पांढऱ्या लिलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खुपज फायदेशीर

श्री. पांडुरंग सोपाना शिवले,
मु. तुळापूर, पो. फुलगाव, ता. हवेली. जी, पुणे.
मोबा. ८०५५६५७५९५


गेली ३ वर्षापासून लिलीसाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरात आहे. अर्धा एकरमध्ये लिली लावून ७ वर्षे झाली. खारवट जमीन आहे. पाणी नदीचे पाटाने देतो. लागवड २॥ x १।' वर आहे. लागवडीनंतर तीन वर्षांनी फुले चालू झाली. तोपर्यंत त्यामध्ये धना, मेथी, कांदा अशी आंतरपिके घेत होतो. ४ थ्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिलीची फुले चालू झाली. माल चालू झाल्यावर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या १५ दिवसाला फवारण्या घेतो. तोडा दररोज (कळीचा) करावा लागतो. सुरुवातीला १० ते १५, नंतर २० - २५ व २ महिन्यांनी ४०० पर्यंत बंडल (३५ काडीचा बंडल) निघतो. सप्तामृतामुळे फुटवा भरपूर निघतो. पागार जादा निघून कळी भरपूर लागते. फुले पांढरीशुभ्र मिळतात. एरवी साधारण मळकट रंगाची निघतात. त्यामुळे त्यांना उठाव थोडा कमी राहतो.

फेब्रुवारीत चालू झालेली लिली ४ महिने जून - जुलैपर्यंत जोमाने चालते. नंतर माल कमी होतो. आषाढ - श्रावण महिन्यापर्यंत चालवतो. नंतर जमिनीबरोबर पुर्ण कापून खते देतो आणि सरी काढून मातीची भर लावतो. मधे १।। ते २ महिन्याचा ताण देतो. नंतर पुन्हा जानेवारी - फेब्रुवारीत पागर येऊन फुले चालू होतात. फुलांची विक्री देवाची आळंदी येथे करतो. भाव २॥ रू./बंडल याप्रमाणे मिळतो. बाकीचा उत्पादन खर्च वाढत असल्याने सध्या हा बाजारभाव परवडत नाही. त्यासाठी आज चालू बहाराला सुरूवातीपासून सरांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताच्या फवारण्या करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे माल जादा निघाल्यास तो पुणे मार्केटला विक्रीस आणणे परवडते. येथे बाजारभाव आळंदीच्या तुलनेत जास्त मिळतो.