डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने हळदीची मर ना होता व हळद न लागता एकरी २७ क्विंटल म्हणून यावर्षी हळद, ऊस, कापूस, सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर
श्री. आनंदराव उत्तमराव सुरोशे, मु.पो. शिंदगी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६.
मो. ९६८९१५९७५१
माझ्याकडे एकूण २२ एकर जमीन आहे. मी दरवर्षी हळद पीक घेत आहे. पण ते पारंपारिक पद्धतीने
घ्यायचो. यावेळी आमच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कंपनी प्रतिनिधींची भेट झाली
आणि त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी बद्दल माहिती दिली. त्यामुळे यावर्षी माझ्याकडील
हळदीचे पीक पारंपारिक पद्धतीने न घेता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने घेत आहे. तर मी हळद लागवड
करण्याआधी बेडवर एकरी S.S.P. ३ पोते व कल्पतरू खत २ पोटे टाकले आणि जर्मिनेटर + क्लोरोपायरीफॉस
+ साफ यांची बेणेप्रक्रिया केली. त्यानंतर माझी हळद २० व्या दिवशी दिसायला सुरुवात
झाली. उगवण चांगली झाली. उगवणीनंतर जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + क्रॉपशाईनर
२५० + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १००
मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी केली. नंतर १ महिन्यानंतर ५ फवारण्या करण्यात
आल्या. त्यामुळे उगवून आलेल्या कोंबाला मर रोगापासून संरक्षण मिळाले. पिकाची वाढ निरोगी
व पाने हिरवीगार दिसत होती.
दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत न्युट्राटोन, राईपनरचा वापर केला तर पानाला चमकदारपणा, तजेलदारपणा आला. हळदीच्या फुटव्यात वाढ होऊन कंद न कुजता, न सडता पोषण चांगले झाले . जर्मिनेटर व प्रिझममुळे हळदीच्या वाढीस मदत होते तसेच मर लागणे, हळद लागणे (सडणे) याला प्रतिबंध होतो. थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीमुळे पानावर येणारा करपा, ठिपके हे प्रकार दिसत नाहीत. पाने वेडी वाकडी न होता सरळ व टवटवीत होतात. राईपनर, न्युट्राटोनने हळदीच्या फण्यांची संख्या वाढली. चांगल्या प्रतीची हळद झाली आहे. मला एकरी २७ क्विंटल उत्पादन मिळाले. चालू वर्षी मी हळद, ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे.