मिरची रोगमुक्त होऊन बेळगाव मिरचीपेक्षा सरस व खोडवाही केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने
श्री. प्रशांत गणपत पालेकर,
मु.पो. इंदोली, ता. कराड, जि. सातारा,
मो. ९९२२७९७७०९/९९६०३१९४३८
आम्ही ट्रॉपीका - १०७४ या जातीच्या मिरचीची रोपे १५ फेब्रुवारी २०१६ रोजी २० गुंठ्यामध्ये
लावली. जमीन माध्यम प्रतीची असून ३ फुट रुंदीच्या बेडवर मल्चिंग पेपरचे अच्छादन करून
त्यावर १।। - १।। फुटावर ही मिरची लावली आहे. २ बेडमध्ये २ फुटाचे अंतर आहे. अशा पद्धतीने
५' x १।।' असे झाडांतील अंतर आहे.
१५ एप्रिल २०१६ ला ही मिरची चालू झाली. पहिला तोडा ५०० किलोचा निघाला. नंतर ७०० किलोचे ३ तोडे झाले. मात्र यादरम्यान (१० एप्रिलपासून) तापमानात प्रचंड वाढ होऊन ४२ डी. ते ४३ डी. वर पारा गेल्याने त्याचा मिरचीवर दुष्परिणाम होऊ लागला. मिरचीवर व्हायरस, आकसा, बोकड्याचा प्रादुर्भाव होऊन अधिक तापमानाने फुल टिकेना, लहान मालही गळू लागला. फळधारणा पुर्णपणे बंद होऊन तोडे थांबले, अशा परिस्थितीत काय करावे समजेना. खर्च तर बराच झाला होता.
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा ५ - ६ वर्षापुर्वी आले पिकावर वापर केला होता. त्याचा उत्तमप्रकारे रिझल्ट मिळाला होता. मात्र प्रत्येकवेळी पुण्यावरून औषधे आणून वापरणे शक्य नव्हते व जवळपास डिलरकडेही औषधे मिळत नव्हती. त्यामुळे मध्यंतरी खंड पडला.
रोग बरा होऊन रोज १ टन मिरची
आता मात्र पर्याय नव्हता म्हणून पुणे ऑफिसला फोन करून मिरची पिकाची परिस्थिती सांगून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची माहिती घेतली. यावेळी मला तेथून सातारा जिल्ह्याचे कंपनी प्रतिनिधी दिपक खळदे (मो. ७३५०८६६८७३) यांची माहिती मिळाली. त्यांनतर ते आमच्या प्लॉटवर येऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनी आणि अॅक्ट्रा या औषधांची फवारणी केली. फवारणीनंतर २ - ३ दिवसातच मिरची पिकावरील बोकड्या, आकसा रोग कमी होत असल्याचे जाणवले व पाने रुंद, हिवरी होऊन नवीन फुट सुरू झाली.
त्यानंतर प्रतिनिधींनी सप्तामृतची दुसरी फवारणी करण्यासाठी औषधे उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुर्ण प्लॉटचा फुटवा वाढून पानांना काळोखी आली. नवीन फुलकळी देखील निघू लागली. त्यानंतर ८ - १० दिवसांनी पुन्हा सप्तामृतची तिसरी फवारणी केली असता १५ मे ला बंद झालेली मिरची २० जुनला पुन्हा चालू झाली. पहिलाच तोडा (२० जुनचा) १ टन मिळाला. मालाला आकर्षक हिरवा - पोपटी रंग व चमक येऊ लागली. दररोज तोडा करत होतो. कधी - कधी पुर्ण क्षेत्राची तोडणी दिवसभरात (माणसांअभावी) उरकली नाही की, ६०० ते ७०० किलो माल तोडला जात असे आणि दुसऱ्या दिवशी मात्र १४०० ते १६०० किलो माल निघत होता. काल (१७ जुलै २०१६ रोजी) १६०० किलो मिरची निघाली.
बेळगावच्या मिरचीपेक्षा उत्तम
कराड, उंब्रजचे व्यापारी घरी येऊन जागेवरून सुरुवातीला ६० रु./किलोने नेत असत. नंतर भाव वाढल्यामुळे ७० रु. ने जागेवरून जाऊ लागली. सध्या ५० रु./किलो भाव मिळत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्या घेत असल्याने मिरचीला आकर्षक चमक आहे. बाजारात बेळगावची मिरची विक्रीस येत आहे. ता मिरचीच्या शेजारी आपली मिरची ओतली असता गिऱ्हाईक प्रथम आपल्या मिरचीकडे आकर्षित होते.
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खोडवाही
ह्या मिरचीचा बहार संपत आल्याने आता ८ - १० दिवसात संपेल असे वाटत होते. त्यामुळे त्या मल्चिंगवर काकडी लावणार होतो. मात्र या ४ - ५ दिवसात खालून नवीन फुट जोमाने निघत असल्याने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने याचाच खोडवा घेणार आहे. त्यामुळे आता काकडी ऑगस्टमध्ये टोकणार आहे. म्हणजे मिरची ऑगस्टअखेर संपेपर्यंत काकडीचे वेल वाढीस लागलेले असतील.
८ गुंठे भेंडी १।। महिन्यात १ टन, उत्पन्न ३० हजार, अजून १ महिना चालेल
या मिरचीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असताना माझ्याकडील भेंडी व मोगऱ्यालादेखील याचा वापर केला. भेंडी ८ गुंठ्यात १५ एप्रिल २०१६ ला लावली आहे. भेंडीला नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या करत असल्याने १ जुनला चालू झाली. दररोज तोडा करीत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृत फवारण्यांमुळे मालाला आकर्षक चमक व काळोखी आहे. त्यामुळे उंब्रजचे व्यापारी ३० रु./किलोप्रमाणे भेंडी घेतात. ८ गुंत्यातून दररोज २० ते २५ किलो माला निघत आहे. १।। महिन्यात (१५ जुलै पर्यंत) १ टन माल निघून ३० हजार रू. झाले आहेत. अजून भेंडीचे तोंडे चालू आहेत. किमान १ महिना तोडे सहज चालतील, अशी पीक परिस्थिती आहे.
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३०० रु. किलो मोगरा दादर मार्केटला रोज २० ते २५ किलो (६ ते ७.५ हजार रु. रोज)
२ वर्षापुर्वी १।। एकरमध्ये ६' x २' वर मोगरा लावला आहे. तो जून २०१६ ला चालू झाला. दररोज १५ - १६ किलो मोगरा निघत होता. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या मिरची. भेंडीच्या अनुभवातून २ फवारण्या केल्या. तर कळी वाढून दररोज २० ते २५ किलो मोगरा निघू लागला. हा मोगरा दादर मार्केटला पाठवितो. सध्या ३०० रु./किलो (१८ ऑगस्ट २०१६) भाव मिळत आहे.