वर्षातून एकाच जमिनीवर तीन पिके, कुंदन खरबुजाचे १।। ते २ लाख, टोमॅटोचे २ लाख तर दोडक्याचे १।। लाख

श्री. विठ्ठल दत्तात्रय नवगिरे,
मु.पो. पिंपळ खुंटे, ता. माढा, जि. सोलापूर,
मो. ८१४९८६०७९२


२ वर्षापासोन खरबुज, टोमॅटो, दोडका, काकडी या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. त्यामुळे मर, करपा, भूरी अशा रोगांपासून पिकाचे संरक्षण होऊन खात्रीशीर उत्पादन मिळते. आमची एकूण १।। एकर जमीन (मध्यम काळी, पोयटायुक्त) आहे. यामध्ये १।। एकराचा १ आणि १ एकरचा १ असे २ प्लॉट आहेत. ही सर्व पिके बेडवर घेतो. एकरी ४ ट्रॉली शेणखत देऊन बेसल डोसमध्ये १८:४६ च्या २ बॅगा, पोटॅशच्या २ बॅगा, निंबोळी पेंड ४ बॅगा, १०:२६:२६ च्या २ बॅगा, कॅलमॅग्नेटच्या २ बॅगा आणि सफलच्या २ बॅगा असा खताचा डोस १।। फूट रूंदीचे बेडमध्ये देऊन त्यावर मल्चिंग पेपर अंथरतो. २ बेडमध्ये ६ फुटाचे अंतर असते. जैनची इन लाईन ठिबक आहे. एकदा बेड तयार करून मल्चिंग केली की त्यावर ३ पिके आरामात निघतात.

दोन्ही प्लॉटमध्ये वेगवेगळ्या हंगामात पिके घेतो. म्हणजे एका प्लॉटमध्ये कुंदन खरबूज सप्टेंबरच्या सुरूवातीस लावतो. २ महिन्यात ते निघते, त्यानंतर लगेच त्याचे वेल काढून १ नोव्हेंबरला नागा वाणाचा दोडका लावतो. तो सव्वा महिन्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चालू होतो. दिवसाआड तोडा करतो. दोडका जानेवारी अखेरीस संपला की लगेच उन्हाळी टोमॅटो लावतो. हा प्लॉट मे महिन्यात संपला की बेड काढून पुन्हा मशागत करून वरिलप्रमाणे खत मात्रा देऊन जुनला पुन्हा नवीन फ्रेश बेड तयार करतो.

दुसऱ्या प्लॉटमध्ये जानेवारीला खरबुज लावले की ते मार्चमध्ये संपते. त्यानंतर एप्रिलमध्ये दोडका लावतो. तो सप्टेंबरमध्ये संपला की मग लगेच सप्टेंबर - ऑक्टबर मध्ये टोमॅटो लावतो. अशा प्रमाणे पीक पद्धती असते.

सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बीजप्रक्रियेपासून वापरतो. जर्मिनेटमुळे उगवण ९५ ते १००% होते. त्यानंतर दर महिन्याला जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करतो. तसेच दर १० व्या दिवशी माल चालू होईपर्यंत जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, हार्मोनीच्या फवारण्या घेतो. त्यामुळे मर, करपा, भुरी, डावण्या रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. पिकाची वाढ झपाट्याने होऊन लवकर फुल व फळधारणा होते. माल लागण्यासा सुरुवात झाली की थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन, हार्मोनीच्या फवारण्या घेतो. त्यामुळे रोगमुक्त प्लॉट राहून फुलगळ होत नाही. फळधारणा मोठ्या प्रमाणात होऊन मालाचे पोषण चांगल्याप्रकारे होते. मालाला कलर, आकर्षकपणा येतो. टिकाऊपणा वाढतो. दर्जा सुधारल्याने बाजारभाव तेजीचे मिळतात. बाजारात माल लकवर विकला जातो.

कुंदन खुरबुजाचे १० दिवसात तोडे संपतात. एकरी १५ टन उत्पादन मिळते. बाजारभाव २० रू. पासून ४० रू./किलोपर्यंत तेजी - मंदीनुसार मिळतात. एकरी खर्च ५० हजार रू. पर्यंत होतो. बाजारभाव जर १५ - २० रू. किलो सापडले तर १। ते १।। लाख रू. होतात आणि ३० - ४० रू. किलो भाव मिळाले तर २ लाख रू. होतात

दोडक्याला एकरी ३० हजार रू. पर्यंत खर्च येतो. २० रू. किलो भाव मिळाला तरी एकरी १।। ते २ लाख रू. होतात.

टोमॅटो १० रू. ने गेले तरी २ लाख रू. होतात. याला तार काठीसह सर्व खर्च ६० - ७० हजार रू. पर्यंत होतो.

खर्च सुरुवातीला मल्चिंगला १५ हजार रू., खते देऊन ती बुजवायला ५ हजार रू. मजुरी, शेणखत २० हजार रू. रायासनिक खते १२ हजार रू., डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांवर १० ते १२ हजार रू. असा सुरूवातीच्या पिकाला खर्च येतो. त्यानंतरच्या पिकांना खते व मल्चिंगचा सोडून बाकी वरीलप्रमाणे खर्च होतो. बियाणे, तोडणी, वाहतूक हा वेगळा खर्च होतो. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्पादन व दर्जाची खात्री असल्याने गेल्या २ वर्षापासून ह्या पीक पद्धतीपासून आम्ही १००% यशस्वी शेती करीत आहोत.