२५ दिवसात २५ किलो मेथीपासून २५ हजार नफा

श्री. सदाशिव आत्माराम भगत,
मु.पो. राजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे,
मोबा. ९०९६४७८२७५


मेथी, कोथिंबीर (धना), काकडी खरबुज या पिकांना बीजप्रक्रियेसाठी नेहमी जर्मिनेटरचा वापर करतो. त्यामुळे अति थंडी किंवा कडक उन्हाळ्यातदेखील बियांची उगवण ८० ते १००% पर्यंत होते. शिवाय मर होत नाही. पिके लवकर वाढीस लागतात.

चालूवर्षी १२ जुलै २०१४ रोजी २५ किलो मेथी बी जर्मिनेटर ५०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + २५ लि. पाणी या द्रावणात ६ तास भिजत ठेवले. नंतर रानाला काकरपाळी घालून बी कोकले आणि पुन्हा काकरपाळी मारून बी मातीआड झाल्यावर सारा यंत्राने सारे पाडले. साऱ्याची रुंदी ५ फूट व लांबी ३० फूट ठेवली.

त्यानंतर उगवणीसाठी पहिले पाणी दिले. तर बिजप्रक्रियेमुळे ३ ते ४ दिवसात १००% उगवण झाली. त्यानंतर १२ दिवसांनी एकदा असे दोनच पाणी मेथीला दिले आणि जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटच्या ८ - ८ दिवसांनी २ फवारण्या केल्या. तर २३ दिवसात मेथी काढणीस आली. २३,२४,२५ या तीन दिवसात काढणी पुर्ण झाली. मेथीची पाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे गोल, १ रू. च्या जुन्या नाण्याएवढी रुंद झाली होती. विशेष म्हणजे प्रत्येक मेथीला ३ - ३ फुटवे फुटले होते. त्यामुळे कमी काडीतच गड्डी तयार होत होती. अशी डबल बांध्याची ३२०० गड्डी निघाली. मेथीला काळोखी व टवटवीतपणा अधिक होता. त्यामुळे बाजारात ५ -६ रू./गड्डी भाव असताना आमची मेथी १० रू./गड्डी भावाने विकली गेली. त्यामुळे १ महिन्याच्या आत ३२ हजार रू. मिळाले. याला खर्च ७ हजार रू. आला. तो वजा करता २५ किलो बियापासून २५ हजार रू. निव्वळ नफा मिळाला.

आता पितृ पंधरावड्यासाठी ५० किलो मेथी बी टाकण्यासाठी आज १७ ऑगस्ट २०१४ रोजी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर,प्रोटेक्टंट घेऊन जात आहे.

माझ्याकडे १।। एकर शेवगा कोईमतूरचा आहे. मध्यम प्रतिच्या जमिनीत ८' x ८'वर २६ जून २०१३ ची लागवड आहे. भाद्रपद महिन्यात वातावरण खराब होते. त्यामुळे फुलगळ होत होती. यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये येऊन शेवग्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंट ही औषधे नेली. त्याची पहिली फवारणी केली असता आठवड्याच्या आतच फुलगळ थांबून लहान - लहान शेंगा लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुढे नियमित १५ दिवसाला याप्रमाणे ५ - ६ सप्तामृत औषधांच्या फवारण्या शेवग्यावर केल्या, तर डिसेंबर २०१३ अखेरीस शेंगा चालू झाल्या. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे लाग (माल) भरपूर लागला. जानेवारी - फेब्रुवारी २०१४ मध्ये ६० ते ८० रू. किलो भाव मिळाला. नंतर मार्च - एप्रिलमध्ये मंदीत २० -२५ रू. भाव मिळाला. नंतर मार्च - एप्रिलमध्ये मंदीत २० - २५ रू. भाव मिळाला. त्यानंतर पुन्हा भाव वाढले. ते जुलै २०१४ अखेर ५० ते ६० रू. किलो मिळाले. या १।। एकर शेवग्यापासून पहिल्याच बहाराचे १० लाख रू. झाले. शेवगा जास्त करून सासवडलाच विकला. काही माल फक्त पुणे मार्केटला विकला. सासवडला पुण्यापेक्षा तेजीचे भावात शेवगा विकला जातो. येथे बाहेरील व्यापारी येऊन भाजीपाला खरेदी करतात. इतर भाजी पाल्या पेक्षा शेवग्याचे पीक शेतकऱ्यास फार परवडते. इतर भाजीपाला काढणीस उशीर झाला तर बदल भावात विकावा लागतो. मात्र शेवग्याची शेंगा काढणीस उशीर झाला तरी तेजीच्या भावातच जाते. उलट वजन वाढते. आता या शेवग्याची छाटणी करून दुसरा बहार धरला आहे.

मी मिलीटरीमध्ये १५ वर्षे नोकरी केल्यानंतर आता शेती करीत आहे. मना पासून आवडीने शेती करून सर्वच पिके उत्कृष्ट आणतो. त्यामुळे सासवडपासून बारामतीपर्यंतचे शेतकरी माझी शेती पाहण्यासाठी येतात. राजुरी गावाला जानाई शिरसाई व पुरंदर उपसा असल्याने पाणी भरपूर आहे.

मी हा अनुभव डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये कथन करत असतानाच झणझणे सासवड, ता. फलटणचे श्री. मनोज अनपट, नेव्ही रिटायर्ड (मो. ९८६९३९३४५७) हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे घेण्यास आले होते. त्यांनी सांगितले "मी २० वर्ष नेव्हीत नोकरी केली. त्यातील १७ वर्षे पाणबुडीवर काम केले. तेव्हा गावातील लोक म्हणत कशाला मरायला भरती झालाय. मात्र मी माझे मनोधैर्य न खचवता आमचे गुरुजी म्हटले होते की, 'कर्म आदमी का पिछा करता है' त्याप्रमाणे मी कर्म चालू ठेवले. आता निवृत्त झाल्यावर वडीलोपार्जित शेती करीत आहे. तेव्हा आजची शेती पारंपारिक राहिलेली नाही. पारंपारिकतेने ती न परवडणारी झाली आहे, म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी इंटरनेटरवरून माहिती घेत असताना मला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची व त्यांच्या सखोल अभ्यासाची जाणीव झाली. त्यावरून 'कृषी विज्ञान' मासिक पाहिले व आज भुईमूग आणि ऊस पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी घेऊन जात आहे.