डाळींबाच्या निर्जीव मोडणाऱ्या काड्या दुरुस्त होऊन बाहार यशस्वी, ४।। लाख रू. उत्पन्न केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे

श्री. नामदेव यशवंत पापत,
मु.पो. पिंपरी दुमाला, ता. शिरूर, जि.पुणे.
मो.९८६०९६४९२३



आम्ही २ वर्षापूर्वी लावलेली १ एकर भगवा डाळींब बाग आहे. १०' x ८' अंतरावर एकूण ४०० झाडे आहेत. जमीन मध्यम प्रकारची आहे. या बागेला लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरत आहे. सुरुवातीला रोपे लहान असताना जर्मिनेटरचे प्रत्येक महिन्याला आळवणी करीत होतो. तसेच आवश्यकतेनुसार सप्तामृताच्या फवारण्या करत होतो. त्यामुळे झाडाची वाढ व फुट जोमदार झाली होती. त्यामुळे १८ महिन्यातच बहार धरण्यास योग्य अशी झाडे तयार झाली.

बहार धरत असताना बेसल डोसमध्ये कल्पतरू ५० किलोच्या ५ बॅगा, १०:२६:२६ दोन बॅगा आणि निंबोळी पेंड २ बॅगा असा असा वापर केला आणि पानगळ झाल्यावर पहिले पाणी देताना जर्मिनेटर २ लि. + १३:००:४५ चार किलो / एकरी सोडल्यामुळे जोमदार फुट निघाली. चौकी सशक्त निघाली. चौकी अवस्था असताना प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + हार्मोनी ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केल्यामुळे मादी फुले जास्त प्रमाणात निघाली. फुले एकसारखी निघाल्यावर परागीभवनासाठी प्रोटेक्टंट १ किलो २०० लि. पाण्यातून फवारले असता सेंटिग चांगली झाली. प्रत्येक झाडावर ५० ते ६० फळे धरता आली. प्रत्येक ८ ते १० दिवसाच्या अंतराने थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केल्यामुळे फळांना एकसारखी फुगवण व चमक मिळाली. तसेच विशेष म्हणजे खरड्याचे एकही फळ निघाले नाही. शेवटी फळांना रंग, गोडी व चमक येण्यासाठी राईपनर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे २ फवारण्या केल्या. त्यामुळे फळांना रंग, चमक येऊन गोडी वाढल्याने बाजारभाव ही चांगला मिळाला. पहिल्या बहरापासून जवळपास २८० जाळी (क्रेट) म्हणजे ५।। टन माल निघाला. त्याला ७०० - ८०० - ९०० रु./जाळी (क्रेट) असा भाव मिळून त्याचे २ लाख रु. झाले. हे उत्पादन घेताना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे श्री. सय्यद साहेब व आमले (मो. ९८६००७२५४३) यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.