वांग्याची मर थांबून दर्जेदार उत्पन्न गोल्डन डेजीसाठी सप्तामृत उपयुक्त

श्री. सुरेश लक्ष्मण लोखंडे,
मु. पो. मरकळ, त. खेड, जि. पुणे.
मोबा. ९८५००२ ०६८७


माझेकडे मरकळ येथे मध्यम स्वरूपाची ३ एकर जमीन आहे. त्यामध्ये सध्या दीड एकर ऊस ८६०३२ आहे आणि दीड एकरमध्ये (६० गुंठे) गोल्डन डेजीची २' x १॥' या अंतरावर सारी पद्धतीने लागवड केली आहे. पाणी पाटाने देतो. वरील जमिनीसाठी रासायनिक खते + औषधे आणि सेंद्रिय खते + औषधे अशी दोन्ही पद्धतीने शेती करत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधींनी सप्तामृत आणि कल्पतरू सेंद्रिय खताबद्दल सविस्तर माहिती दिली.

माझ्याकडे त्यावेळी २० गुंठे वांगी होती. ती तीन महिन्याची झाल्यानंतर मर होत होती. त्यासाठी मी त्यावेळी पुणे ऑफिसमध्ये येऊन डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची चौकशी केली. मर होऊ नये म्हणून जर्मिनेटर + १०० लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणा ने आळवणी केले आणि आठवड्याने पुन्हा सप्तामृत औषधे घेऊन गेलो. त्याच्या आठवड्याच्या अंतराने दोन - तीन फवारण्या केल्या. त्यामुळे प्लॉटची मर थांबून पानांना काळोखी येऊन फुटवा वाढला. फुलकळी, माल वाढला. फळे किडमुक्त मिळाली. त्यामुळे वांग्याचे चांगले पैसे झाले. यावरून मी सतत तंत्रज्ञान वापरत आहे. आज गोल्डन डेजीवर तांबेरा जास्त प्रमाणात असल्यामुळे सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.