक शेतकऱ्यांनी साथ दिली, त्याबद्दल आभारी आहोत. हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यात असेच सहकार्य सर्वांनी करावे हीच आशा !