भेंडी, मिरची, चवळीसाठी हिंगोली भागात सप्तामृताचा यशस्वी वापर

श्री. शिवराम महादजी झुमरे (पाटील),
मु. पो. पान कनेरगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली.
मोबा. ९५७९१०८९४७


माझ्याकडे एकूण ३० एकर जमीन असून त्यापैकी २० एकर पुर्ण बागायती क्षेत्र आहे. या जमिनीमध्ये आम्ही दरवर्षी पारंपारिक पिके घेत असतो.

हिंगोलीमध्ये कृषी प्रदर्शनात आपल्या स्टॉंलला भेट दिली असता आपले प्रतिनिधींनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी विषयी सविस्तर माहिती दिली. त्यावरून ट्रायलसाठी मी ५०० मिली सप्तामृत सेट घेऊन गेलो. त्यावेळी माझ्याकडे भेंडी २० गुंठे मिरची १० गुंठे, चवळी १० गुंठे ही पिके होती. त्यावर वरील सप्तामृताच्या ४ फवारण्या १० ते १५ दिवसाच्या अंतराने केल्या, तर या फवारण्यांमुळे भेंडीला चकाकी आली, पाने हिरवीगार झाली, माल भरपूर लागला. दररोज आम्ही ४० ते ४५ किलो भेंडी तोडत होतो. मालाला चमक असल्यामुळे मोंढा मार्केटमध्ये इतरांपेक्षा ज्यादा भाव मिळत होता. आपला संपूर्ण माल संपेपर्यंत गिऱ्हाईक इतरांच्या भेंडीकडे वळत नसे. सरासरी होलसेल बाजारभाव १६ ते २० रू. किलो मिळाला. भेंडीचा तोडा सतात २ महिने चालू होता. या भेंडीमध्ये आम्ही कोथिंबीरीचे आंतरपीक घेतले होते तर भेंडीला सप्तामृत फवारत असताना ते आपोआपच कोथिंबीरीवरही पडत असल्याने कोथिंबीरीची पाने मोठी, हिरवीगार, चमकदार होऊन फुटवे अधिक निघून वाढ लवकर झाल्याने काढणीस लवकर आली.

या २० गुंठ्यातील भेंडीपासून सरासरी २३ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यावेळी हवामान खराब असल्याने इतरांच्या प्लॉटवर यलो व्हेन मोझॅक व व्हायरसच्या प्रादुर्भावाने भेंडी पिवळी पडून प्लॉट खाल्ल्यास होत होते. मात्र आपल्या प्लॉटला सप्तामृताच्या फवारण्यांमुळे ती वेळ न येता चांगले उत्पादन मिळाले.

भेंडीप्रमाणेच मिरचीलाही सप्तामृत फवारले होते. तर मिरचीला भरपूर कळी लागून झाडे शेवटपर्यंत निरोगी राहिली. एरवी मिरचीवर भुरी, चुरडा - मुरडा येऊन प्लॉट खराब होतात, मात्र या मिरचीला चमक असल्याने बाजारभावही चांगले मिळत होते.

चवळी च्याबाबतीत सप्तामृताची फवारणी केल्यानंतर वेल एकदम तजेलदार दिसू लागले. शेंगाचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढून लांबीतही वाढ झाली. दाणे चांगले भरून चवदारपणा वाढला. आमची स्वत:ची माल वाहतुकीची गाडी असल्याने आम्हाला वाहतूक खर्च कमी आला.

वरील पिकांचा अनुभव पाहता आता १० एकर हळदीसाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञाना वापरणार आहे. त्याकरिता सप्तामृत प्रत्येकी ५ - ५ लिटर आणि हार्मोनी १ लिटर हिंगोलीवरून घेऊन जात आहे. (मुलाखत - फोनवरून १४ ऑगस्ट २०११ रोजी सकाळी १०.०० वाजता)