आंबवणीचे वेळेस जर्मिनेटरची चूळ भरणे फायदेशीर, सप्तामृताने कांदा दर्जेदार व लवकर
श्री. अंकुश सखाराम ढोबळे,
मु. पो. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, जि. पुणे.
मोबा. ९९६०८४५५१३
गेली ५ - ६ वर्षापासून आम्ही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने गरवा कांदा करत आहे. गेल्या
वर्षी १५ डिसेंबर रोजी फुरसुंगी कांदा ३॥ एकरमध्ये लावला होता. जमीन मध्यम प्रतीची
मुरमाड आहे. रोपे जर्मिनेटच्या द्रावणात बुडवून लावली. तसेच आंबवणीच्या वेळी जर्मिनेटर
एकरी १ लि. पाण्यातून सोडले होते. त्यामुळे मुळ्यांचे प्रमाणे वाढले. कांद्याची एरवी
जी सुरूवातीस पात पिवळी पडते ते न होता हिरवीगार होऊन जोमदार फुट वाढते. हा गेली ५
- ६ वर्षापासूनचा अनुभव आहे. नंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि किटकनाशक १ महिन्याचा कांदा
असताना फवारतो. त्यामुळे कीड पडत नाही. पात निरोगी राहते. करप आला नाही. अशा तीन फवारण्या
केल्या. याला सेंद्रिय खते वापरली. कांदा ३॥ - ४ महिन्यात काढणीस आला. कांदा साईजला
एकसारखा गोल्टी मिळाला. भुगी (लहान माल) अत्यंत कमी प्रमाणात होता. कांद्याची पत्ती
घट्ट होती. चमक एकसारखी आकर्षक होती.