डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची पुस्तके अत्यंत उपयोगी, ३५ गुंठे हळद डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टवटवीत

श्री. आदिनाथ बाबूराव शेवाळे, मु.पो. टाळगाव (शेवाळवाडी), ता. कराड, जि. सातारा.
मो. ९९२२९६८७२१


नोव्हेंबर २०१६ ला कऱ्हाड येथे भरलेल्या कृषी पदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो ) प्रा. लि. यांच्या स्टॉलवर 'कृषी विज्ञान' मासिकाचा वार्षिक वर्गणीदार झाल्यानंतर आपली शेती विषयक विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यात आली. त्यावेळी प्रदर्शनातून घेतलेला हळद विशेषांक वाचल्यानंतर पहिल्यांदाच हळद लागवडीचा प्रयोग केला.

७ जून २०१७ ला हळदीची लागण केली. लागण ३५ गुंठे आहे. लागणीवेळी १०० लिटर पाण्यात १ लिटर जर्मिनेटर + २०० ग्रॅम बाविस्टीन व २५० मिली क्लोरोपायरिफॉस (२०%) यामध्ये हळदीचे बेणे ५ - १० मिनिटे बुडवून लागण केली. त्यामुळे १५ व्या दिवसापासूनच उत्तम उगवण झाल्याचे दिसू लागले. लागणीनंतर १५ दिवसांनी १ लिटर जर्मिनेटर + ५०० मिली हार्मोनी व १९:१९:१९ ह्या विद्राव्य खताची २०० लिटर पाण्यातून आळवणी केली. परत १५ दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा १ लिटर जर्मिनेटर व १२:६१:०० या विद्राव्य खताची आळवणी केली. याचबरोबर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यांचे जर्मिनेटर सह थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रोटेक्टंट + प्रिझम + हार्मोनी + राईपनर + स्प्लेंडर या सप्तामृताची आतापर्यंत एक फवारणी घेतली आहे. तर आज रोजी हा प्लॉट पाहत राहण्याजोगा आहे. एकूण पाहता ३५ गुंठ्यातून ओल्या हळदीचे १२० क्विंटल व वाळवून तयार २५ - ३० क्विंटल उतपन्न अपेक्षीत आहे.

भाव नसल्याने आल्याच्या जुन्या प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची आळवणी फायदेशीर

तसेच माझा आले खोडवा १२ महिने वयाचा प्लॉट असून त्यास कंदकुज लागत असताना मी जर्मिनेटर व हार्मोनीचे आळवणी केले व दुसऱ्यांदा ००:५२:३४ व हार्मोनी यांची आळवणी केली. तर कंदकुज आटोक्यात आली. गड्डे सड थांबून प्लॉट परत हिरवा झाला आहे. सध्या भाव कमी आहे तेव्हा बाजार भावासाठी त्याची सप्टेंबरमध्ये काढणी करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे हा प्लॉट आहे तसा टिकून आहे व लागणीपेक्षा सरस दिसत आहे.

वरील हळद व आलेसाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यासाठी असलेले डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कंपनीचे प्रतिनिधी श्री. समीर पाटील मो. ९५५२५४१८०५ यांचे मार्गदर्शन घेत आहे.