तालुक्यातून लोक वांग्याचा प्लॉट पहायला येत पाच महिने वांग्याचे उत्पन्न

श्री. बाळासाहेब महादेव रोडे,
मु. पो. जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर.
मोबा. ९४०४२५२२२१


माझेकडे तांबुस हलक्या स्वरूपाची जमीन आहे. त्यापैकी एक एकरमध्ये वांगी महिको नं. १० ची २ वर्षापुर्वी मे २००९ ला उन्हाळ्यामध्ये जर्मिनेटर २५० मिली + १० लिटर पाणी या प्रमाणामध्ये द्रावण तयार करून रोपे ८' x ३' या अंतरावर सरी पद्धतीने लावली असता मे च्या उष्णतेमध्येही रोपे चांगली व लवकर वाढली. पांढऱ्या मुळीची कार्यक्षमता वाढल्याने अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया वाढल्यामुळे झाडे सतेज झाली. या अनुभवावरून प्रत्येक तीन आठवड्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी पुणे ऑफिसमधून सरांनी सांगितल्याप्रमाणे सप्तामृत फवारणी घेत आहे. औषधे पुणे ऑफिस आणि चोरडीया ब्रदर्स, जामखेड यांचे येथून आणतो. दर २१ दिवसांनी सप्तामृत फवारणी केली. त्यामुळे पाऊस आमचे भागामध्ये उशिरा पडूनही लागवडीनंतर दोन महिन्यांनी म्हणजेच जुलै २००९ ला तोडे सुरू झाले. ते पाच महिने माल अपेक्षेपेक्षा जास्त चांगला व सतेज निघत होता. झाडांची उंची साधारण ४ ते ५ फुट आहे. तालुक्यातून व पंचक्रोशीतून भरपूर शेतकरी येऊन प्लॉट बधून जात होते. मी त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे तंत्रज्ञान वापरल्याचे सांगत होतो. आता वांग्याच्या अनुभवातून इतर भाजीपाला पिकांसाठी जर्मिनेटर २ लि. आणि थ्राईवर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. घेऊन जात आहे.