१० वी नंतर इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून सरांच्या तंत्रज्ञानाने यशस्वी शेती करतो

श्री. देविदास सदाशिव यादव,
मु.पो. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो. ९७३०६९२८१४


माझ्याकडे माळशिरस येथे मध्यम प्रतीची १० गुंठे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये टोमॅटो - ८११ वाणाची लागवड २८ मे २०१५ ला केली आहे.

आता टोमॅटो २।। ते ३ फूट उंचीचा असून १५ दिवसापासून पाऊस नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्यावर हे पीक आले आहे. आज ४ वी फवारणी करण्यासाठी औषधे नेण्यास आलो आहे. टोमॅटोला ड्रीप आहे. बोअरला सिंगलफेज मोटर आहे. ८ - १० दिवसांनी रात्रभर पाणी देतो. १० गुंठे टोमॅटोला सध्या बुरशी लागली आहे. सरांनी सांगितले, "पाऊस नसतांना बुरशी लागण्याचे कारण असे की टोमॅटो हे संवेदनशील पीक असून पानांवर लव असते. रात्री आर्द्राता असते व रात्रभर ड्रीप चालले तर असे वातावरण बुरशीला अनुकूल ठरते. तेव्हा सप्तामृत ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारणे. नंतर आलटून पालटून बावीस्टीन व स्ट्रेप्टोसायक्लीन फवारणे आणि रात्रभर ठिबक चालवू नये ही दक्षता घेणे. कारण आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर रात्रभर ठिबक चालले तर कोवळ्या फुटीवर अर्लीब्लाईट, करपा, बुरशी येण्याची शक्यता आहे. तसेच फळांवर देवीच्या आकाराची टीक (ब्राऊनरॉट) पडण्याची शक्यात आहे. ही होऊ नये म्हणून सप्तामृत टोमॅटो अंकात दिल्याप्रमाणे फवारावे. पावसचे मान, ढगाळ हवा, हवेतील आर्दता ही फळांच्या ब्राऊनरॉटला अनुकूल ठरते. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वरील सुचण केली आहे. "

पावसाळ्यात पाऊस नसल्यावर फवारणी कधीही चालते. फवारणीनंतर २ तासाने पाऊस पडला तरी चालते. फक्त उन्हाळ्यात संध्याकाळी फवारणी करावी. फळे जास्त लागण्याकरीता सप्तामृत २५० मिली किंवा ५०० मिली आणि हार्मोनी १०० ते २०० मिली/ १०० लि. पाणी असे दर ८ ते १० दिवसांनी फवारणे. दरम्य रासायनिक फवारणी करू नये. हे प्रतिबंधात्मक उपाय पुरेसे ठरतील. टोमॅटोला ६०० ते ७०० रू. प्रति क्रेट बाजारभाव मिळाला. मी टोमॅटो शेवाळवाडी, हडपसर मार्केटमध्ये विक्रिला आणतो. या सर्व तंत्रज्ञानाने झाडाची वाढ झपाट्याने होते. फुलकळी जास्त प्रमाणावर लागून भरपूर फळधारणा होते. माल इतका लागतो की दोरी तुटते, तारा वाकतात, माल वजनाने खाली पडतो. सरांनी सांगितले की, "३ ते ४ फुट उंचीवर दोरी बांधावी, तंगुस वापरू नये, त्याने फांदीला कड पडते त्यासाठी टोमॅटो बांधण्याची सुतळी वापरणे. यापद्धतीमुळे चौफेर हवा खेळती राहून चौफेर वारा लागतो. फळाचे व झाडाचे पोषण एकसारखे होईल. फळाचे वजन, गोडी, चमक, रंग वाढेल. क्रेटमध्ये माल भरल्यावर त्याचे वजन २० किलो ऐवजी २५ किलो भरते. रोगराई व कीड कमी राहते." इथे सरांनी एक किस्सा सांगितला की, "सांगलीच्या मार्केटमध्ये एका शेतकऱ्याने टोमॅटोचे उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेतले होते. तेव्हा एवढ्या उत्कृष्ट क्वालिटीच्या मालाचे उत्पादन झाले होते की गाळ्यावरच्या दलालाने एक टोमॅटो १५ फुटावरून ट्रकच्या चाकावर फेकुन मारला आणि ते टोमॅटोचे फळ तेथून उचलून पाहिले तर त्या टोमॅटोला काहीही झाले नव्हते. तो इतका कडक (टणक) रसरशीत व पोसलेला होता, हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वैशिष्ट्ये आहे. हे मार्केटमधल्या लोकांनी पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. अशा मालाला तेथे चांगला भाव मिळाला.

दुसरा अनुभव सरांनी असा सांगितला, "सतिश पाटील, भालकी (जि. बीदर) कर्नाटक यांनी गावातल्या शेतकऱ्यांबरोबर ५ वर्षापूर्वी टोमॅटो केला होता. टोमॅटो त्यावेळेस दोन महिने सारखा पाऊस असल्याने गावातल्या लोकांचे प्लॉट सडून गेले. सतिशने मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या, त्यामुळे त्यांचा प्लॉट वाचला, तेव्हा त्याने सरांना फोन करून विचारले सर गावातले सर्व शेतकऱ्यांचे टोमॅटोचे प्लॉट अधिक पावसाने गेले. तर आपला प्लॉट वाचलाय. तेव्हा आपल्याला टोमॅटोचे पैसे होतील का ? टोमॅटो एक एकर आहे. त्यावर सरांनी सांगितले एक ते दीड लाख रुपये सहज होतील. पण आपले तंत्रज्ञान व कल्पतरू हे शिफारशी प्रमाणे वापरले पाहिजे. यावर सतिश पाटलांनी उत्तर दिले की तसे झाल्यास पुण्याला तुमची भेट घेऊन परिस्थिती सांगेन. प्रत्यक्षात दोन महिन्यानंतर सतिश पाटील यांचे टोमॅटोच्या १ एकर प्लॉट मधील मालाचे ४ लाख रू. झाले. सतिश पाटील यांनी पुन्हा कर्नाटक मधून सरांना फोन करून विचारले, सर टोमॅटो किती पैसे झाले असतील ? त्यावर सरांनी उत्तर दिले की, तुमच्या टोमॅटोच्या पिकाचे २ लाख रू. पर्यंत उत्पादन झाले असेल. यावर सतीश पाटलांनी हसत सांगितले की, सर टोमेटोचे मला ४ लाख रुपये केवळ आपल्या तंत्रज्ञानामुळे झाले. "

