रासायनिक औषधांनी आटोक्यात न आलेला करपाणाऱ्या कारल्याचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन दर्जेदार उत्पादन भाव २५० ते ३०० रू./क्रेट

श्री. कृष्णा ज्ञानेश्वर म्हस्के,
मु. वरूड, पो. नाव्हा, ता.जि. जालना.
मोबा. ८९५६१५११७१


आम्ही अंकुर कंपनीच्या श्रेया जातीच्या कारल्याची लागवड फेब्रुवारी (२०१२) च्या पहिल्या आठवड्यातच केली होती. या एक एकर क्षेत्रात अगोदर द्राक्ष होती. ती काढल्यानंतर डॉंग्रीज लावली व त्यामध्येच कारल्याची लागवड केली. डॉंग्रीज वाढीस लागेपर्यंत कारल्याचे वेल तारेवर चढवले. कारल्याला डी.ए.पी. दीड बॅग, १०:२६:२३ दीड बॅग आणि युरिया १ बॅग एवढे रासायनिक खत ३ टप्प्यात विभागून दिले. एकदा गोबर गॅसमधून बाहेर येणारी स्लरी प्रत्येक वेलास २५० ते ३०० मिली याप्रमाणे दिले. कारली साधारणपणे दीड महिन्याची असताना पाने पिवळी पडून वेळ पुर्णपणे करपून जात होते. तेव्हा मी इतर रासायनिक औषधे २ - ३ वेळा वेगवेगळी वापरून पाहिली, मात्र कारल्याला बिलकुल रिझल्ट आला नाही.

याच कालावधीत योगायोगाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रतिनिधी भगवान जैवळ यांची भेट झाली. त्यांनी मला प्रोटेक्टंटचे ड्रेंचिंग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ड्रेंचिंग केले व जर्मिनेटर ३५ मिली १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यानंतर ५ दिवसांनी पुन्हा याचप्रमाणे दुसरी फवारणी केली. त्याने मला पाहिजे तसा रिझल्ट मिळाला. पाने हिरवीगार झाली. वेल एकदम सुदृढ झाले. फुले लागल्यानंतर पुन्हा थ्राईवर व जर्मिनेटर प्रत्येकी ३५ मिली प्रति पंपास घेऊन वापरले तर फुलगळ थांबून फुले भरपूर प्रमाणात लागली.

साधारण २ - २। महिन्यात कारले चालू झाले. तेव्हा प्रिझम व न्युट्राटोन या औषधांची प्रत्येकी ४० - ४० मिली प्रति पंप याप्रमाणे फवारणी केली. तेव्हा कारली एकदम चमकदार व वेल मांडवावर असल्याने एकसारखी सरळ मिळत होती. १५ ते २० क्रेट माल दररोज निघतो. ऐन उन्हाळ्यात (१५ एप्रिल) माल सुरू झाल्याने त्यावेळेस भाव २५० ते ३०० रू./क्रेट (१४ - १५ किलोस) मिळत होता. कारल्याचा दर्जा अतिशय उत्तम असल्याने भाव जालना मार्केटला एक नंबर मिळत होता. पुढे - पुढे कारल्याची आवक मार्केट मध्ये वाढू लागली त्यामुळे एकूणच बाजारभाव उतरले तरी १०० ते १५० रू./क्रेटपर्यंत भाव मिळत होते.

ही कारली २० जुलैला संपली. तरी यापासून ४० - ४५ हजार रू. उत्पन्न मिळाले. याला एकूण खर्च ६ ते ७ हजार रू. आला. .

डॉंग्रीजमधील आंतर आंतरपीक डेमस्याचे १ महिन्यात १० ते १२ हजार

कारल्यासोबतच ढेमसे याच क्षेत्रात लावले होते. ढेमसे कारले वाढीस लागेपर्यंत सव्वा महिन्यातच चालू झाले. तिसऱ्या दिवशी ३ ते ४ क्रेट माल निघत होता. याला देखील उन्हाळ्यात २५० ते २७५ रू. प्रति क्रेट भाव मिळत होता. ढेमसे महिनाभर चालल्यावर नंतर डॉंग्रीज द्राक्षबागेला गर्दी होवू लागल्याने चालू ढेमसे प्लॉट च काढून टाकला. तरी या ढेमस्यापासून १० ते १२ हजार रू. झाले.

सरकी ५ एकर १५ जुनची लागवड आहे. ब्रह्या, मल्लिका, सुदर्शन या वाणाची कपाशी आहे. एकेरीपट्टा ४ फुटाचा असून २ झाडात १।। फुटाचे (४' x १।।') अंतर आहे. या कपाशीला बाकीच्या औषधांच्या आतापर्यंत ३ फवारण्या झाल्या आहेत. एक फवारणी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची केली आहे. सध्या कपाशी निरोगी आहे. मात्र पावसाने ताण दिल्याने पाने सुकायला लागली आहेत.