अर्ध्या एकर टोमॅटोपासून १ लाख २० हजार रू. नफा

श्री. रामभाऊ नरहरी झगडे,
मु .पो. कटपळ, ता. बारामती, जि. पुणे.
मोबा. ९७३० १६२३४४


मी गेल्या तीन वर्षापुर्वी सिंजेंटा कं. चे अभिनव टोमॅटोच्या २ पाकिटे बियाण्यासाठी जर्मिनेटर १०० मिली आपल्या ऑफिसमधून घेतले होते. बियाण्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून ३१ डिसेंबर २००८ मध्ये गादीवाफ्यावर बी टाकले. थंडी अतिशय असूनही १०० % उगवण झाली. नंतर आठवड्याने एक फवारणी जर्मिनेटरचीच केली. रोपांची वाढ जोपने झाली. रोप २१ दिवसात लागवडीस आले. २१ जानेवारी २००९ रोजी जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लागवड सरी वरंब्यावर ३ x १ फुटावर केली. रोपे अर्धा एकर लागवड होऊन १०० काडी शिल्लक राहिली. जमीन तांबट कलरची खडकाळ होती. पाणी विहिरीचे पाटाने देतो.

जर्मिनेटच्या द्रावणात रोपे बुडवून लावल्याने मर झाली नाही. झाडांची वाढ जोमाने झाल्याने बांधण्याची घाई करावी लागली. लागवडीनंतर ६५ दिवसात मार्केटला माल आला. तोडा आठवड्यातून ३ वेळा करत होतो. ५ महिने तोडे चालू होते. एकूण ९०० क्रेट माल निघाला. प्रत्येक तोड्याला ३५ ते ४० क्रेट माल निघाला तरी अर्ध क्रेटही खराब, किडके मालाचे निघत नव्हते. बारामती मार्केटला पुण्याचे मॉलवाले खरेदीस येत होते. ९० रू. क्रेटपासून २२५ रू./१० किलो या भावाने मालाची विक्री झाली. १५ ऑगस्ट २००९ ला शेवटचा तोड केला. अर्ध्या एकराला सराव मिळून १५ हजार रू. खर्च आला आणि उत्पन्न खर्च वजा जाता १ लाख २० हजार रू. मिळाले.