पाऊस नसल्याने व तापमानातील बदलाने बऱ्याच जणांच्या टोमॅटोची वाढ खुंटली आहे व प्लॉट गेले आहेत. त्यामानाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आमचा प्लॉट उत्कृष्ट आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे टोमॅटोवर पाचवी फवारणी पंपाला जर्मिनेटर ३० - ४० मिली, थ्राईवर ५० मिली, क्रॉपशाईनर ६० - ७० मिली, राईपनर ४० - ५० मिली, प्रोटेक्टंट दोन काडेपेटी, न्युट्राटोन ४० मिली, प्रिझम ३० मिली, हार्मोनी ३० मिली, १५ लिटर पाण्यातून पानांच्या दोन्ही बाजुने फवारणी करणार आहे, पाऊस पाणी नसल्याने टोमॅटोला उठाव चांगले आहेत. सध्या (१९ जुलै २०१५) ३०० ते ४०० रुपये/ क्रेट भाव मिळत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मात्र टोमॅटोचे दर प्रचंड खाली म्हणजे ५० रू. प्रति क्रेट (२० किलो) झाल्याने परवडत नाही.

मागच्या वर्षी टोमॅटो ५ गुंठ्यात ४० हजार रुपये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे झाले होते. त्यानंतर पाऊस जास्त झाला, बागेत पाणी साठले. त्याने पांढरी मुळी मुकी झाली आणि अचानक मर झाली. अशा अवस्थेत सरांनी सांगितले, "मर काढून टाकून जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करून सप्तामृत व हार्मोनी, स्ट्रेप्टोसायक्लीन फवारणे, म्हणजे ड्रेंचिंगमुळे पांढरी मुळी मुकी झालेली पुन्हा जोमाने चालते व फवारणी मुळे नवीन फुट निघुन फुलकळी लागते. अशा पद्धती ने खोडवा पीक देखील कमी खर्चात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगले उत्पादन मिळवून देते.

मी सध्या कासुर्डी, ता दौंड येथे १० वी नंतर (७२%) इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचा अभ्यास तथा कोर्स करित आहे. तसेच आता कॉलेज करून मी वडीलांच्या सोबत शेतीदेखील करत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे रिझल्ट विषयी कृषी विज्ञानमध्ये वाचण्यात आल्याने माझे वडील निर्घास्त झाले आहेत. माझ्या आत्मविश्वासामुळे त्यांना खात्री नि विश्वास आहे. अशा प्रकारे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून जर प्रयोग यशस्वी केले तर मालाची निर्यात होऊ शकते. सार्क राष्ट्रामध्ये चांगल्या दराने कुठेही निर्यात करून बक्कल पैसे होऊ शकतात.

सध्या सरांनी सांगितलेली औषधे घरी पुरेशी असल्यामुळे पुन्हा १५ दिवसांनी येणार आहे व दोन वर्षाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मला पुन्हा आत्मविश्वास व उमेद आली आहे. मी माझा तीन वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर माझा धाकटा भाऊ सध्या ५ वी त शिकत असल्याने मी नोकरी करून शेती सांभाळणार आहे. माझी एकूण ७ एकर शेती आहे, परंतु ती जमीन पडीक आहे. चालू जमिनीत सध्या कापरी, बाजरीचे पीक घेतल्याने त्याचा मला फायदा होतो.

मी हायब्रीड तुळजापुरी २.५ महिन्यात येते ती करतो. सरांचे तंत्रज्ञाना वापरून ती चांगली येते. सध्या आषाढात मार्केट हवे तसे मिळत नाही. श्रावणात फुलाला मार्केट चांगले असते. त्यावेळेस ७० ते ८० रू. प्रति किलो अशा दराने तुळजापुरी विकली जाते. गेल्यावर्षी मी ५ गुंठ्यातून ४० हजार रू. ची तुळजापुरी विकली होती.

पुण्याच्या भुलेश्वर जवळील अर्वषण प्रवण भागात माळशिरस अशा ठिकाणी बाकीची जमीन आहे तशीच सोडून दिली. त्यामुळे कमी खर्चात, कमी जमिनीवर दर्जेदार उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेत आहे. सरांनी मला मार्च २०१५ चा अंक दिला. त्या अंकात गुजरातच्या एका शेतकऱ्याने सांगितले आहे की, कृषी विज्ञान म्हणजे 'गिता' व कृषी मार्गदर्शिका म्हणजे 'बायबल' आहे. कारण सरांचा असा दंडक आहे की खेड्यातील तरुण मुलांनी शेती सोडू नये, उलट त्यांनी कमी शेती असताना नवनवीन प्रयोग करावेत. जर भारतातील तिसऱ्या जगातील तरुणांनी योग्य रितीने नियोजन करून जर शेती केली तर हे तंत्रज्ञान देशाला तारक ठरेल आणि देशाला सुवर्णकाळ प्राप्त होईल.